Home Blog Page 369

नववर्षाच्या स्वागतासाठी एटीडीसीची निवासे / रिसॉर्ट सज्ज

पुणे-संपुर्ण जग नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असताना पुनश्च: कोरोना व्हायरस चा नवा विषाणु दरवाजे ठोठावत आहे. अशा प्रसंगास आपण सर्वजण आणि शासन धीराने तोंड देत आहोत. सदरच्या बाबींचा पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता असली तरी पर्यटनाची ओढ सर्वांना निसर्गाकडे खेचुन नेत आहे.

दरम्यान, सदरच्या नव्या व्हायरस मुळे जिल्हाधिकारी आणि शासनाने रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. सदरच्या निर्णयामुळे पर्यटकांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सर्वच पर्यटक निवासे / रिसॉर्ट खुली असुन पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा आणि आरोग्यपुर्ण सुविधा देण्यासाठी तत्पर आहेत.

नव वर्षाच्या स्वागताची आणि नाताळ सण साजरा करण्याची जय़यत तयारी महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांमध्ये उत्साहाने करण्यात आली आहे. पर्यटक निवासांमध्ये “सांताक्लॉज’” चॉकलेट बरोबरच मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करीत आहे. टाळेबंदीमुळे कंटाळलेल्या पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहीती, आसपासच्या निसर्गाची माहीती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजनायांची माहीत वेबसाईट, फेसबुक आणि Whats app ग्रुप च्या माध्यमातुन देण्यात येत आहे.
आपली पर्यटक निवासे ही महामंडळाचे कर्मचारी “स्वच्छता हीच सेवा” हे ब्रीद उराशी बाळगून टाळेबंदीच्या कठीण काळातही काम करुन परिसर आणि खोल्या सुसज्ज आणि स्वच्छ ठेवल्या आहेत. पर्यटक निवासे आणि उपहारगृहे निर्जंतुकिरण करण्यात आल्या आहेत. उपहारगृह आणि अनुषंगिक बाबींची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण करण्यात आले आहे.

आसपासचा परिसर स्वच्छ ठेवत आहोत. त्याचबरोबर पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना साधारणतः पुढील वर्षासाठी करणे व पर्यटकांना आपली निवासे ही आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री देण्यात येत आहे. तसेच शरिराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमिटर, मुखपटटी, हातमोजे अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरम्यान, सध्याच्या वातावरणात पर्यटकांना आयुर्वेदीक आणि नैसर्गिक खाद्यपदार्थ आणि वातावरण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पर्यटकांना स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन मंदीरे आणि संस्कृती, हिरवागार निसर्ग, अप्रतिम खाद्यपदार्थ यांची मेजवानी देण्यासाठी महामंडळ आतुरतेने वाट पहात होते. महामंडळाची आणि पर्यटकांचीही आतुरता आता संपली असुन सर्व पर्यटक निवासे 100 टक्के फुल झाली आहेत. सध्या रमणीय समुद्रकिनारे आणि थंड हवेची ठिकाणे पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत. मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा प्रसंग संस्मरणीय करण्यासाठी पर्यटक निसर्गाकडे धाव घेत आहेत.
पुणे विभागातील पानशेत, कार्ला (लोनावळा), माथेरान, माळशेज घाट, कोयनानगर आणि महाबळेश्वर कडे पर्यटकांचा ओढा असुन शिवशंकराच्या सानिध्यात महामंडळाच्या भिमाशंकर पर्यटक निवासातही पर्यटक गर्दी करत आहेत.

तथापि, मा. जिल्हाधिकारीसो आणि शासन यांच्या आदेशाचे आणि सर्व सुरक्षात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन करुन महामंडळ नाताळ आणि नववर्षाच्या आगमनाचा आनंद पर्यटकांना देणार आहे. रात्री 11 नंतर संचारबंदी असल्यामुळे सर्व प्रकारची खबरदारी घेवुन आणि सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून पर्यटक निवासांमध्ये छोटेखानी मनोरंजनाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम पर्यटकांच्या सेवेत सादर करण्याचा महामंडळाचा मानस आहे. कोरोना आजाराविरुध्द सर्व प्रकारची खबरदारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडुन घेण्यात येत आहे. तथापि, पर्यटकांनी निसर्गाचे आणि कोरानाचे भान ठेवुन पर्यटनाचा, नव वर्ष स्वागताचा आनंद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांच्या कडुन करण्यात आले आहे.

माहिती सेवा समितीच्या वतीने गणेश गायकवाड यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

अमोल भोसले, उरळी कांचन

डोंगरगाव येथील युवक गणेश बाबासाहेब गायकवाड यांना आजपर्यंत १४ वेळा रक्तदान केले, २ वेळेला प्लाजमा दान केले व प्लाझमा दान करणेबाबत नागरिकांमध्ये समज गैरसमज होते. त्याबाबत जनजागृती केली करोना काळात गावात स्वतः हा पंप घेऊन फवारणी केली. नागरीकांना मदत केली त्यामध्ये त्यांना स्वतःला व कुटुंबातील सदस्यांना करोनाची लागण झाली तरी सुद्धा न घाबरता त्यातुन बाहेर निघुन पुन्हा प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे आले. त्यामुळे अशा तरुण युवकाचा सन्मान तर झालाच पाहिजे माहिती सेवा समितीचे हवेली तालुका अध्यक्ष कमलेश बहीरट यांनी प्रयत्न करुण आज त्यांना करीना योद्धा पुरस्काराने माहिती सेवा समितीचे कार्यालयात सन्मानित करण्यात आले. हा सन्मान माहिती सेवा समितीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांचे हस्ते देण्यात आला.

त्यावेळी उपस्थितामध्ये डोंगरगावचे युवक कार्यकर्ते अमित गायकवाड, माहीती सेवा समितीचे हवेली तालुका अध्यक्ष कमलेश बहीरट, अभिजीत काटे, विक्रम गडदे, सागर जाधव, संदीप कोलते, देवेंद्रजी थत्ते, धनराज वारघडे, पोलीस काॅंस्टेबल संतोष बडे साहेब हे उपस्थित होते.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत हवेली तालुका अध्यक्षपदी संदीप शिवरकर व संघटकपदी गणेश सातव

वाघोली-अखिल भारतीय ग्राहक पंचायत,हवेली तालुका अध्यक्षपदी आळंदी म्हातोबा येथील संदीप शिवरकर यांची तर संघटकपदी वाघोली (आव्हाळवाडी) येथील गणेश सातव यांची निवड करण्यात आली आहे.

पुणे येथील मध्यवर्ती कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा बैठकीत जिल्हाध्यक्ष दिलिप निंबाळकर यांनी नवनियुक्त तालुका कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांची नावे जाहीर केली.त्यानंतर उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कार्यकारणीतील पदाधिकारी व सदस्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

हवेली तालुका कार्यकारणी खालीलप्रमाणे.

अध्यक्ष-संदीप शिवरकर
उपाध्यक्ष-विठ्ठल आण्णा ठोंबरे

संघटक-गणेश सातव

सचिव-कैलास भोरडे

शिवरकर हे गेले १५ वर्षापासून ग्राहक चळवळीत कार्यरत असून,यापूर्वीही ते संघटनेत विविध पदावर कार्यरत होते.

या बैठकीसाठी मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष धनंजय गायकवाड, उपाध्यक्ष सौ.उर्मिला देऊळगावकर ,संघटनमंत्री बाळासाहेब औटी, कोषाध्यक्ष विलास लेले , प्रवासी समीतीचे प्रमुख अँड.तुषार झेंडे,माजी जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर ,कार्यकारिणी सदस्य दिलिप फडके आदी मान्यवर विशेष उपस्थित होते.

घोडेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई ते पोलीस नाईक पदावर पदोन्नती मिळाल्यांचा सत्कार

सिताराम काळे, घोडेगाव- कोरोनाच्या बंदोबस्तामुळे प्रचंड तणावात असलेल्या पोलीस कर्मचा-यांना पदोन्नतीचा सुखद धक्का बसला. यामध्ये घोडेगाव पोलीस ठाण्यातील दत्तात्रय किसन जढर व अविनाश विठ्ठल कालेकर यांची सेवाजेष्ठतेनुसार पोलीस शिपाई ते पोलीस नाईक पदावर पदोन्नती मिळाली आहे.

घोडेगाव पोलीस ठाण्यातील पदोन्नती झालेले पोलीस अंमलदार यांचे घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरीता त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच घोडेगाव पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक पदी नव्याने रूजु झालेले लहु शिंगाडे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

याप्रसंगी सहायक फौजदार युवराज भोजणे, नवनाथ वायाळ, जिजाराम वाजे, कोंडाजी रेंगडे, तानाजी घुले, पोलीस हवालदार शंकर तळपे, मनिषा तुरे, देवराम धादवड, महेश झनकर, संपत तायगुडे, अनिल बकरे, बाळासाहेब पवार, अर्जुन यादव, दिपक काशिद, संदिप लांडे, अमोल काळे, आतिष काळे, शांताराम तांगडे, नागदेव ढेंगळे, मंगल शिंदे, सरला सरकुले, सोनाली रघतवान, संगिता मधे, वृषाली भोर, छाया काळे, स्वप्नील कानडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

दौंड पोलिसांच्या वतीने पोलीस पाटलांचा सन्मान

दिनेश पवार, दौड

कोरोना प्रादुर्भावाच्या वेळी प्रत्येक गावात कायदा व सुव्यवस्था,शांतता टिकवण्यासाठी पोलिसांना सतत मदत करणाऱ्या,पोलीस पाटलांचा यथोचित सन्मान दौंड पोलिसांच्या वतीने दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक पालवे,लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला,पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गावात कोरोना विषयी जनजागृती करणे,घडणाऱ्या घटनांची माहिती पोलिसांना देणे,गावात नव्याने आलेल्या व्यक्तींची खबर देणे तसेच गावातील शांतता टिकवण्यासाठी, अघटित घटना घडू नये यासाठी ग्रामसुरक्षा दलाच्या सहकार्याने वेळोवेळी सतर्क राहणे, गस्त घालणे ही महत्वपूर्ण कामे पोलीस पाटलांनी केली आहे, त्यामुळे पोलीस पाटील हे पद गावातील शांततेसाठी महत्वाचे आहे त्यांचे कार्य पाहून दौंड पोलीस यांनी पोलीस पाटलांचा सन्मानपत्र देऊन सन्मान केला.

यावेळी पोलीस निरीक्षक यांनी उपस्थित पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले व येणाऱ्या आगामी ग्रामपंचायत निवडणूका व्यवस्थित पार पाडण्यासाठी काही सूचना व मार्गदर्शन केले यावेळी पोलीस पाटलांनी देखील आपल्या समस्या मांडल्या.

इंधन दरवाढ नियंत्रणासाठी खेड तालुका राष्ट्रवादी पदवीधर संघाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन

राजगुरुनगर-आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 2009 च्या तुलनेत खूप कमी असतानाही आपल्या देशात इंधनाचे भाव इतके जास्त आहेत इंधन दरवाढीचा फटका व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत असून इंधनाचे दर आटोक्यात आणावे अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघ खेड तालुका यांनी केली असून याबाबतचे निवेदन त्यांनी खेड तालुक्याचे तहसीलदार यांना दिले आहे.

राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश अध्यक्ष सुनिलदादा पाटील साहेब
यांच्या आव्हानानुसार पेट्रोल डिझेल दरवाढीचा केंद्र सरकारच्या विरोधात आज खेड तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या वतीने कैलास दादा सांडभोर (खेड तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी) यांच्या मार्गदर्शनाखाली इंधन दरवाढ विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्त खेड तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पदवीधर संघाच्या वतीने इंधन दरवाढ नियंत्रणात आणण्याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी कैलासदादा सांडभोर (अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेड तालुका), मनिषाताई टाकळकर (सरचिटणीस, पुणे जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर संघ),विवेक शिवाजी मोहिते पाटील(खेड तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर संघ), अॅड. दिपाली वाळूंज (खेड तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर संघ),संदिप बढे (उपाध्यक्ष , राष्ट्रवादी पदवीधर संघ खेड तालुका),अनिकेत मंडलिक (खेड तालुका सरचिटणीस राष्ट्रवादी पदवीधर संघ),सुभाष होले ( शहर अध्यक्ष राजगुरुनगर )सतीष नाईकरे उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

प्रमोद दांगट निरगुडसर

आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग फाट्यावर वाळुंजवाडी रोडवर, धामणी गावच्या हद्दीत धामणी फाटा येथे जय मल्हार हॉटेल च्या पाठीमागे व अवसरी बुद्रुक गावच्या हद्दीत पहाडदरा रोड लगत हॉटेल एकांत च्या बाजुला अवैधरित्या दारू विक्री करत असलेल्या व्यक्तींवर मंचर पोलिसांनी रविवार दि २० रोजी कारवाई केली आहे. या तीनही कारवाईत ३ लाख रुपयांची तवेरा गाडी व ४ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव काशिंबेग येथे विश्वास दगडू शेळके वय ३८ राहणार वाळुंजवाडी ता.आंबेगाव जिल्हा पुणे हा मंचर ते घोडेगाव रोडवर आपल्या एम.एच.४६ एन.११९४ या तवेरा गाडीत बेकायदेशीर रित्या दारूची वाहतूक करत होता पोलिसांनी त्याच्या गाडीची तपासणी केली असता गाडीत २४९६ रुपये किमतीची देशी संत्रा दारू सापडली आहे. याबाबत पोलीस शिपाई पुंडलिक हरिभाऊ मराडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस हवालदार एस. आर.मांडवे करत आहे.

धामणी गावच्या हद्दीत धामणी फाटा येथे असलेल्या जय मल्हार हॉटेल च्या पाठीमागे राहुल सुभाष जाधव (वय ३३ रा.धामणी ता. आंबेगाव जिल्हा पुणे) हा देशी दारू विकत होता पोलिसांनी त्यांच्याकडून ५७२ रुपयांची देशी दारू जप्त केली आहे.याबाबत पो. ना.टी. एस. हागवणे यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

अवसरी बुद्रुक गावच्या हद्दीत असलेल्या पहाडदरा रोड लगत होटेल एकांतच्या बाजूला मनोज शंकर चव्हाण (वय ३४ रा.अवसरी बुद्रुक ता.आंबेगाव जिल्हा पुणे) हा अवैधरित्या दारूविक्री करत होता पोलिसांनी त्याच्याकडून ९४४ रुपयांच्या विविध कंपनीच्या दारू बॉटल जप्त केल्या आहेत. याबाबत प्रशांत जिजाभाऊ भोईर यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस हवालदार गणेश डावखर करत आहे

रोड रोलरला मोटारसायकलची जोरदार धडक : वाडा येथील दुचाकीस्वार जागीच ठार

राजगुरुनगर , प्रमोद दांगट

आंबेगाव तालुक्यातील पेठ /कुरवंडी रस्त्यावर दुचाकी चालकाने रस्ताचे काम करणाऱ्या रोलरला पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना रविवार (दि .२०) रोजी घडली आहे.मारुती धोंडीभाऊ सुतार (वय ४० रा.पावडेवाडी वाडा,ता.खेड जि पुणे) हे अपघातामध्ये ठार झाले असून या बाबत हनुमंत धोंडिभाऊ सुतार यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की मारुती सुतार हे त्याची ड्रीम युगा ही दुचाकी ( एम.एच.१४ ई.टी.४९०४) घेऊन पेठ कडून कुरवंडीकडे जात असताना ते भरधाव वेगात होते रस्त्याचे काम सुरू असलेल्या रोडवर कडेला उभा केलेला रोलरला त्यांनी पाठीमागून धडक दिली या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा म्रुत्यू झाला आहे. या घटनेचा पुढील तपास सहा फौजदार के.पी.कड करत आहेत

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बेलवाडीत ३०७ जणांचे रक्तदान

अमोल भोसले उरुळी कांचन

बेलवाडी येथे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरामध्ये ३०७ जणांनी रक्तदान केले.

यावेळी भरणे म्हणाले की राष्ट्रवादी युवक काँग्रेसचां हा स्तुत्य उपक्रम आहे असे युवक संघटन तालुक्यात चांगले काम करत आहे. रक्तदान ही एक चळवळ आहे. रक्त हे कोणत्या कंपनी मध्ये तयार होत नाही ते अशा शिबिरांमधून संकलित केले जाते त्यामुळे नागरिकांनी वर्षातून दोनदा रक्तदान केले पाहिजे असे आवाहन भरणे यांनी केले.
शिबिराचे आयोजन इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड‌.शुभम निंबाळकर यांनी केले होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण भैय्या माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील,नेचर डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई, कांतीलाल जामदार,सर्जेराव जामदार, इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, ॲड.सचिन वाघ,युवक कार्याध्यक्ष सचिन खामगळ,
ॲड अमरसिंह मारकड, योगेश पाटील, अजय सपकाळ , सरपंच माणिक जामदार, उपसरपंच नानासाहेब पवार, यशवंत जामदार, हनुमंत खैरे, महिपती यादव,केशव नगरे, सचिन पवार, ओंकार जामदार, दादा यादव,जावेद मुलाणी,सुमित जगताप, कल्याण जामदार, मयुर जामदार,धीरज निंबाळकर,अभि यादव, आदिजण उपस्थित होते. यावेळी सभापती प्रवीण माने म्हणाले की रक्तदान करणे ही काळाची गरज आहे ती ओळखून नागरिकांनी युवकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले पाहिजे. आपले एक रक्तदान कोणाचे तरी प्राण वाचवू शकते त्यामुळे रक्तदान हे पुण्याचे काम आहे.

बेलवाडी मारुती मंदिरासाठी १५ लाख व जोतिबा मंदिरासाठी १० लाख रुपये निधी देण्याचे आश्वासन यावेळी भरणे यांनी दिले.

चास येथे सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या,नव-यासह चौघांवर गुन्हा दाखल

सिताराम काळे,घोडेगाव
– सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने घोडनदी पात्रातील पाण्याने भरलेल्या कुंडात उडी मारून आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना आंबेगाव तालुक्यातील चास गावात घडली. या प्रकरणी नव-यासह चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन तिघांना घोडेगाव पोलीसांनी अटक केली आहे.

अनिता शेखर रोकडे (वय-३३) असं आत्महत्या करणा-या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी नवरा शेखर रोकडे, सासु पुष्पा रोकडे, दीर प्रफुल्ल रोकडे (सर्व रा. चेंबुर, मुंबई) व विमल पांचाळ (रा. भिवंडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पती, सासू व दीर यांना घोडेगाव पोलीसांनी अटक केली आहे.अनिताचे वडील अशोक यादव यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेली माहितीनुसार, अनिता रोकडे या चेंबूर मुंबई येथे पतीबरोबर राहत होती. घरच्यांच्या जाचाला कंटाळून त्या चास येथे आल्या होती. पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या कारणावरून तिचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास करून तिला जगणे असहय करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तिने घोडनदीचे पात्रात पाण्याने भरलेल्या कुंडात उडी मारून आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे करीत आहे.