नारायणगाव इनरव्हिल क्लबच्या वतीने पांगरी वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तू भेट

नारायणगाव :- (किरण वाजगे)

पांगरी माथा (ता.जुन्नर) येथील राजाराम पाटील ज्येष्ठ नागरिक आश्रमातील जेष्ठांना नारायणगाव येथील इनरव्हील क्लब च्या वतीने जीवनावश्यक भेटवस्तू नुकत्याच देण्यात आल्या.
यामध्ये बेडशीट, कपडे वाळत घालायचे स्टँड , मोठा टेबल अश्या व अन्य वस्तूरुपी मदत संस्थेच्या अध्यक्ष प्रिती शहा यांनी केली.
त्यावेळी त्यांना एक वेळच्या भोजनासाठी धनादेश स्वरूपात आर्थिक मदत तेथील संचालिका यांच्या हाती सुपूर्द केला.
येथील जेष्ठ नागरिकांनी आमच्या लेकी आल्या व आमची हृदये अत्यानंदाने भरून आली अशा भावना जेष्ठांनी व्यक्त केल्या. सर्वांनी नेहमी येऊन अशी मदत करा.असे आवाहनही त्यांनी व्यक्त करुन सर्व महिलांचे आभार मानले.

वेळोवेळी येऊन आम्ही मदत करू जेष्ठांसोबत वेळ घालवू असे आश्वासन इनरव्हील क्लबच्या वतीने शहा यांनी दिले.
कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्षा प्रीती शहा, संस्थापक अंजली खैरे यांनी केले. याप्रसंगी उपाध्यक्षा सविता खैरे,सेक्रेटरी रश्मी थोरवे, खजिनदार सुनीता चासकर,एडिटर समृद्धी वाजगे नंदिनी घाडगे, स्वाती मुदगल, रुचिता वाघ,पुष्पा खरे,दर्शना फुलसुंदर,सविता मोढवे,प्रांजल भाटे व सर्व सदस्या उपस्थित होत्या.

Previous articleएक राखी आपल्या सैनिकांसाठी ; जिजामाता संस्थेच्या वतीने माजी सैनिकांसोबत रक्षाबंधन
Next articleलेखी आश्वासन दिल्यानंतर ३ सप्टेंबर रोजी होणारे शेतकऱ्यांचे आंदोलन तुर्त स्थगित : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बरोबर होणार बैठक