Home Blog Page 5

कुरकुंभ परिसर सोमवारी कडकडीत बंद : आंदोलन कर्त्यांवर अमानुष लाठीचार्ज प्रकरणी मराठा समाजाचा निषेध

कुरकुंभ : सुरेश बागल

दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे (दि ०४.) रोजी सकाळी १०:०० वाजता जालना जिल्ह्यातील सराटी गावामध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलन कार्यकर्त्यांवर पोलीस अधिकाऱ्याकडून लाठीचार्ज केल्यामुळे सरकारचा कुरकुंभ या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला.

कुरकुंभ, पांढरेवाडी, जिरेगाव या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाडून सरकारच्या जाहीर निषेध करण्यात आला आहे. कुरकुंभ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर या मुख्य चौकात एक मराठा लाख मराठा ,मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे ,अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात निषेध करण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ,लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबन करून कारवाई करण्यात यावी, कोपर्डी महिला बलात्कार आरोपीला फाशी देण्यात यावी ,ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत आहे त्यामध्ये दुरुस्ती व्हावी .अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन मराठा समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.

यावेळी मराठा समाजाचे झुंबर शितोळे, सामाजिक कार्यकर्ते राहुल शितोळे ,आरपीआय गटाचे सामाजिक कार्यकर्ते नवनाथ गायकवाड, निलेश भागवत आणि मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे नागरिक उपस्थित होते.

पीसीईटी मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

श्रावणी कामत ,पिंपरी

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) निगडी संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पीसीईटी अंतर्गत असणाऱ्या विविध महाविद्यालयांच्या संघांसाठी आंतर पीसीईटी फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पीसीसीओई संघाने विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय निगडी, पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक निगडी, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय रावेत तसेच एस. बी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय रावेत या चार संघांनी सहभाग घेतला होता. अटीतटीच्या अंतिम सामन्यात पीसीसीओई, निगडी संघाने एस. बी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय रावेत संघाचा ३-२ गोल फरकाने पराभव करत विजेतेपद पटकावले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले.

स्पर्धेचे आयोजन पीसीसीओई निगडीचे शारिरीक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. संतोष पाचारणे, पीसीसीओईआर रावेतचे शारिरीक शिक्षण व क्रीडा संचालक मिलिंद थोरात, एस. बी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रदीप कासार यांनी केले होते.

मराठा समाज हल्ला प्रकरणाचे नारायणगाव परिसरात तीव्र पडसाद : वारूळवाडी नारायणगावात सर्वत्र कडकडीत बंद

नारायणगाव (किरण वाजगे)

जालना जिल्ह्यात झालेल्या मराठा समाजावरील लाठीमार प्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी नारायणगाव येथे देखील आज रविवार दिनांक तीन रोजी दुपारपर्यंत सर्व छोट्या मोठ्या व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवून पोलीस व शासनाचा निषेध केला.

जीवनावश्यक वस्तू व आरोग्य विषयक तसेच मेडिकल दुकाने वगळता उस्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. या बंद मुळे कोराना काळाची प्रचिती पुन्हा एकदा सर्वांना आली.

दरम्यान बंद बाबतचे आवाहन माजी सरपंच योगेश पाटे, तसेच मराठा समाजाचे प्रतिनिधी जितेंद्र गुंजाळ, महेश शिंदे, प्रवीण पवार, कैलास वाजगे, ईश्वर पाटे, संपत शिंदे आदींनी काल गावात फिरून व सर्वांना सांगून केले होते.

आज नारायणगाव येथे बाजारपेठ, बस स्थानक परिसर तसेच गावातील सर्व ठिकाणच्या दुकानदारांनी व वारूळवाडी आनंदवाडी परिसरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते.समस्त वारूळवाडीकर, नारायणगावकर व मराठा समाजाच्या वतीने व्यवहार बंदबाबतचे आवाहन करण्यात आले होते. याला सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
याच बातमी ची काही द्रूश्य पाठवली आहेत आपला….

बी.जे.एस.उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

गणेश सातव, वाघोली

वाघोली येथील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मेजर ध्यानचंद यांची जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अरुण शिंदे उपस्थित होते.

शिंदे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी खेळाकडे करिअर म्हणून पहावे व स्वतःच्या शरीरासाठी रोज किमान एक तास सर्वांनी द्यावा जेणेकरून भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. खेळामुळे शारीरिक मानसिक आरोग्य चांगले राहते व त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जे विद्यार्थ्यांना यशापर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले. तसेच मेजर ध्यानचंद यांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना खेळ व शारीरिक आरोग्य यांच्याबद्दल मार्गदर्शन करत असताना त्यांनी छोटे छोटे शारीरिक व्यायाम कसे करावे याचेही प्रात्यक्षिक करून घेतले.तसेच मेजर ध्यानचंद यांचे कार्य व त्यांचा जीवनपट थोडक्यात उलगडला डॉ. अरुण शिंदे यांनी बोलत असताना मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न मिळावा अशी सर्वांनी मागणी करूया असे आवाहन केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.खाडे यांनी दिला तर प्रस्तावना प्रा. वांजोळे यांनी केली. या कार्यक्रमाचे आभार प्रा. दूधभाते यांनी मांडले. या कार्यक्रमास प्राचार्य सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंधारे यांनी केली

बी.जे.एस.उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

गणेश सातव,वाघोली

वाघोली येथील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मेजर ध्यानचंद यांची जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अरुण शिंदे उपस्थित होते.

शिंदे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी खेळाकडे करिअर म्हणून पहावे व स्वतःच्या शरीरासाठी रोज किमान एक तास सर्वांनी द्यावा जेणेकरून भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही. खेळामुळे शारीरिक मानसिक आरोग्य चांगले राहते व त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जे विद्यार्थ्यांना यशापर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले. तसेच मेजर ध्यानचंद यांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना खेळ व शारीरिक आरोग्य यांच्याबद्दल मार्गदर्शन करत असताना त्यांनी छोटे छोटे शारीरिक व्यायाम कसे करावे याचेही प्रात्यक्षिक करून घेतले.तसेच मेजर ध्यानचंद यांचे कार्य व त्यांचा जीवनपट थोडक्यात उलगडला डॉ. अरुण शिंदे यांनी बोलत असताना मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न मिळावा अशी सर्वांनी मागणी करूया असे आवाहन केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.खाडे यांनी दिला तर प्रस्तावना प्रा. वांजोळे यांनी केली. या कार्यक्रमाचे आभार प्रा. दूधभाते यांनी मांडले. या कार्यक्रमास प्राचार्य सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंधारे यांनी केली

दिघीतील स्नेहछाया परिवारात पार पडले ‘अनोखे रक्षाबंधन

गणेश सातव, वाघोली

निसर्ग मानवी जीवनात अनेक नात्यांना आकार देत असतो.
या सर्व नात्यातं बहिण-भावाचे सुंदर नाते ईश्वराने निर्माण केले आहे.आपल्याकडे बहिण-भावाच्या या पवित्र नात्याचे स्मरण म्हणून रक्षाबंधन हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.यावर्षी दिघी येथील जीवन विद्या परिवर्तन ट्रस्ट संचलित स्नेहछाया परिवारात आगळेवेगळे रक्षाबंधन पार पडले.संस्थेत असणारी बरीचं मुलं एकल पालक, शालाबाह्य, निराधार,अनाथ तर काही भटक्या व वंचित समाजातील आहेतं.

रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधून घेण्यास मुलांना कुठे आपलेपणाने जाता येत नाही किंवा त्यांचाकडेही आपलं म्हणून जवळचं असं कोणी येतं नसतं.रक्षाबंधन सणा निमित्ताने मुलांनाही हुरहूर लागून राहत असते.आपल्याकडे कोणी येईल,आपल्याला राखी बांधतील,मायेचे,प्रेमाचे दोन शब्द बोलतील,आपल्या पाठीवर कौतुकाची थाप देतील.

याचं विचार संकल्पेतून संस्थेतील मुलांचे रक्षाबंधन गोड व्हावे,त्यांच्या हि हातावर मायेचा,प्रेमाचा धागा बांधला जावा असा विचार पुढे आला.

चिंचवड येथील हँन्डीकँप सेंटर संस्थेचे संस्थापक सुनील चोरडिया व स्नेहछाया परिवाराचे संस्थापक प्रा.दत्तात्रय इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली येथील पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते गणेश सातव,पत्रकार हर्षवर्धन पवार, फिजिओथेरपिस्ट डॉ. सोमनाथ मोरे यांनी स्नेहछायातील मुलांसाठी एक आठवणीतील अनोखे रक्षाबंधन साजरा करण्याचा निर्णय घेतला.

या संकल्पनेनुसार हँन्डीकँप सेंटर येथील कांता,उषा,सोनू, आणि संगिता या प्रज्ञाचक्षू भगिनींनी स्नेहछाया संस्थेत येत संस्थेतील मुलांसोबत रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी भगिनींनी सर्व मुलांना टिळा लावून,औक्षण करुन राखी बांधली.हँन्डीकँप सेंटरच्या माध्यमातून भगिनींनी मुलांसाठी मिठाई आणली होती ती मुलांना वाटण्यात आली.स्नेहछाया परिवाराच्यावतीने सुध्दा या भगिनींसाठी मिठाई व हात रूमाल भेट स्वरूपात देण्यात आले.

या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असणाऱ्या घटकांचा आनंद द्विगुणीत होत असतो.त्यांना मायेचा,प्रेमाचा आधार प्राप्त होतो.माणसा माणसातील सामाजिक विषमतेची दरी कमी करण्यासाठी असे कृतीशील सामाजिक उपक्रम राबवणे हि काळाची गरज आहे असे मत हँन्डीकँप सेंटरचे संस्थापक सुनीलकाका चोरडिया यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

याप्रसंगी स्नेहछाया परीवारचे संस्थापक प्रा.दत्तात्रय इंगळे,प्रकल्प संचालिका सौ.सारिका इंगळे,सोमनाथ मोरे,गणेश सातव,राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.

प्रा.दत्तात्रय इंगळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सारिका इंगळे यांनी आभार मानले.

जालना – मराठा समाज हल्ला प्रकरणाचे ग्रामीण भागातही तीव्र पडसाद ; नारायणगावात उद्या राहणार सर्व व्यवहार बंद

 

नारायणगाव :- (किरण वाजगे)

जालना जिल्ह्यात झालेल्या मराठा समाजावरील लाठीमार प्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे देखील उद्या रविवार दिनांक तीन रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व व्यापारी आपली दुकाने बंद ठेवणार आहेत. जीवनावश्यक वस्तू किंवा आरोग्य विषयक व मेडिकल दुकाने वगळता उस्फूर्तपणे बंद मध्ये सहभागी होणार आहे. याबाबतचे आवाहन माजी सरपंच योगेश पाटे, तसेच मराठा समाजाचे प्रतिनिधी जितेंद्र गुंजाळ, महेश शिंदे यांनी केले आहे.

 

आज नारायणगाव येथे बाजारपेठ, बस स्थानक परिसर तसेच गावातील दुकानदारांना समस्त नारायणगावकर व मराठा समाजाच्या वतीने व्यवहार बंदबाबतचे आवाहन करण्यात आले.
सर्व दुकानात जाऊन उद्याच्या बंद बाबतचे मराठा समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आले याप्रसंगी भागेश्वर डेरे, आरिफ आतार, बाळा वाव्हळ, ईश्वर पाटे, संतोष दांगट, पप्पू भूमकर, निरंजन भोसले, नितीन भोर, प्रशांत वाजगे, प्रवीण पवार, कैलास वाजगे, निलेश दळवी, भाऊ श्रीवत, पिंटू दांगट, खंडेराव संते, राहुल लोखंडे, संपत शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

लेखी आश्वासन दिल्यानंतर ३ सप्टेंबर रोजी होणारे शेतकऱ्यांचे आंदोलन तुर्त स्थगित : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बरोबर होणार बैठक

नारायणगाव (किरण वाजगे)

कालवा सल्लागार समितीची बैठक न घेता जुन्नर तालुक्यातील येडगाव धरणातून कुकडी डाव्या कालव्याद्वारे २२ जुलै पासून चौदाशे क्युसेक्स ने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. या निषेधार्थ शेतकरी संघटनेने येडगाव धरणावर तीव्र आंदोलन करण्याचे ठरवले होते. मात्र हा निर्णय तुर्त स्थगित करण्यात आला आहे.

येडगाव धरणाची उपयुक्त पाणी साठ्याची आजची स्थिती पाहता पाणी सोडणे हे अतिशय अन्यायकारक असल्याची भावना शेतकरी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली होती. रविवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी येडगाव धरण परिसरात तीव्र आंदोलन करण्यात येणार होते. मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्याचे आश्वासन देऊन या घटनेवर विशेष तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याचे कुकडी धरण प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी लेखी कळविले आहे.

शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे, तालुकाध्यक्ष संजय भुजबळ, जुन्नर तालुका युवा अध्यक्ष प्रमोद खांडगे, उपाध्यक्ष अजित वालझाडे, अजित वाघ, सचिन थोरवे, शिवनेरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे उपस्थित होते.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्यासह तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने येडगाव धरण परिसरात आज उपस्थित होते. कुकडी प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र रावळे यांनी लेखी आश्वासन आंदोलकांना दिल्यामुळे देखील आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे अशी माहिती अंबादास हांडे यांनी दिली.

नारायणगाव इनरव्हिल क्लबच्या वतीने पांगरी वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तू भेट

नारायणगाव :- (किरण वाजगे)

पांगरी माथा (ता.जुन्नर) येथील राजाराम पाटील ज्येष्ठ नागरिक आश्रमातील जेष्ठांना नारायणगाव येथील इनरव्हील क्लब च्या वतीने जीवनावश्यक भेटवस्तू नुकत्याच देण्यात आल्या.
यामध्ये बेडशीट, कपडे वाळत घालायचे स्टँड , मोठा टेबल अश्या व अन्य वस्तूरुपी मदत संस्थेच्या अध्यक्ष प्रिती शहा यांनी केली.
त्यावेळी त्यांना एक वेळच्या भोजनासाठी धनादेश स्वरूपात आर्थिक मदत तेथील संचालिका यांच्या हाती सुपूर्द केला.
येथील जेष्ठ नागरिकांनी आमच्या लेकी आल्या व आमची हृदये अत्यानंदाने भरून आली अशा भावना जेष्ठांनी व्यक्त केल्या. सर्वांनी नेहमी येऊन अशी मदत करा.असे आवाहनही त्यांनी व्यक्त करुन सर्व महिलांचे आभार मानले.

वेळोवेळी येऊन आम्ही मदत करू जेष्ठांसोबत वेळ घालवू असे आश्वासन इनरव्हील क्लबच्या वतीने शहा यांनी दिले.
कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्षा प्रीती शहा, संस्थापक अंजली खैरे यांनी केले. याप्रसंगी उपाध्यक्षा सविता खैरे,सेक्रेटरी रश्मी थोरवे, खजिनदार सुनीता चासकर,एडिटर समृद्धी वाजगे नंदिनी घाडगे, स्वाती मुदगल, रुचिता वाघ,पुष्पा खरे,दर्शना फुलसुंदर,सविता मोढवे,प्रांजल भाटे व सर्व सदस्या उपस्थित होत्या.

एक राखी आपल्या सैनिकांसाठी ; जिजामाता संस्थेच्या वतीने माजी सैनिकांसोबत रक्षाबंधन

नारायणगाव :- (किरण वाजगे)

एक राखी आपल्या भारतीय माजी सैनिकांसाठी हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम नुकताच नारायणगावात उत्साहात आयोजित करण्यात आला.जिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नारायणगाव या संस्थेच्या वतीने या कार्यक्रमास जुन्नर तालुका माजी सैनिक संघाचे अध्यक्ष डी के भुजबळ, माजी सैनिक उमेश अवचट, सतीश भुजबळ, भगवान काळे, एकनाथ वाजगे, सुभाष काकडे, संतोष घोडके, श्री.बाळासो मुळे, शिवाजी पाटे, किसन ढवळे, पंढरीनाथ घोटकर, श्री तांबे, श्री थोरवे उपस्थित होते.

संस्थेच्या संस्थापिका राजश्री बोरकर, अध्यक्ष योगिनीताई खैरे, उपाध्यक्ष स्वातीताई औटी, संचालिका सुशीला विटे, सुरेखा वाजगे, ज्योतीताई गांधी, भारती खीवंसरा, पुष्पाताई खैरे, शितल ठुसे, डॉ.पल्लवीताई राऊत अनुपमा पाटे, नीता बोरकर, छाया केदारी, सुवर्णा मेहेर, अरुणा वाघुले, सविता वाबळे, शिला शेलार या महिला भगिनींनी माजी सैनिकांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.शमीम इनामदार यांनी केले व संस्थेच्या अध्यक्षा योगिनी खैरे यांनी उपस्थित्यांचे आभार मानले.