मराठा समाज हल्ला प्रकरणाचे नारायणगाव परिसरात तीव्र पडसाद : वारूळवाडी नारायणगावात सर्वत्र कडकडीत बंद

नारायणगाव (किरण वाजगे)

जालना जिल्ह्यात झालेल्या मराठा समाजावरील लाठीमार प्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी नारायणगाव येथे देखील आज रविवार दिनांक तीन रोजी दुपारपर्यंत सर्व छोट्या मोठ्या व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवून पोलीस व शासनाचा निषेध केला.

जीवनावश्यक वस्तू व आरोग्य विषयक तसेच मेडिकल दुकाने वगळता उस्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. या बंद मुळे कोराना काळाची प्रचिती पुन्हा एकदा सर्वांना आली.

दरम्यान बंद बाबतचे आवाहन माजी सरपंच योगेश पाटे, तसेच मराठा समाजाचे प्रतिनिधी जितेंद्र गुंजाळ, महेश शिंदे, प्रवीण पवार, कैलास वाजगे, ईश्वर पाटे, संपत शिंदे आदींनी काल गावात फिरून व सर्वांना सांगून केले होते.

आज नारायणगाव येथे बाजारपेठ, बस स्थानक परिसर तसेच गावातील सर्व ठिकाणच्या दुकानदारांनी व वारूळवाडी आनंदवाडी परिसरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते.समस्त वारूळवाडीकर, नारायणगावकर व मराठा समाजाच्या वतीने व्यवहार बंदबाबतचे आवाहन करण्यात आले होते. याला सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
याच बातमी ची काही द्रूश्य पाठवली आहेत आपला….

Previous articleबी.जे.एस.उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
Next articleपीसीईटी मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा