Home Blog Page 368

सावता दिनदर्शिकाचे रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते प्रकाशन

सुचिता भोसले,पुणे- माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्यच्या आधारस्तंभ सौ रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते सावता दिनदर्शिका २०२१ चे प्रकाशन करण्यात आले

यावेळी  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्ता भाऊ माळी, महिला प्रदेश कार्याध्यक्ष सौ रुपालीताई रायकर निवदेकर, प्रदेश संघटक ज्ञानदेव शिंदे, महिला प्रदेश संघटक सौ रेखा ताई मोहोळकर, बिझनेस आघाडीचे प्रदेश सचिव बालाजी वहिल, युवक प्रदेश प्रवक्ते मनोज गुंजाळ आणि पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अमर माळी उपस्थित होते.

कै.अर्जुनराव टाकळकर यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण संपन्न

राजगुरुनगर-हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा मनिषाताई पवळे ( टाकळकर ) यांचे वडील कै.अर्जुनराव जयवंत टाकळकर यांच्या स्मरणार्थ व रक्षाविधित नवीन वर्ष तसेच द्वितीय मासानिमित्त उदात्त प्रेरणेने वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी रानमळा पॅटर्नचे पुरस्कर्ते पी.टी.शिंदे गुरुजी,११०वेळा रक्तदान केलेले सुनील वाळुंज,मिलिंद शिंदे ,रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल वाळुंज,संदीप पवळे,चिखले सर,लक्ष्मन म्हसाडे, कैलास दुधाळे,शिवाजी टाकळकर, उद्योजक सुभाषशेठ टाकळकर , शांताताई पवळे , वनिता टाकळकर, भीमाशंकर टाकळकर,महेश टाकळकर, सौ.प्रतिभा महेश टाकळकर आणि सौ.मनीषा संदीप पवळे व परिवारातील इतर सदस्य उपस्थित होते.

नारायणगावात एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असणा-या दोन चोरट्यांना पोलीसांनी रंगेहात पकडले

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव बस स्थानका समोरील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्नात असलेल्या दोन चोरट्यांना नारायणगाव पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. ही घटना बुधवार दि ३० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.
नारायणगाव येथे काही दिवसांपूर्वी पुणे नाशिक महामार्गावरील आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीन ची चोरी करत असताना पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना तेथून पळ काढावा लागला त्यामुळे एटीएम मधील रक्कम सुरक्षित राहिली.

सध्या पुणे जिल्ह्यात तसेच इतर ठिकाणी ए.टी.एम. चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे  हद्दीमधील रात्र गस्त अधिकारी कर्मचारी यांनी जास्त लक्ष हे ए.टी.एम.व बंद फ्लॅट मध्ये चोरी होवू नये या वर ठेवण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी याबबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंघाने दि.३०/१२/२०२० चे सेक्टर आधिकारी पो. उपनिरीक्षक हिंगे,  पोलीस नाईक दिनेश साबळे , पो.नाईक शेख, होमगार्ड ठोबळे, सातपुते, पठाण, ताजणे असे रात्र गस्त व ए.टी.एम चेक करत होते. यावेळी होमगार्ड ठोबळे, पठाण यांना एस.बी.आय.ए.टी.एम मध्ये दोन इसम एटीएम मशीन चे शटर अर्धे लावून आतमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी लागलीच प्रसंगावधान राखून होमगार्ड ठोबळे व पठाण यांनी शटर खाली ओढुन बंद केले. त्याच दरम्यान आतील इसमाने त्याच्या जवळील लोखडी टॉमी ने होमगार्ड ठोबळे यांच्या हातावर मारून दुखापत केली.

याबाबत  सहाय्यक पो.निरीक्षक दत्तात्रय गुंड यांना माहिती देऊन लागलीच पो. उपनिरीक्षक हिंगे, पोलीस नाईक दिनेश साबळे,पो.ना. लोंढे, पो.ना. शेख, पो.ना.काळूराम साबळे, पो.कॉ. दुपारगुडे, कोबल, अरगडे,लोहोटे, जायभाये, वाघमारे, कोतकर होमगार्ड ढवळे, खंडे पोलिसमित्र भरत मुठे, ईश्वर पाटे ऋषिकेश कुंभार व इतर २० ते ३० असे त्या ठिकाणी जमा झाले.
या घटनेतील आरोपी हे सराईत असून त्यांच्याकडे हत्यार असल्याची शक्यता असल्याने सुरक्षीततेबाबत योग्य ती खबरदारी घेऊन पो.ना.लोंढे,पो ना साबळे,पो.कॉ वाघमारे, कोबल यांनी शटर वर करून सदर आरोपीना ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणले.
त्यातील आरोपी १) राहूल वसंत सुपेकर मुळ रा निघोज पठारवाडी ता. पारनेर, जि नगर सध्या रा रांजणगाव एम.आय.डी.सी.२) बाजीराव बाळासाहेब नागरगोजे मुळ रा चिंचपुर ता पाथर्डी जि नगर सध्या रा रांजणगाव ता शिरूर जि पुणे यांना ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि कलम ३५३,३३२,३८०,४२७, ५११,३४ वगैरे कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.उपनिरीक्षक हिंगे हे करत आहे.

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक आभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक पाटील, उपविभागीय पो. अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड , पो. उपनिरीक्षक हिंगे, पोलीस नाईक दिनेश साबळे,पो.ना. लोंढे, पो.ना. शेख, पो.ना.काळूराम साबळे, पो.कॉ. दुपारगुडे, कोबल, अरगडे,लोहोटे, जायभाये, वाघमारे, कोतकर होमगार्ड ढवळे, खंडे यांनी केली आहे.

शेतक-यांमध्ये बदल घडवायचा असेल तर गटशेतीचा प्रयोग उपयुक्त-डॉ.भगवानराव कापसे

सिताराम काळे,घोडेगाव- सामान्य शेतक-यांमध्ये बदल घडवायचा असेल तर गटशेतीचा प्रयोग उपयुक्त असून शेतक-यांनी याचा अवलंब केला पाहिजे असे मत कृषीतज्ञ व आंबा अभ्यासक डॉ.भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले.

आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील आंबा बागायतदारांना लागवड ते निर्यात याबाबत जुन्नर येथे त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यु काळे, कृषी अधिकारी सुहास काळे, आंबा बागतदार रामभाऊ ढोले, नितीन काळे, प्रशांत काळे, मिलींद काळे, मंगेश हाडवळे इत्यादी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ.कापसे म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या दोन दशकात केसर आंबा लागवड, मशागत तसेच निर्यातीच्या बाबतीत लोक जागृक झाले असून लागवडी वाढल्या आहेत. तसेच गेल्या तीन ते चार वर्षात आंबा पिकात अमुलाग्र बदल झाले असून शेतकरी या पिकाकडे वळू लागले आहेत. आंबा पिक गटशेतीमध्ये केल्यास प्रभावी ठरु शकते यासाठी शेतक-यांनी एकत्र येवून आंबा पिक घेतले पाहिजे.

भारत व इस्त्राईल यांच्या समन्वयाने फळ संशोधन केंद्र हिमायतबाग औरंगाबाद येथे केशर आंबा गुणवत्ता केंद्राची सुरवात केली आहे. या प्रकल्पात आधुनिक आंबाबाग उभारणी, घणन लागवड, योग्य खुंटांची निवड, छाटणी, विद्राव्य खतांचा वापर, जुन्या बागांचे नूतनीकरण यांचा अभ्यास केला जातो. यावर संशोधन करून आंबा लागवड ते निर्यात हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनचा डॉ.पंजाबराव देशमुख राज्यपुरस्कार मिळाला असल्याचे यावेळी डॉ.कापसे यांनी सांगितले.

शिक्रापूर येथील पाबळ चौकात असलेल्या स्टेट बँकेचे एटीएम मशिन अज्ञात चोरट्यांनी पळवले

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पाबळ चौकात असलेल्या स्टेट बँकेच्या दोन एटीएम मशिन अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी (दि. २५) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास फोडून त्यामधील सुमारे १९ लाख ५० हजार रुपये व एक एटीएम मशिन स्कॉर्पिओ गाडीत टाकून पळ काढला. याबाबत सकाळी माहिती कळताच घटनास्थळी शिक्रापूर पोलिसांनी पाहणी केली. शिक्रापूर येथे स्टेट बँकेचे एटीएम मशिन फोडून लाखो रुपयांची चोरी होण्याची ही दुसरी घटना आहे. या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड नसल्याने चोरीचे प्रकार वाढत आहेत.

शुक्रवारी बँकेला सुटी असल्यामुळे सकाळी उघडकीस आलेला प्रकार समजूनदेखील अधिकारीवर्ग उशिरा आला. मशिनमधील १९ लाख ५० हजार व अडीच लाखांची मशिन असा सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल रक्कम चोरीला गेला. तीन चोरटे पहाटेच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीमधून आले. एटीएम सेंटरजवळ गाडी लावून त्यांनी ही चोरी केली. महिलेच्या वेशात येऊन त्यांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्हीमध्ये आढळून आले. या घटनेचा तपास शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक एन. वी. रानगट करीत आहेत.

लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्यावतीने पोलीस पाटीलांचा प्रशंसापत्र देऊन गौरव

अमोल भोसले,उरुळी कांचन

राज्यात कोरोना महामारीच्या काळात पोलीस पाटलांनी आपपल्या गावात जबाबदारीने काम केले. त्यामुळे पोलीस, महसूल व आरोग्य विभागाला मोठी मदत झाली. यापुढेही पोलीस पाटलांनी प्रशासनाला सहकार्य करावे. पोलीस पाटलांनी सुद्धा चांगले काम केले आहे असे प्रतिपादन लोणी काळभोर (ता.हवेली) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी केले.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या हस्ते लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील यांना प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी मार्गदर्शन करताना बंडगर बोलत होते.

कोरोना काळात सर्वच गावातील पोलीस पाटलाचे काम उल्लेखनीय आहे. पोलीस पाटलांनी कोणत्याही सुरक्षेशिवाय कोरोना निर्मूलनसाठी मोठा सहभाग घेतला. शासनाने दिलेली सर्व जबाबदारी पोलीस पाटील यांनी समर्थपणे पार पाडली. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या वतीने लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटलांना प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय बोरकर, पोलीस पाटील दादा काळभोर, विजय टिळेकर, रोहिणी हांडे, वर्षा कड, दत्ता चौधरी, मिलिंद कुंजीर, मोहन कुंजीर, प्रियंका भिसे, सोनाली शिवरकर, रेश्मा कांबळे, स्वाती गायकवाड आदी उपस्थित होते.

भांडवलदारांच्या हातात देशाचे अर्थकारण जात असल्याची भीती – खासदार डॉ. अमोल कोल्हे

 नारायणगाव (किरण वाजगे)

भांडवलदारांच्या हातात देशाचे अर्थकारण जात असल्या मुळेच भारत देश आर्थिक दृष्ट्या डबघाईला जात असल्याची भीती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली

अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर तालुका यांच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नारायणगाव येथे ग्राहक जागरण मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे बोलत होते. यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.


यावेळी बोलताना खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी ग्राहकाची अज्ञानातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहून ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राची मदत घेण्याचे आवाहन केले.मोजक्या मुठभर उद्योगपतींच्या व भांडवलदारांच्या हातात देशाचे अर्थकारण जात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. आपण मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला असल्यामुळे कुठल्याही व्यवसायास जोपर्यंत नैतिक अधिष्ठान असते तोपर्यंत व्यापाऱ्याचे अथवा ग्राहकाचे हित बाधित होत नाही. परंतु ज्यावेळी नफेखोरीची नशा लागते तेथे ग्राहक भरडला जातो. नैसर्गिक तेल व वायू , एअरपोर्ट, संरक्षण सामग्रीचे उत्पादन यांचे लिलाव झाले असून त्यात ठराविक खाजगी कंपन्यांचा सहभाग वाढला आहे. ज्यावेळी अनेक उद्योजकांना समान संधी मिळेल तेव्हा संभाव्य होणाऱ्या निकोप स्पर्धेतून देशाचा विकास होईल.
प्रत्येक व्यक्ती ग्राहक आहे. ग्रामीण भागातील गरीब व शेतकरी कुटुंबाने कष्ट करून आयुष्यभर जमा केलेल्या पुंजीची फसवणूक झाल्यास ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निश्चित फायदा होईल असे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

केंद्र सरकारने २०१० साली वैद्यकीय अस्थापना कायदा अनेक राज्यात व केंद्रशासित प्रदेशात लागू केलेला आहे. २०१४ ला महाराष्ट्र सरकारने मसुदा तयार केला परंतु ग्राहकांच्या हिताचा हा कायदा अस्तित्वात आला नाही. तसेच उत्पादित मालावर उत्पादन मूल्य छापण्यात यावे तसा कायदा संसदेत आणला पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधींनी संसदेत मागणी करावी असे विचार अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राज्य संघटक बाळासाहेब औटी यांनी व्यक्त केले. ग्राहक पंचायतीचे परिवहन राज्यप्रमुख ॲड.तुषार झेंडे यांनी ग्राहकांचे अधिकार समजावून सांगितले. व ग्राहकाने आपली फसवणूक झाली? असल्याचे लक्षात आल्यास ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून त्याची सोडवणूक करण्यात येईल अशी हमी दिली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब औटी, मार्गदर्शक ॲड. तुषार झेंडे, सरपंच योगेश पाटे, राष्ट्रवादीचे शहर प्रमुख रोहिदास केदारी, नारखेडे साहेब, देवराम तट्टू, वैशाली अडसरे, भास्कर आहेर, गोरक्ष लामखाडे, कौसल्या फापाळे, शैलेश कुलकर्णी, शांताराम हिंगे, रमेश कोल्हे, गणेश वाजगे, पराग हांडे.अजित वाजगे, आदी मान्यवर उपस्थित होते.

आम्हाला रस्ते, पाणी नको बैलगाडा शर्यत पाहिजे – बैलगाडा मालकांची मागणी

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर, आंबेगाव, खेड तसेच हवेली तालुक्यातील बैलगाडा मालकांनी आज (दि.२६) रोजी खासदार डॉ अमोल कोल्हे यांची भेट घेतली.

बैलगाडा शर्यत तात्काळ सुरू करावी यासाठी बैलगाडा मालकांचे सुमारे चाळीस जणांचे शिष्टमंडळ आज खासदार डॉ अमोल कोल्हे यांना भेटण्यासाठी नारायणगाव येथील त्यांच्या कार्यालयात आले होते.

यावेळी खासदार डॉ कोल्हे यांनी बैलगाडा शर्यती साठी आपण संसदेत वेळोवेळी मुद्दे उपस्थित करत आहोत असे सांगितले. तामिळनाडूमध्ये ज्याप्रमाणे जलीकट्टू या स्पर्धेला परवानगी आहे त्याच पद्धतीने चारशे वर्षाची परंपरा असलेल्या बैलगाडा शर्यती ला परवानगी मिळावी अशी मागणी आपण संसदेत वारंवार करत आहोत. गोवंश रक्षण करण्याचा बनाव करणाऱ्या भाजप सरकारला आपण गोवंशाचे किती नुकसान हत आहे, हे सविस्तर दाखवून देणार आहोत.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा राक्षे, बैलगाडा मालक बाळासाहेब आरुडे, बाळासाहेब चव्हाण,  राकेश खैरे,  प्रकाश कबाडी,  रमेश डोंगरे,  समीर वाजगे, राजुशेठ चव्हाण, विजू गायकवाड, के के थोरात, सुरेश मातेले, विकास नायकवडी,  अप्पा जाधवर, जानकू डावखर, सोमनाथ डुंबरे, मयूर वाबळे,  अजित नेहरकर,  गिरीश आवटी, शांताराम अभंग, अजिंक्य सोमवंशी आदी बैलगाडा मालक व गाडाशौकीन उपस्थित होते.

यावेळी एका बैलगाडा मालकाच्या मुलाच्या वाढदिवसाचा केक खासदार डॉक्टर अमोल कोल्हे उपस्थिती मध्ये कापण्यात आला.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर काही बैलगाडा मालकांनी, “बैलगाडावाल्यांना तुम्ही पहिला जीव लावा. आम्ही सांगतो की, तुम्ही बैलगाडा शर्यतीच्या जीवावर पुन्हा खासदार व्हाल, आम्हाला रस्ते नको, सन्मान नको मात्र बैलगाडा शर्यत पाहिजे. अशी मागणी काही बैलगाडा मालकांनी केली. यावर खासदार डॉ कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीविषयी न्यायालयीन प्रक्रिया, पेटा संघटना, याबाबत माहिती देऊन बैलगाडा शर्यती लवकरात लवकर कशा सुरू होती याबाबत माहिती दिली.

निवडणुकीला उभे राहू नका अन्यथा पाहून घेऊ – सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी पवार यांना धमकी

राजगुरुनगर- खेड तालुक्यातील पूर येथील सामाजिक कार्यकर्त्या व द्वारका सेवासदन वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा कल्याणी पवार यांना निवडणुकीला उभे राहू नका अन्यथा पाहून घेऊ अशी धमकी अज्ञात व्यक्तींनी गुरुवार दि. २४ डिसेंबर रोजी रात्री सातच्या सुमारास दिली.

सदर मिळालेल्या माहितीवरून सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी पवार ह्या आपल्या आश्रमातील सदस्यांबरोबर जेवणाची तयारी करत असताना रात्रीच्या वेळी काळोखाचा फायदा घेत अचानक लाल रंगाची चार चाकी आश्रमाबाहेर आली आवाज केला आश्रमातील अनुराग व कल्याणी पवार यांनी बाहेर येऊन पाहिल्यावर मोठमोठ्याने अर्वाच्य भाषेत आवाज करून निवडणुकीला उभे राहू नका अन्यथा पाहून घेऊ अशी धमकी देऊन ताबडतोब पसार झाले दमदाटी करण्यासाठी आलेल्या वाहनातील व्यक्तींनी तोंडाला रुमाल बांधला होता व परिसरातील वीज खंडित असल्यामुळे चेहरा स्पष्ट दिसला नाही. घडलेल्या घटनेमुळे आश्रमात भीतीचे वातावरण पसरले असून कल्याणी पवार यांनी आपल्या जीविताला धोका असल्याचे अर्ज पोलीस ठाणे खेड, तहसिलदार खेड व प्रांत अधिकारी यांना दिला आहे तसेच घडलेली घटना गंभीर असून याबाबत त्यांनी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या गोष्टीची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांनी उभे राहावे की नाही.याबाबत संबंधित घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

गौरव ‘अटल’, ‘भारतरत्न’ कर्मयोगीचा !

पुणे-संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा या वर्षीचा ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांना माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष असून मानपत्र, पुणेरी पगडी आणि एक लाख रुपये गौरवनिधी असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी डॉ. माशेलकर यांच्या पत्नी सौ. वैशाली यांना ही सन्मानीत केले.

याप्रसंगी कोथरूड मतदार संघाचे आमदार,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,खासदार गिरीश बापट,महापौर मुरलीधर मोहळ,भाजपा शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक,आमदार सिद्धार्थजी शिरोळे,माजी राज्यमंत्री दिलीपभाऊ कांबळे,आमदार भीमराव तापकीर,आमदार सुनील कांबळे, उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे,स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,सभागृह नेते गणेश बिडकर,भाजपा संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे,दत्ताजी खाडे,संवादचे सुनील महाजन माजी नगरसेविका मोनिका मोहळ उपस्थित होते.यावेळी सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार करुन पुरस्काराची पार्श्वभूमी सांगत महापौर मुरलीधर मोहळ यांनी प्रास्ताविक केले.

‘देशाला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे अटलजी.कवीमनाचे, साहित्यिक, संवेदनशील मनाचे असे विरोधीपक्षांचेही लाडके अटलजी होते.अटलजींनी दबाव झुगारून अणुचाचणी केली आणि जगाला सांगितले भारत कोणाच्या दबावापुढे झुकणार नाही. अशी जगासमोर भारताची नवी ओळख करून दिली.अटलजींना कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळत नसेल, तर ते डॉ.माशेलकर सरांना विचारायचे. डॉ.माशेलकर सर हे ‘रसायनच’ वेगळे आहे. माशेलकर यांनी भारताची शक्ती ओळखून आपल्या बुद्धीचा उपयोग सामान्यांसाठी केला. ‘हल्दी घाट’ची लढाई जशी इतिहासात प्रसिद्ध आहे, तशीच डॉ.माशेलकर यांनी हळदी आणि बासमती पेटंटसाठी दिलेला लढा बुद्धिवंताना त्यांचा सन्मान देण्यासाठी उपयोगी पडतो आहे, असे उद्गार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
तर पुरस्काराला उत्तर देताना डॉ.माशेलकर सर म्हणाले, ‘आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले, पण कर्मयोगी अटलजींच्या नावाने दिला जाणारा ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार मी विनम्रपणे स्विकारुन संस्कृती प्रतिष्ठानचे आभार मानतो.

‘अटलजी आणि माशेलकर सर यांनी कर्तृत्वाचे उत्तुंग शिखर गाठले. पण त्यांच्यातील नम्रता कमी झाली नाही.महापौर मोहोळ यांची कोरोना काळातील केलेल्या कामाचे कौतुक असून सर्व कुटुंबासह कोरोनाबाधित होऊन ही शहराकडे दुर्लक्ष होवू दिले नाही आणि सर्व विषयाला उत्तम न्याय देणारा महापौर पुण्यनगरीला मिळाले आहेत, अशा शब्दांत मा. चंद्रकांतदादांनी आपली भावना व्यक्त केली.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित ‘गीत नया गाता हूँ’ हा गीत, संगीत आणि नृत्यावर आधारित दृक-श्राव्य कार्यक्रम पार पडला. संवाद पुणेची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर अटलजींच्या रचना सादर केल्या, तर अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी यावर नृत्य सादर केले. या कार्यक्रमाचे संयोजन सुनील महाजन यांनी केले. तर नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांचे आहे. कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियम व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला.