आंबेगाव तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

प्रमोद दांगट निरगुडसर

आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग फाट्यावर वाळुंजवाडी रोडवर, धामणी गावच्या हद्दीत धामणी फाटा येथे जय मल्हार हॉटेल च्या पाठीमागे व अवसरी बुद्रुक गावच्या हद्दीत पहाडदरा रोड लगत हॉटेल एकांत च्या बाजुला अवैधरित्या दारू विक्री करत असलेल्या व्यक्तींवर मंचर पोलिसांनी रविवार दि २० रोजी कारवाई केली आहे. या तीनही कारवाईत ३ लाख रुपयांची तवेरा गाडी व ४ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव काशिंबेग येथे विश्वास दगडू शेळके वय ३८ राहणार वाळुंजवाडी ता.आंबेगाव जिल्हा पुणे हा मंचर ते घोडेगाव रोडवर आपल्या एम.एच.४६ एन.११९४ या तवेरा गाडीत बेकायदेशीर रित्या दारूची वाहतूक करत होता पोलिसांनी त्याच्या गाडीची तपासणी केली असता गाडीत २४९६ रुपये किमतीची देशी संत्रा दारू सापडली आहे. याबाबत पोलीस शिपाई पुंडलिक हरिभाऊ मराडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस हवालदार एस. आर.मांडवे करत आहे.

धामणी गावच्या हद्दीत धामणी फाटा येथे असलेल्या जय मल्हार हॉटेल च्या पाठीमागे राहुल सुभाष जाधव (वय ३३ रा.धामणी ता. आंबेगाव जिल्हा पुणे) हा देशी दारू विकत होता पोलिसांनी त्यांच्याकडून ५७२ रुपयांची देशी दारू जप्त केली आहे.याबाबत पो. ना.टी. एस. हागवणे यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

अवसरी बुद्रुक गावच्या हद्दीत असलेल्या पहाडदरा रोड लगत होटेल एकांतच्या बाजूला मनोज शंकर चव्हाण (वय ३४ रा.अवसरी बुद्रुक ता.आंबेगाव जिल्हा पुणे) हा अवैधरित्या दारूविक्री करत होता पोलिसांनी त्याच्याकडून ९४४ रुपयांच्या विविध कंपनीच्या दारू बॉटल जप्त केल्या आहेत. याबाबत प्रशांत जिजाभाऊ भोईर यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस हवालदार गणेश डावखर करत आहे

Previous articleरोड रोलरला मोटारसायकलची जोरदार धडक : वाडा येथील दुचाकीस्वार जागीच ठार
Next articleइंधन दरवाढ नियंत्रणासाठी खेड तालुका राष्ट्रवादी पदवीधर संघाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन