मंचर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष  पोलीस अंमलदार सोमनाथ वाफगावकर यांच्या तत्परतेमुळे मिळाले दहा तोळे सोन्याचे दागिने अवघ्या 2 तासात परत

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

वेळ संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मंचर पोलिसांच्या दैनंदिन काम चालू असताना मंचर पोलीस स्टेशन येथे एक दांपत्य अगदी केविलवाने चेहरे करून डोळ्यातून आसवे वाहत असताना मंचर पोलीस स्टेशनचे दरवाजात उभे ठाकले. त्या वेळी सदर ठिकाणी ड्युटी कामी असलेले पोलीस नाईक तुकाराम मोरे ठाणे अंमलदार अजित मडके हे त्यांचे दैनंदिन कर्तव्य बजावत असताना सदर दांपत्य तिथे आले.

त्यावेळी त्यांनी सांगितले की त्यांचे नाव संजय बजरंग मोहिते आणि त्यांची पत्नी सौ अर्चना संजय मोहिते दोघे राहणार कळंबोली मुंबई हे दिनांक 18/12/2020 रोजी त्यांचे नातेवाइकांचे लग्नासाठी मुंबई येथून टाकळी ढोकेश्वर जिल्हा अहमदनगर येथे गेले होते त्यानंतर आज दिनांक 19/12/2020 रोजी ते लग्न समारंभ आटोपून मुंबई येथे परत जात असताना मंचर पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल रविकिरण येथे कुटुंबियासह चहापान करण्यासाठी सायंकाळी 5 वाजता थांबले होते. त्यानंतर चहापान करून सदर कुटुंब त्यांचे खाजगी वाहनातून मुंबई साठी रवाना झाले सुमारे सहा ते सात किलोमीटर गेल्यानंतर अर्चना संजय मोहिते यांना आठवण झाली की त्यांची सुमारे दहा तोळे सोन्याच्या दागिने आणि मोबाईल असलेली पर्स हॉटेल रविकिरण एकलहरे येथील टेबलवरच राहिली आहे. त्यानंतर त्यांनी गाडी पुन्हा हॉटेल रविकिरण येथे येऊन पाहणी केली असता तेथे त्यांची पर्स जागेवर मिळून आली नाही म्हणून त्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे पाहणी केली असता ते बसले ठिकाणचा कॅमेरा बंद असल्याने सदर कॅमेरामध्ये त्यांना काहीएक माहिती मिळाली नाही त्यामुुळे त्यांनी तात्काळ मंचर पोलीस स्टेशन गाठले त्यावेळी पोलीस नाईक तुकाराम मोरे यांनी त्यांची माहिती घेऊन सदर बाबत तत्काळ पोलीस अमलदार सोमनाथ वाफगावकर याना दिली सोमनाथ वाफगावकर यांनी तात्काळ तत्परता दाखवत त्यांची पूर्ण माहिती घेऊन त्यांचे पर्स मधील मोबाईल चा नंबर हस्तगत करून सायबर पोलिस स्टेशन येथून त्याचे लाईव्ह लोकेशन घेऊन सदर मोबाईल चाकण आळंदी फाटा ते आळंदी रोड च्या दरम्यान असल्याचे समजले त्यानंतर त्यांनी लागलीच हॉटेल रविकिरण चे मालक युवराज शेठ कानडे यांना संपर्क केला त्यावेळी त्यांनी सांगितले की आज हॉटेलमध्ये पुणे येथील एका कुटुंबीयांचे लग्न समारंभ होता त्यावेळी सोमनाथ वाफगावकर यांनी सदर लग्न प्रमुख श्री लक्ष्मण खोसे यांचा मोबाइल नंबर घेऊन त्यांना संपर्क साधून त्यांचे लोकेशन विचारले असता त्यांनी त्यांचे लोकेशन आळंदी परिसरात असलेबाबत सांगितले .

त्यामुळे पोलीस सोमनाथ वाफगावकर यांनी त्यांचे वऱ्हाडचे सर्व गाड्या तत्काळ तेथेच थांबणे बाबत त्यांना सूचना दिल्या आणि गाडीत सदर काळे रंगाचे पर्सची पाहणी करणे बाबत विनंती केली त्यामुळे श्री लक्ष्मण खोसे यांनी त्यांचे वऱ्हाडाची सर्व गाड्या रस्त्यात थांबून सर्व गाड्यांची पाहणी त्यावेळी त्यांचे लक्षात आले की हॉटेल मधील लग्न समारंभ संपले नंतर परत जाताना नजर चुकीने टेबल वर राहिलेली एक काळे रंगाची पर्स त्यांचे गाडीत आली आहे त्यानंतर त्यांनी सोमनाथ वाफगावकर याना संपर्क साधून त्यांची पर्स सुखरूप असलेबाबत कळविले. त्यानंतर सदर मोहिते दाम्पत्याने सदर श्री लक्ष्मणराव खोसे साहेब यांचे घरी जाऊन ती पर्स ताब्यात घेतली असून त्यांचे सर्व 10 तोळे वजनाचे दागिने आणि मोबाइल फोन सुखरूप मिळाल्याने त्यांनी मंचर पोलीस स्टाफ आणि पोलीस अंमलदार सोमनाथ वाफगावकर तसेच श्री लक्ष्मण खोसे आणि महेंद्र खोसे यांचे विशेष आभार मानले त्यावेळी त्यांचे दागिने परत मिळलेले पाहून त्यांचे डोळ्यात आनंद अश्रू मावत नव्हते.

Previous articleसंतापजनक- कांद्याचे रोप येऊ नये म्हणून काळ्या बाहुलीचा वापर करून जादूटोणा
Next articleशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रताप ढमाले (कांचन ग्रुप) यांच्यावतीने आरोग्य शिबिर संपन्न