राजगुरूनगर सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक किरण आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

राजगुरूनगर सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक किरण आहेर यांचा वाढदिवस रक्तदान शिबीर आयोजित करून साजरा करण्यात आला. राजगुरूनगर येथील आनंदी आनंद मंगल कार्यालयात १३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात अनेक महिला सदस्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे आयोजन लायन्स क्लब ऑफ राजगुरूनगर आणि किरण आहेर मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र व हेल्मेट भेट देण्यात आले.

किरण आहेर यांना वाढदिवसानिमित्त आमदार दिलीप मोहिते, पंचायत समिती उपसभापती ज्योती अरगडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, भाजप तालुकाध्यक्ष तथा जि. प. सदस्य अतुल देशमुख, काँग्रेस तालुकाध्यक्ष विजय डोळस, राजगुरूनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष विनायक घुमटकर, शिवसेना नेते नितीन गोरे व ऍड. विजयसिंह शिंदे, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. सुरेश कौदरे यांच्यासह सर्वपक्षीय राजकीय व सामाजिक प्रतिनिधींनी आहेर यांना भेटून सदिच्छा दिल्या.

या उपक्रमास लायन्स क्लबचे जिल्हा खजिनदार संतोष सोनावळे व विभागीय अध्यक्ष संजय वाडेकर यांनी भेट देऊन संयोजकांचे कौतुक केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक दायित्वाच्या भावनेतून आहेर यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन केले.

या कार्यक्रमाचे संयोजन क्लबचे अध्यक्ष कुणाल रावळ, खजिनदार नितीन दोंदेकर, सचिव अंबर वाळुंज, डॉ. सागर गुगळीया, सचिन सावंत, किशोर मावळे, शेखर परदेशी, संतोष काळे, राजेंद्र वाळुंज, जितेंद्र सरडे, विकास भुजबळ, दिनेश जंगम, रेवण थिगळे यांनी केले.

Previous articleशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रताप ढमाले (कांचन ग्रुप) यांच्यावतीने आरोग्य शिबिर संपन्न
Next articleशरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चाकण येथे रक्तदान शिबीर संपन्न