Home Blog Page 4

दुचाकी चोरीतील सराई आरोपी जेरबंद , यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई

योगेश राऊत , पाटस

पुणे जिल्ह्यात मोटरसायकल चोरणाऱ्या सराईत टोळीतील एका मोहरक्याला यवत पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यवत, जेजुरी, लोणी काळभोर, हडपसर, लोणीकंद परिसरातील तब्बल १३ मोटारसायकल ची चोरी केली असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.

पवन चट्टान राठोड (वय २७ रा. म्हातोबाची आळंदी ता. हवेली जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. कार्तिक अविनाश राठोड (रा. जेजुरी ता. पुरंदर जि. पुणे), भीष्म संतोष राठोड ( रा. जेजुरी ता. पुरंदर जि.पुणे ) असे फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तुषार अशोक ताकवणे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
मिळालेल्या माहिती नुसार, ३ ते ४ जुलै २०२३ दरम्यान यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारगाव येथील तुषार अशोक ताकवणे यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती.

याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर यवत पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत पारगाव ते सुपा रोड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले, तसेच
रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले.
त्यात एकावर चोरीचा संशय बळावला आणि यवत गुन्हे शोध पथकाने सहजपुर फाटा येथून संशयित म्हणून पवन चट्टान राठोड यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता पवन राठोड याने त्याचे इतर साथीदार कार्तिक, भीष्म यांच्या मदतीने यवत, जेजुरी, लोणी काळभोर, हडपसर, लोणीकंद हद्दीतून १३ मोटार सायकली चोरल्या असल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, यवत, जेजुरी, लोणी काळभोर, लोणीकंद, हडपसर या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलीसांनी पवन चट्टान राठोड याला ताब्यात घेत १३ मोटार सायकली असा एकूण किंमत रुपये ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर त्याचे इतर दोन साथीदार फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलीस अधिकारी असल्याचे सांगून महिलेवर ८ वर्ष बलात्कार, उकळले ३५ लाख रुपये

योगेश राऊत, पाटस

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेला मी मोठा पोलीस अधिकारी आहे, मोठ मोठे पोलीस अधिकारी माझे मित्र आहेत’, अशी बतावणी करत, यवत येथील एका महिलेला भुरळ पाडून, तब्बल नऊ वर्षे तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. एवढ्यावरच न थांबता, तिचे अश्लील व्हिडिओ काढून, ते व्हायरल करण्याची धमकी देत पिडीत महिलेकडून तब्बल ३५ लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

याबाबत पीडित महिलेच्या तक्रारीवरून यवत पोलिसांनी दौंड शहरातील ठाकूर कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी ही माहिती दिली. मनीष बिलोण ठाकूर, हन्ना मनीष ठाकूर, संदेश मनीष ठाकूर, श्वेता मनिष ठाकूर (सर्व रा. डिफेन्स कॉलनी, निरंजन बिल्डींग, दौंड, जि. पुणे) अशी या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी मनीष ठाकूर याने पिडीत महिलेशी ऑगस्ट २०१५ ते मार्च २०२३ या काळात पोलीस असल्याची बतावणी करून, वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. याबाबत कोणाला सांगितले तर कुटुंबातील सदस्यांना ठार मारेन, अशी धमकी दिली. मनिश ठाकूर व त्याची पत्नी हन्ना, मुलगा संदेश व मुलगी श्वेता यांनी संगनमताने पिडीत महिलेला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन, २०१५ ते २०२३ दरम्यान वेळोवेळी ३५ लाख रूपये रोख स्वरूपात घेतले.

भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक अनिल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली दौंड तालुका येथे आढावा बैठक संपन्न

कुरकुंभ  , सुरेश बागल

दौंड तालुक्यातील कॅम कॅम्पुटर येथे (दि.०५) रोजी दौंड तालुका भारतीय पत्रकार संघाची आढावा बैठक घेण्यात आली. भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश संघटक अनिलजी सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ आणि नव्याने निवड झालेले पुणे जिल्हा अध्यक्ष तैनूर शेख यांच्या वतीने पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवलकर, जिल्हा प्रवक्ते दिनेश पवार, दौंड तालुका अध्यक्ष सुभाष कदम यांना सन्मानपत्र देऊन फेरनिवड करण्यात आली.

यावेळी आढावा बैठकीमध्ये सामाजिक, राजकीय आणि अन्य विषयावर प्रदेश संघटक अनिल सोनवणे यांनी चर्चा केली. खरोखरच नवीन पुणे जिल्हा अध्यक्ष तैनूर शेख यांचे काम चांगले आहे. त्यामुळे त्यांची निवड केलेली आहे.दौंड तालुका भारतीय पत्रकार संघाचे काम कौतुकास्पद आहे. असे विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ यांनी सांगितले.

यावेळी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवलकर आणि दौंड तालुका अध्यक्ष सुभाष कदम यांनी आभार मानले. सूत्रसंचालन जिल्हा प्रवक्ते दिनेश पवार यांनी केले. यावेळी दौंड तालुका भारतीय पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग गडेकर, सचिव सुरेश बागल, कार्याध्यक्ष सदाशिव रणदिवे ,सहसचिव महेश देशमाने, खजिनदार योगेश राऊत उपस्थित होते.

उपक्रमशील जिल्हा परिषद शाळा,वडजाई येथे दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा

गणेश सातव, वाघोली

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडजाई,आव्हाळवाडी(ता-हवेली)येथे गोपाळकाल्यानिमित्त दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सोहळ्यासाठी सकाळीचं मुले पारंपरिक श्रीकृष्ण आणि राधेच्या वेशभूषेत शाळेत आली होती.रोजच्या परिपाठानंतर मुख्याध्यापक शंकर बडे सरांनी मुलांना भगवान श्रीकृष्ण जन्म आणि त्यांच्या बाललीला,अवतार कार्य याबाबत गोष्टीरुपी माहिती सांगितली. गोपाळकाला का करायचा,त्याचे महत्व,भगवान श्रीकृष्ण जसे सर्व गोपाळांमध्ये उच्च- नीच भेदभाव न करता सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून काला करत व तो काला सर्वांना खाऊ घालतं त्याच मार्गावर आपण चालून सर्वांशी प्रेमाने वागावे या विषयी मार्गदर्शन केले.

त्यांनतर भजने,मुलींचा गरबा, मुलांचे गोविंदा नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.मुलांनी दोर बांधून दहीहंडीची तयारी केली.हंडीला रंग-फुलांनी सजवून,त्यात दही,लाह्या याचा काला टाकून ती हंडी दोराच्या सहाय्याने वरती बांधण्यात आली.नंतर मुलांनी एकमेकांच्या हातात हात घालून स्नेह,समता व बंधुतेचा सांघीक थर करुन बालकृष्णा वेशातील छोट्या विद्यार्थ्यांना खांद्यावर घेऊन दहीहंडी फोडली.

दहीहंडी सोहळ्याच्या नियोजनासाठी सौ.सुरेखा खोसे मॅडम,वैष्णवी सातव मॅडम यांनी परिश्रम घेतले.मुलांना काला प्रसाद,पौष्टीक भेळ आणि मसालेभात नाष्टा म्हणून देण्यात आला.दरम्यानच्या काळात या कार्यक्रमासाठी बबन सातव सर यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.कार्यक्रमाची सांगता आळंदी येथून आलेले ह.भ.प.राम महाराज कासार व माऊली महाराज चिलगर यांच्या सुंदर गौळणीने झाली.

मुख्याध्यापक शंकर बडे यांनी सर्वांचे आभार मानले व नंतर सोहळ्याची सांगता झाली.

जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक दिन उत्साहात संपन्न

घोडेगाव: मोसीन काठेवाडी

5 सप्टेंबर,राष्ट्रीय शिक्षक दिन जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय घोडेगाव येथे उत्साहात संपन्न झाला. 5 सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस. या दिवसाचे औचित्य साधून जनता विद्या मंदिर मध्ये विद्यार्थ्यांनी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे संपूर्ण कामकाज हे विद्यार्थी शिक्षक आणि विद्यार्थी सेवक यांनी पाहिले विद्यार्थी शिक्षक म्हणून प्राचार्य पदाची धुरा प्रणाली घोडेकर हिने सांभाळली,तर उपप्राचार्य कु. सुदीप कुर्हे तर विषयशिक्षक म्हणून विविध शाखांमधील ५४ विद्यार्थ्यांनी तर सेवक म्हणून केतन इंदोरे आणि रवी घोडे या विद्यार्थ्यानी काम पाहिले. शिक्षकांची नेमकी भूमिका काय असते याची अनुभूती विद्यार्थ्यांना यातून आली. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना शिक्षकाचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्व आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही शिक्षकाची गरज किती आहे याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी सांगितले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकारामशेठ काळे हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे संस्थेचे कार्याध्यक्ष व समन्वय समिती चेअरमन राजेश काळे आणि उपप्राचार्य धनंजय पातकर हे या कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षक झालेल्या कु.आदिती गावडे हिने केले. शिक्षक मनोगतात विद्यालयाचे प्राध्यापक शितल पवार सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये आधुनिक काळात शिक्षकांची वाढलेली जबाबदारी नमुद करून 4g आणि 5g च्या युगात गुरुजी हे किती महत्त्वाचे असतात हे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागातील पांडूरंग फलके सर, शितल पवार सर, कुमार उजागरे सर, सचिन कदम सर, सौ शर्मिला कर्पे मॅडम, सौ. मीरा चव्हाण मॅडम, आणि लक्ष्मण आढाव सर यांनी केले.

जनता विद्या मंदीर शाळेत तब्बल 42 वर्षानंतर पुन्हा भरला वर्ग

घोडेगाव – मोसीन काठेवाडी

जनता विद्या मंदिर या विद्यालयातील विद्यार्थी उच्च प्रतीचे शिक्षण घेऊन काही विद्यार्थी उच्च स्तरावर नोकऱ्या करत आहे आणि इथून पुढच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले भवितव्य उज्वल करावं असे प्रतिपादन कांतीलाल परदेशी सर यांनी केले.

आंबेगाव तालुक्यातील अग्रगण्य असलेली शिक्षण संस्था,आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित जनता विद्या मंदीर शाळेत सन 81व 82 चा वर्ग तब्बल 42 वर्षानंतर,सर्व मित्र,मैत्रिणी एकत्र येऊन गेट-टुगेदरचा कार्यक्रम संपन्न झालय.

या कार्यक्रमासाठी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे व वर्गशिक्षक अशोक सोनवणे सर,विजय काळे सर , कांतीलाल परदेशी सर सौ सुनंदा काळे मॅडम शरद काळे सर यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले.

श्री कांतीलाल परदेशी सर व सुनंदा काळे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रम संपल्यानंतर हॉटेल्स स्क्वेअर रिसॉर्ट व हुतात्मा बाबू गेनू जलाशय या ठिकाणी जाऊन सर्व मित्र-मैत्रिणींनी आनंद घेतला व नाश्तापाणी करून संध्याकाळी एकत्रित भोजन करून शेवटी साल सिद्धेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन सर्व मित्र मैत्रिणी निरोप घेतला
कार्यक्रमाचे नियोजन सर्व मित्र मैत्रिणी एकत्रित आणण्यासाठी सुशीला व अलका या दोघींनी विशेष परिश्रम घेतले.

संतोष थोरात यांचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मान

आंबेगाव – मोसीन काठेवाडी

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक संतोष रामचंद्र थोरात यांस क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

मुंबई नरीमन पॉईंट येथील टाटा थिएटर,एन.सी.पी.ए हॉल मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विधानसभा अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर यांचे अध्यक्षतेखाली शिक्षक थोरात यांस प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह व एक लाख दहा हजार रुपयांचा धनादेश देवून सपत्नीक गौरविण्यात आले.यावेळी विधान परिषदेचे शिक्षक आमदार विक्रम काळे,कपिल पाटील,अरुण सरनाईक,शालेय शिक्षण प्रधान सचिव रनजीतसिंग देओल,शिक्षण आयुक्त सुरज मांढरे,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी,मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षक थोरात हे गेले १६ वर्ष प्राथमिक म्हणून काम करत आहे.गेली साडेपाच वर्ष श्री.क्षेत्र भीमाशंकर जवळील निगडाळे या आदिवासी शाळेत राबवलेले नाविन्यपूर्ण नवोपक्रम, डिजीटल शाळा निर्मिती,आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेद्वारे बालआनंद मेळाव्याचे आयोजन,१००% पटनोंदणी, १००% उपस्थिती, शाळा परिसरात शाळाबाह्य विद्यार्थी नाहीत,विद्यार्थी सर्वागीण गुणवत्ता वाढेतून प्रगत शाळा निर्मितीमुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला

यावेळी साने गुरुजी कथामाला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक लहू घोडेकर, शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक विकास कानडे,आदर्श शिक्षक चांगदेव पडवळ,संतोष कानडे,मुख्याध्यापिका मनीषा कानडे,रामचंद्र थोरात,शिक्षक अशोक रेपाळे,संतोष भोर,औषधनिर्माण अधिकारी मनोज सोबाजी,दादाभाऊ टाव्हरे, रोहिणी पडवळ,उज्ज्वला राक्षे,अश्विनी तांबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कौठळी शाळेत बाल गोपाळांनी फोडली अशैक्षणिक कामांची प्रतिकात्मक दहीहंडी

 श्रावणी कामत

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठळी येथे गोपाळकाला (दहीहंडी) उत्सव साजरा करण्यात आला. आरती गायकवाड व भारत ननवरे यांनी गोपाळकाला(दहीहंडी) या सणाची माहिती विद्यार्थी व पालकांना दिली.आजच्या दहीहंडी उत्सवाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी, पालकांनी शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे करावी लागतात त्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होतो तरी शिक्षकांना निरक्षर सर्वेक्षण, बांधकाम, आधारकार्ड, बी एल ओ,स्वच्छता पंधरवडे यांसारखी अशैक्षणिक कामे देऊ नयेत म्हणून त्या कामांची प्रतिकात्मक दहीहंडी फोडली.

पालक व उपस्थित ग्रामस्थ यांनी भावना व्यक्त केली की शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देता आमच्या मुलांना शिकवू द्या.

कृष्ण,राधा,साडी घातलेल्या मुली,फुगे,फुले,गीतांनी परिसर दणानून गेला होता.मुलांनी नाचण्याचा मनसोक्त आनंद लुटला. शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोरे रचून दहीहंडी फोडली.सर्व विद्यार्थी, पालक,ग्रामस्थांना प्रसाद देण्यात आला.सदर कार्यक्रमास शाळचे मुख्याध्यापक, शिक्षक,पालक,मातापालक,ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पालक,ग्रामस्थ व शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मदत केली.आभार अमित भोंग यांनी मानले.

घोडेगाव येथील राजा हरिश्चंद्र महादेव यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

मोसीन काठेवाडी

घोडेगाव (ता.आंबेगाव) येथील श्री राजा हरिश्चंद्र महादेव यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

या सप्ताहाच्या शेवटी गौरीशंकर सभामंडपात श्री हरिश्चंद्र महादेव संस्थान संचालित नटराज संगीत नृत्य विदयालयाने शास्त्रीय नृत्य अविश्कारातून शिव आराधना सादर केली. यामध्ये नृत्य शिक्षिका नेहाताई नांगरे यांच्या सोबत डॉ.दिपाली मांढरे,डॉ.स्नेहल गुजराथी,डॉ.सायली तोडकर,श्वेता काजळे यांसह विदयार्थीनी जानवी माळी, रिद्धी काळे, सिद्धी काळे, रेवा काळे , रायका काळे ,अन्वि तोडकर, स्वरा झोडगे ,सुकन्या कोथावळे,तिलोत्तमा वायाळ,परिज्ञा बाणखेले, रायका काळे,हेमन्या प्रशांत काळे काव्या बिरादार , समृद्धी गिरे यांनी सहभाग घेतला तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक न्यु इंग्लिश स्कुल लांडेवाडीच्या प्राध्यापिका सिमा काळे यांनी केले.तर शेवटी अभार नेहा नांगरे यांनी मानले.

नारायणगाव महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

नारायणगाव :- (किरण वाजगे)

नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच वाणिज्य विभाग व संशोधन केंद्र यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या शिक्षक दिन कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी शिपायापासून ते प्राध्यापक व प्राचार्य अशा भूमिका सादर केल्या.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य जी.बी.होले यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्त्व महत्त्व विशद केले. वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.डी टाकळकर यांनी शिक्षकांविषयी असलेला आदर, शिक्षक हा पवित्र कार्याचे काम करत असून अनेक युवक घडवण्याचे कार्य सातत्याने करत असतो.”असे विचार व्यक्त केले.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील सिद्धी आर्वीकर हिने प्राचार्य, तेजस मधे याने उपप्राचार्य व पुनीत वाकचौरे यांनी वाणिज्य विभाग प्रमुख म्हणून भूमिका साकार केल्या. आदिती चाळक, गौरी आरोटे, सेजल सहाने, निकिता खुळे, राधिका थेटे या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली
यावेळी सुरज शिंदे ,ओंकार भोर, ज्ञानेश्वर खांडगे, सुजित मुटके या विद्यार्थ्यांनी देखील शिपाई वर्गाची भूमिका पार पाडली.
विद्यालयातील वाणिज्य विभागातील ७० विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून आपला सहभाग नोंदवला .

व्यवसाय प्रशासन विभाग प्रमुख डॉ.अनुराधा घुमटकर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.श्रीकांत फुलसुंदर, प्रा. आकाश कांबळे, प्रा.वामन , प्रा. वैभव शिंदे, प्रा.पूजा वाव्हळ, प्रा. प्रतिभा मोहिते, प्रा.वाघ मॅडम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए.बी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा.डॉ.व्ही. एस. मोढवे, डॉ.मधुरा काळभोर, प्रा एस.ए. जगदाळे ,प्रा.डॉ.एस.बी. खरात,प्रा.तनुजा वाघ, प्रा.पूनम आवटे,
प्रा.डॉ.व्ही.टी.पाटे, प्रा.डॉ.ए.ए.जगदाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले. तर आभार अनुष्का खैरे यांनी मानले.