चास येथे सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या,नव-यासह चौघांवर गुन्हा दाखल

सिताराम काळे,घोडेगाव
– सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने घोडनदी पात्रातील पाण्याने भरलेल्या कुंडात उडी मारून आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना आंबेगाव तालुक्यातील चास गावात घडली. या प्रकरणी नव-यासह चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन तिघांना घोडेगाव पोलीसांनी अटक केली आहे.

अनिता शेखर रोकडे (वय-३३) असं आत्महत्या करणा-या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी नवरा शेखर रोकडे, सासु पुष्पा रोकडे, दीर प्रफुल्ल रोकडे (सर्व रा. चेंबुर, मुंबई) व विमल पांचाळ (रा. भिवंडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पती, सासू व दीर यांना घोडेगाव पोलीसांनी अटक केली आहे.अनिताचे वडील अशोक यादव यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेली माहितीनुसार, अनिता रोकडे या चेंबूर मुंबई येथे पतीबरोबर राहत होती. घरच्यांच्या जाचाला कंटाळून त्या चास येथे आल्या होती. पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. या कारणावरून तिचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास करून तिला जगणे असहय करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तिने घोडनदीचे पात्रात पाण्याने भरलेल्या कुंडात उडी मारून आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे करीत आहे.

Previous articleशरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चाकण येथे रक्तदान शिबीर संपन्न
Next articleशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बेलवाडीत ३०७ जणांचे रक्तदान