घोडेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई ते पोलीस नाईक पदावर पदोन्नती मिळाल्यांचा सत्कार

सिताराम काळे, घोडेगाव- कोरोनाच्या बंदोबस्तामुळे प्रचंड तणावात असलेल्या पोलीस कर्मचा-यांना पदोन्नतीचा सुखद धक्का बसला. यामध्ये घोडेगाव पोलीस ठाण्यातील दत्तात्रय किसन जढर व अविनाश विठ्ठल कालेकर यांची सेवाजेष्ठतेनुसार पोलीस शिपाई ते पोलीस नाईक पदावर पदोन्नती मिळाली आहे.

घोडेगाव पोलीस ठाण्यातील पदोन्नती झालेले पोलीस अंमलदार यांचे घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरीता त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच घोडेगाव पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक पदी नव्याने रूजु झालेले लहु शिंगाडे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

याप्रसंगी सहायक फौजदार युवराज भोजणे, नवनाथ वायाळ, जिजाराम वाजे, कोंडाजी रेंगडे, तानाजी घुले, पोलीस हवालदार शंकर तळपे, मनिषा तुरे, देवराम धादवड, महेश झनकर, संपत तायगुडे, अनिल बकरे, बाळासाहेब पवार, अर्जुन यादव, दिपक काशिद, संदिप लांडे, अमोल काळे, आतिष काळे, शांताराम तांगडे, नागदेव ढेंगळे, मंगल शिंदे, सरला सरकुले, सोनाली रघतवान, संगिता मधे, वृषाली भोर, छाया काळे, स्वप्नील कानडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleदौंड पोलिसांच्या वतीने पोलीस पाटलांचा सन्मान
Next articleअखिल भारतीय ग्राहक पंचायत हवेली तालुका अध्यक्षपदी संदीप शिवरकर व संघटकपदी गणेश सातव