अखिल भारतीय ग्राहक पंचायत हवेली तालुका अध्यक्षपदी संदीप शिवरकर व संघटकपदी गणेश सातव

वाघोली-अखिल भारतीय ग्राहक पंचायत,हवेली तालुका अध्यक्षपदी आळंदी म्हातोबा येथील संदीप शिवरकर यांची तर संघटकपदी वाघोली (आव्हाळवाडी) येथील गणेश सातव यांची निवड करण्यात आली आहे.

पुणे येथील मध्यवर्ती कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा बैठकीत जिल्हाध्यक्ष दिलिप निंबाळकर यांनी नवनियुक्त तालुका कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांची नावे जाहीर केली.त्यानंतर उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कार्यकारणीतील पदाधिकारी व सदस्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

हवेली तालुका कार्यकारणी खालीलप्रमाणे.

अध्यक्ष-संदीप शिवरकर
उपाध्यक्ष-विठ्ठल आण्णा ठोंबरे

संघटक-गणेश सातव

सचिव-कैलास भोरडे

शिवरकर हे गेले १५ वर्षापासून ग्राहक चळवळीत कार्यरत असून,यापूर्वीही ते संघटनेत विविध पदावर कार्यरत होते.

या बैठकीसाठी मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष धनंजय गायकवाड, उपाध्यक्ष सौ.उर्मिला देऊळगावकर ,संघटनमंत्री बाळासाहेब औटी, कोषाध्यक्ष विलास लेले , प्रवासी समीतीचे प्रमुख अँड.तुषार झेंडे,माजी जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर ,कार्यकारिणी सदस्य दिलिप फडके आदी मान्यवर विशेष उपस्थित होते.

Previous articleघोडेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई ते पोलीस नाईक पदावर पदोन्नती मिळाल्यांचा सत्कार
Next articleमाहिती सेवा समितीच्या वतीने गणेश गायकवाड यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित