Home Blog Page 370

शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चाकण येथे रक्तदान शिबीर संपन्न

चाकण-खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जुन्नर आंबेगाव खेड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबीर चाकण मार्केट यार्ड या ठिकाणी संपन्न झाले या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे सभापती विनायक घुमटकर, तालुकाध्यक्ष अध्यक्ष कैलासशेठ सांडभोर, युवक तालुकाध्यक्ष कैलास लिंभोरे, सौ संध्याताई जाधव महिला अध्यक्षा, खेड, मयूरशेठ मोहिते, शाम देशमुख, निलेश देशमुख, गणेश शेवकर, सयाजी गाडेकर, वेंकटेश तात्या सोरटे,मोबिन काझी,  नगरसेवक प्रकाश भुजबळ,नगरसेवक विशाल भाऊ नायकवडी ,पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल नायकवाडी, प्रशांत मुंगसे, मयूर शेठ वाडेकर ,वैभव परदेशी , मंगल ताई जाधव , बाबू भाई शेख हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच कोविंड काळात ज्यांनी रुग्णांची सेवा केली लोकांची सेवा केली अशा १५ लोकांचा कोविड योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला तसेच पाच शिक्षिकांचा ही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्ष राम गोरे यांनी केली.आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले उल्लेखनीय  व कामगिरी केली त्यांचा गौरव केला. आभार जुन्नर आंबेगाव खेड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियनचे अध्यक्ष महेंद्र शेठ गोरे यांनी मानले.

राजगुरूनगर सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक किरण आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

राजगुरूनगर सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक किरण आहेर यांचा वाढदिवस रक्तदान शिबीर आयोजित करून साजरा करण्यात आला. राजगुरूनगर येथील आनंदी आनंद मंगल कार्यालयात १३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात अनेक महिला सदस्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे आयोजन लायन्स क्लब ऑफ राजगुरूनगर आणि किरण आहेर मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र व हेल्मेट भेट देण्यात आले.

किरण आहेर यांना वाढदिवसानिमित्त आमदार दिलीप मोहिते, पंचायत समिती उपसभापती ज्योती अरगडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, भाजप तालुकाध्यक्ष तथा जि. प. सदस्य अतुल देशमुख, काँग्रेस तालुकाध्यक्ष विजय डोळस, राजगुरूनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष विनायक घुमटकर, शिवसेना नेते नितीन गोरे व ऍड. विजयसिंह शिंदे, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. सुरेश कौदरे यांच्यासह सर्वपक्षीय राजकीय व सामाजिक प्रतिनिधींनी आहेर यांना भेटून सदिच्छा दिल्या.

या उपक्रमास लायन्स क्लबचे जिल्हा खजिनदार संतोष सोनावळे व विभागीय अध्यक्ष संजय वाडेकर यांनी भेट देऊन संयोजकांचे कौतुक केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक दायित्वाच्या भावनेतून आहेर यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन केले.

या कार्यक्रमाचे संयोजन क्लबचे अध्यक्ष कुणाल रावळ, खजिनदार नितीन दोंदेकर, सचिव अंबर वाळुंज, डॉ. सागर गुगळीया, सचिन सावंत, किशोर मावळे, शेखर परदेशी, संतोष काळे, राजेंद्र वाळुंज, जितेंद्र सरडे, विकास भुजबळ, दिनेश जंगम, रेवण थिगळे यांनी केले.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रताप ढमाले (कांचन ग्रुप) यांच्यावतीने आरोग्य शिबिर संपन्न

राजगुरुनगर-देशाचे लोकनेते शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कडूस येथे भव्य आरोग्य शिबिराचे आज (दि .२० ) रोजी आयोजित करण्यात आले होते.

या आरोग्य शिबिरात कडूस आणि पंचक्रोशीतील लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला ११५ लोकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतला.हे आरोग्य शिबिर कडूस येथील श्रीकृष्ण मंदिर ,बाजारपेठ येथे आयोजित करण्यात आले होते.या आरोग्य शिबीराचे ब्लडप्रेशर, मधुमेह,प्लस इत्यादी आजारांची तपासणी करण्यात आली.या शिबीराचे आयोजन प्रताप बाळासाहेब ढमाले (कांचन ग्रुप) यांच्यावतीने करण्यात आले होते

या आरोग्य शिबीराचे उद्घाटन आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा.कैलासराव सांडभोर(अध्यक्ष:- खेड तालुका) मा.सौ. कांचनताई प्रताप ढमाले(उपाध्यक्ष:- पुणे जिल्हा महिला ) अरुणशेठ चांभारे ,कैलास लिंभोरे , रमेशशेठ राळे ,अशोकभाऊ शेंडे, किसन भाऊ नेहरे ,ॲड अरुण मुळुक,ॲड मनिषाताई टाकळकर/पवळे ,सुजाताताई पचपिंड,शशिकला ढमाले, सुलभा चिपाडे, वर्षाताई मनोहर बच्चे, दत्ताभाऊ कंद, मनोहर बच्चे, बाळासाहेब बोंबले यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रताप बाळासाहेब ढमाले यांनी केले व आभार अनिकेत धायबर यांनी मानले.

मंचर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष  पोलीस अंमलदार सोमनाथ वाफगावकर यांच्या तत्परतेमुळे मिळाले दहा तोळे सोन्याचे दागिने अवघ्या 2 तासात परत

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

वेळ संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मंचर पोलिसांच्या दैनंदिन काम चालू असताना मंचर पोलीस स्टेशन येथे एक दांपत्य अगदी केविलवाने चेहरे करून डोळ्यातून आसवे वाहत असताना मंचर पोलीस स्टेशनचे दरवाजात उभे ठाकले. त्या वेळी सदर ठिकाणी ड्युटी कामी असलेले पोलीस नाईक तुकाराम मोरे ठाणे अंमलदार अजित मडके हे त्यांचे दैनंदिन कर्तव्य बजावत असताना सदर दांपत्य तिथे आले.

त्यावेळी त्यांनी सांगितले की त्यांचे नाव संजय बजरंग मोहिते आणि त्यांची पत्नी सौ अर्चना संजय मोहिते दोघे राहणार कळंबोली मुंबई हे दिनांक 18/12/2020 रोजी त्यांचे नातेवाइकांचे लग्नासाठी मुंबई येथून टाकळी ढोकेश्वर जिल्हा अहमदनगर येथे गेले होते त्यानंतर आज दिनांक 19/12/2020 रोजी ते लग्न समारंभ आटोपून मुंबई येथे परत जात असताना मंचर पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल रविकिरण येथे कुटुंबियासह चहापान करण्यासाठी सायंकाळी 5 वाजता थांबले होते. त्यानंतर चहापान करून सदर कुटुंब त्यांचे खाजगी वाहनातून मुंबई साठी रवाना झाले सुमारे सहा ते सात किलोमीटर गेल्यानंतर अर्चना संजय मोहिते यांना आठवण झाली की त्यांची सुमारे दहा तोळे सोन्याच्या दागिने आणि मोबाईल असलेली पर्स हॉटेल रविकिरण एकलहरे येथील टेबलवरच राहिली आहे. त्यानंतर त्यांनी गाडी पुन्हा हॉटेल रविकिरण येथे येऊन पाहणी केली असता तेथे त्यांची पर्स जागेवर मिळून आली नाही म्हणून त्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे पाहणी केली असता ते बसले ठिकाणचा कॅमेरा बंद असल्याने सदर कॅमेरामध्ये त्यांना काहीएक माहिती मिळाली नाही त्यामुुळे त्यांनी तात्काळ मंचर पोलीस स्टेशन गाठले त्यावेळी पोलीस नाईक तुकाराम मोरे यांनी त्यांची माहिती घेऊन सदर बाबत तत्काळ पोलीस अमलदार सोमनाथ वाफगावकर याना दिली सोमनाथ वाफगावकर यांनी तात्काळ तत्परता दाखवत त्यांची पूर्ण माहिती घेऊन त्यांचे पर्स मधील मोबाईल चा नंबर हस्तगत करून सायबर पोलिस स्टेशन येथून त्याचे लाईव्ह लोकेशन घेऊन सदर मोबाईल चाकण आळंदी फाटा ते आळंदी रोड च्या दरम्यान असल्याचे समजले त्यानंतर त्यांनी लागलीच हॉटेल रविकिरण चे मालक युवराज शेठ कानडे यांना संपर्क केला त्यावेळी त्यांनी सांगितले की आज हॉटेलमध्ये पुणे येथील एका कुटुंबीयांचे लग्न समारंभ होता त्यावेळी सोमनाथ वाफगावकर यांनी सदर लग्न प्रमुख श्री लक्ष्मण खोसे यांचा मोबाइल नंबर घेऊन त्यांना संपर्क साधून त्यांचे लोकेशन विचारले असता त्यांनी त्यांचे लोकेशन आळंदी परिसरात असलेबाबत सांगितले .

त्यामुळे पोलीस सोमनाथ वाफगावकर यांनी त्यांचे वऱ्हाडचे सर्व गाड्या तत्काळ तेथेच थांबणे बाबत त्यांना सूचना दिल्या आणि गाडीत सदर काळे रंगाचे पर्सची पाहणी करणे बाबत विनंती केली त्यामुळे श्री लक्ष्मण खोसे यांनी त्यांचे वऱ्हाडाची सर्व गाड्या रस्त्यात थांबून सर्व गाड्यांची पाहणी त्यावेळी त्यांचे लक्षात आले की हॉटेल मधील लग्न समारंभ संपले नंतर परत जाताना नजर चुकीने टेबल वर राहिलेली एक काळे रंगाची पर्स त्यांचे गाडीत आली आहे त्यानंतर त्यांनी सोमनाथ वाफगावकर याना संपर्क साधून त्यांची पर्स सुखरूप असलेबाबत कळविले. त्यानंतर सदर मोहिते दाम्पत्याने सदर श्री लक्ष्मणराव खोसे साहेब यांचे घरी जाऊन ती पर्स ताब्यात घेतली असून त्यांचे सर्व 10 तोळे वजनाचे दागिने आणि मोबाइल फोन सुखरूप मिळाल्याने त्यांनी मंचर पोलीस स्टाफ आणि पोलीस अंमलदार सोमनाथ वाफगावकर तसेच श्री लक्ष्मण खोसे आणि महेंद्र खोसे यांचे विशेष आभार मानले त्यावेळी त्यांचे दागिने परत मिळलेले पाहून त्यांचे डोळ्यात आनंद अश्रू मावत नव्हते.

संतापजनक- कांद्याचे रोप येऊ नये म्हणून काळ्या बाहुलीचा वापर करून जादूटोणा

नारायणगाव (किरण वाजगे)
कांदळी (ता.जुन्नर )येथील एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या कांदा रोपावर अज्ञात माथेफिरूने तणनाशक फवारून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान केले आहे. ही घटना ९ डिसेंबर ते १४ डिसेंबर या दरम्यान घडली असावी अशी माहिती या वृद्ध महिलेची मुलगी सुरेखा निघोट यांनी दिली.

याशिवाय या महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन अज्ञात माथेफिरूने या महिलेच्या शेतामध्ये लिंबे कापून ठेवली. तसेच मंगळसूत्र, नारळ, अंडी त्याचप्रमाणे काळ्या बाहुलीची पूजा करून जादूटोणा व मंत्र तंत्राचा वापर केला आहे.
याबाबत हिराबाई हरिभाऊ फुलवडे (रा.कांदळी, तालुका जुन्नर) यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी अज्ञात इसमाला शोधून त्या विरुद्ध ठोस कारवाई करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान जुन्नर तालुक्यात यापूर्वी द्राक्ष बाग, डाळिंबाची बाग अज्ञात माथेफिरुंनी छाटून उद्ध्वस्त केली आहे. तसेच आता कांदा चोरी, बटाटा चोरी, त्याचप्रमाणे कांदा रोपांच्या चोरी पाठोपाठ कांदा रोपांवर तणनाशक फवारणी यासारखा घृणास्पद प्रकार घडला आहे. अशा माथेफिरुंवर कारवाई होईल का असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे. या माथेफिरूंवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी कडून शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचे काम :आढळराव पाटील

किरण वाजगे- नारायणगाव

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचे काम राष्ट्रवादी पक्ष करीत आहे असा आरोप शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नारायणगाव येथे केला.
नारायणगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुका शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्याची बैठक आयोजित करण्यात आली होती . यावेळी प्रमुख मार्गदर्शन उपनेते शिवाजीराव आढळराव यांनी केले.

याप्रसंगी माजी आमदार शरद सोनवणे , तालुका प्रमुख माउली खंडागळे ,नगराध्यक्ष शाम पांडे ,जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे , संभाजी तांबे, दिलीप डुंबरे, शरद चौधरी ,मंगेश काकडे , सरपंच योगेश पाटे , संतोष वाजगे, धनंजय डुंबरे, विविध गावाचे सरपंच , सदस्य , पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते .

राष्ट्रवादी पक्षाकडून जाणून-बुजून अनेक ठिकाणी पक्षात फुट पडण्याचे काम केले जात आहे . काही पदाधिकारी यांना मारहाण , खोटे गुन्हे दाखल केले जात असेल तर खपवून घेतले जाणार नाही , आपण १५ वर्ष लोकप्रतिनिधी आहोत असे असताना विधानपरिषदेच्या निवडणुकीत आपल्याला विचारले गेले नाही अशी खंत व्यक्त करीत पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढविणार अशी घोषणा देखील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नारायणगाव येथे केली .

आढळराव पाटील म्हणाले की , राज्यात आघाडी आहे म्हणून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आघाडी होईल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना वाटत होती. पण स्थानिक राजकारण लक्षात घेता ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढविल्या जातील. आणि सर्व शिवसैनिकांच्या पाठीशी शिवसेना पक्ष खंबीरपणे मागे उभी राहील. असा विश्वास व्यक्त करून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना समाजकारण आणि राजकारणात आणण्याचा हा पाया असून ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे , गेल्या निवडणुकीत जुन्नर तालुक्यात ६६ पैकी ४२ ग्रामपंचायती ताब्यात होत्या , या निवडणुकीत ५० हुन जास्त ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व राहील असा विश्वास आढळराव यांनी व्यक्त्त केला .

यावेळी माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले की, महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेनेला विश्वासात घेत नाही अशी खंत व्यक्त केली . तालुक्यात राष्ट्रवादीकडून शिवसेनेत फुट पाडण्याचे छुपे डावपेच सुरु आहे. महाविकास आघाडी टिकेल का नाही यापेक्षा पक्ष संघटना बळकट करा असे आवाहन सोनवणे यांनी केले .

तालुका प्रमुख माउली खंडागळे म्हणाले की, तालुक्यात ६६ पैकी ४२ ग्रामपंचातीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे . महाविकास आघाडीच्या धोरणांनुसार ग्रामपंचायत पातळीवर जागा वाटप न झाल्यास शिवसेना स्वबळावरच लढणार आहे. असे खंडागळे यांनी सांगितले .
यावेळी मंगेश काकडे ,धनंजय डुंबरे , योगेश पाटे , शाम पांडे , प्रकाश शेटे , पांडुरंग गाडेकर , सह्याद्री भिसे ,उत्तम काशीद यांनी विचार व्यक्त्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय वाव्हळ यांनी केले . तर आभार महेश शेळके यांनी मानले .

अक्षय जाधव यांची मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या खेड तालुका सचिवपदी निवड

राजगुरुनगर- मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन या संघटनेच्या खेड तालुका सचिव पदी अक्षय जाधव यांची निवड करण्यात आली. मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन या देशपातळीवर काम करणाऱ्या संघटनेचे, संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतिश केदारी यांनी त्यांना नियुक्ती पत्र व ओळख पत्र देऊन अक्षय नागेश जाधव यांची सदर संघटनेच्या तालुका सचिव पदी निवड केली.

  सदर संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी अँड.संगिताताई भालेराव, सानी अवसरमल, नारायण राजगुरू, गणपत बालवडकर सुजाता भाटे, राजेश भोसले, रविंद्र वालदे, डॉ. राजाराम बडगे, मनोज खोपडे, महाराष्ट्र अध्यक्ष विष्णू दादा भोसले, तालुकाध्यक्ष किरण गोरे,इत्यादी पदाधिकारी सदर प्रसंगी उपस्थित होते.

राष्ट्रीय मानव दिनाचे औचित्य साधून व सदर संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र व ओळख पत्र वितरण सोहळा गुरुवार दि.१० डिसेंबर रोजी सकाळी ठिक ११ वाजता सी.एम. इंटरनॅशनल स्कुल यशवंतनगर बाणेर येथे घेण्यात आला. सदर कार्यक्रमात अक्षय नागेश जाधव यांची मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन या संघटनेच्या तालुका खेड सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.

सदर कार्यक्रमात शिवाजी म्हस्के अँड. राहुल कदम, स्टीवन जोसेफ, संजय गायकवाड, प्रमोद कांबळे, काळुराम कांबळे यांच्यासह शंभर पदाधिकारी यांना संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतिश केदारी यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र व ओळख पत्र वितरण करण्यात आले.

कनेरसर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला इमारतीसाठी मिळणार 34 लाखाचा निधी

राजगुरुनगर-आमदार भाई गिरकर यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री यांचे कनेरसर ता.खेड येथील जि.प.शाळा इमारतीसाठी 34 लाख निधीचे लिखित उत्तरात ठोस आश्वासन व मागणी मान्य केली आहे.

आमदार भाई गिरकर यांनी विधानपरिषदेत कनेरसर जि.प.शाळा इमारत प्रश्नी दोन वेळा तारांकित प्रश्न उपस्थित केल्यामुळे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चार वर्ग खोल्यांसाठी 34 लाख रूपये निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे सन 2020-21 मध्ये नवीन चार वर्गखोल्या बांधण्यासाठी मागणी केल्याचे लिखित स्वरूपात उत्तर दिले आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक टाव्हरे व विधानभवन सेक्रेटरी राजु खंडीझोड यांच्या पाठपुराव्यानुसार आमदार गिरकर यांनी पुन्हा तारांकित प्रश्न क्रमांक ५९७१उपस्थित केला होता.

इमारत धोकादायक असल्याचे लेखी अहवालात जिल्हा परिषद प्रशासनाने मान्य केले असताना शाळेच्या इमारत बांधकामास सुरूवात का केली नाही अशी विचारणा गिरकर यांनी केली होती,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लेखी उत्तरात इमारत धोकादायक असल्याचे मान्य करून बांधकामास विलंब होण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कनेरसर जि.प.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर म्हसुडगे व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांनी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांना इमारत समस्या सांगितली असता त्यांनी भाजप विधानभवन कार्यालयाला निवेदन दिले.सेक्रेटरी राजु खंडीझोड यांनी शाळेला भेट दिली.आमदार गिरकर यांनी त्यामुळे फेब्रुवारी मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा शाळा इमारत धोकादायक असल्याचे जिल्हा परिषदेने मान्य करून निधीबाबतचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार माजी सरपंच सुधीर माशेरे यांनी आमदार दिलीपराव मोहीते व जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. जि.प.अध्यक्षा पानसरे यांनी शाळेची पाहणी करून आश्वासन दिले होते, परंतु कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हा परिषदेला आरोग्यासाठी निधी तरतुद करावी लागल्याने विलंब होईल या भावनेने अशोकराव टाव्हरे व राजु खंडीझोड यांनी आमदार भाई गिरकर यांची भेट घेतली .गिरकर यांनी पुन्हा प्रश्न उपस्थित करून ग्रामविकास मंत्री यांच्याकडून लिखित उत्तरात ठोस आश्वासन घेतल्याने जिल्हा परिषद शाळा इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी विद्यार्थी, शिक्षक व पालंकामध्ये आशा निर्माण झाली आहे.

ऑनलाइन शिक्षणातील वाढीव फी’तून होणारी लुटमार थांबवा: क्षत्रिय मराठा परिवाराचा आंदोलनाचा इशारा

अतुल पवळे ,पुणे जिल्हा प्रतिनिधी

ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर मोबाईलचा विपरीत परिणाम होत असून ,ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शाळांकडून भरमसाठ फी आकारली जात आहे. यातून गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका असून, ऑनलाइन वाढीव फि ची शाळांची मनमानी थांबवण्यात शिक्षणमंत्र्यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे ,अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा क्षत्रिय मराठा परिवाराच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांना निवेदनाद्वारे देण्यात आला .

कोरोना पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. परंतु याकरिता शाळांकडून वाढीव फी आकारली जात आहे.यातून गरीब कुटुंबावर अन्याय होत आहे ,शाळांनी फी बाबत पालकांना आग्रह करू नये.दबाव आणू नये अशा सूचना व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वी दिलेले आहेत. परंतु त्यानंतरही काही शाळांकडून हा नियम धुडकावून लावला जात आहे. यातून काही शाळांनी फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केले आहे. याबाबत शिक्षण मंत्र्यांनी लक्ष देऊन संबंधित शाळांवर कारवाई करणे गरजेचे आहे. याबाबत प्रदेश प्रमुख विजय मोहिते तसेच जिल्हाप्रमुख वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा व शहर महिलां तर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले .

यावेळी रणरागिनी पुणे जिल्हा प्रिया गायकवाड, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सुषमा पाटील,पुणे शहर अध्यक्षा पूजा पिसाळ, युवक जिल्हा अध्यक्ष दत्ता सपकाळ, जिल्हा उपप्रमुख ओंकार तापकीर बापूसाहेब पाटील प्रमुख आदी उपस्थित होते.

मांडवी ते स्प्लेंडर कंट्री हा एक दिवसाचा रस्ता.. शाहीविवाह सोहळ्यासाठी होता का जीव घेण्यासाठी ?

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मांडवी ते स्प्लेंडर कंट्री दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते, परंतु हे काम फक्त एक दिवसा पुरतेच मर्यादित होते का? असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेला पडला आहे. खडकवासला मतदार संघाच्या आमदारांच्या मुलाचा विवाह सोहळा डावजे येथील विश्वास गड रिसॉर्ट येथे होता. यासाठी तर ह्या एक दिवसाच्‍या रस्त्याचे कामकाज सुरू केले होते? असा प्रश्न ग्रामीण जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

या शाही विवाह सोहळ्यासाठी दिग्गज राजकीय नेते उपस्थित राहणार होते, यासाठी तर हा एक दिवसाच्या रस्त्याचे काम करून करून घेतल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या रस्त्याचे टेंडर घेणाऱ्या ठेकेदाराकडे रस्त्यासाठी लागणारा, कच्चामाल उपलब्ध नव्हता तर त्याचे टेंडर कसे मंजूर झाले? की मंजूर करून घेण्यात आले,असा प्रश्न उपस्थित होतो. मांडवी व बहुली यावरच्या गावातील नागरिकांना जातांना मात्र अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

ह्या एक दिवसाच्या कच्चा कामामुळे या रस्त्यावर डांबर कमी व खडी जास्त टाकण्यात आली होती. ह्या नंतर मात्र हे काम बंद ठेवण्यात आले, व यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता, संबंधित अधिकार्‍याकडून मनाला न पटणारी उत्तर ऐकायला मिळाली. कर जनता भरते मग सुख सुविधा नेत्यांनाच का? किंवा संबंधित ठेकेदाराकडे डांबर उपलब्ध नव्हते तर त्याने काम सुरूच का केले, या रस्त्यामुळे अनेक नागरिक अपघाताला सामोरे गेले याचं नुकसान सार्वजनिक बांधकाम विभाग भरून देणार का, की संबंधित ठेकेदाराकडून भरून घेणार का? ही बाब युवा सेनेचे पदाधिकारी तुषार गायकवाड यांनी खडकवासला मतदार संघाचे प्रमुख नितीन दादा वाघ यांच्या लक्षात आणून दिली.

त्यासंबंधी शिवसेनेचे खडकवासला मतदार संघाचे प्रमुख नितीन दादा वाघ व त्यांचे सहकारी उपतालुकाप्रमुख शिवसैनिक संतोष दादा शेलार आणि शिवसैनिक संतोष पवार यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या रस्त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आठ दिवसात रस्ता सुरू झाला नाही तर शिवसेना खडकवासला मतदार संघातर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. रस्त्याचा खर्च जनतेच्या पैशातून मग सुख सुविधा राजकीय नेत्यांना का? सामान्य नागरिकांचाही अधिकार आहे. विकासा हा जनतेच्या भल्यासाठी असावा जीव घेण्यासाठी नव्हे.