दौंड पोलिसांच्या वतीने पोलीस पाटलांचा सन्मान

दिनेश पवार, दौड

कोरोना प्रादुर्भावाच्या वेळी प्रत्येक गावात कायदा व सुव्यवस्था,शांतता टिकवण्यासाठी पोलिसांना सतत मदत करणाऱ्या,पोलीस पाटलांचा यथोचित सन्मान दौंड पोलिसांच्या वतीने दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक पालवे,लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला,पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गावात कोरोना विषयी जनजागृती करणे,घडणाऱ्या घटनांची माहिती पोलिसांना देणे,गावात नव्याने आलेल्या व्यक्तींची खबर देणे तसेच गावातील शांतता टिकवण्यासाठी, अघटित घटना घडू नये यासाठी ग्रामसुरक्षा दलाच्या सहकार्याने वेळोवेळी सतर्क राहणे, गस्त घालणे ही महत्वपूर्ण कामे पोलीस पाटलांनी केली आहे, त्यामुळे पोलीस पाटील हे पद गावातील शांततेसाठी महत्वाचे आहे त्यांचे कार्य पाहून दौंड पोलीस यांनी पोलीस पाटलांचा सन्मानपत्र देऊन सन्मान केला.

यावेळी पोलीस निरीक्षक यांनी उपस्थित पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले व येणाऱ्या आगामी ग्रामपंचायत निवडणूका व्यवस्थित पार पाडण्यासाठी काही सूचना व मार्गदर्शन केले यावेळी पोलीस पाटलांनी देखील आपल्या समस्या मांडल्या.

Previous articleइंधन दरवाढ नियंत्रणासाठी खेड तालुका राष्ट्रवादी पदवीधर संघाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन
Next articleघोडेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई ते पोलीस नाईक पदावर पदोन्नती मिळाल्यांचा सत्कार