ऑनलाइन शिक्षणातील वाढीव फी’तून होणारी लुटमार थांबवा: क्षत्रिय मराठा परिवाराचा आंदोलनाचा इशारा

अतुल पवळे ,पुणे जिल्हा प्रतिनिधी

ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर मोबाईलचा विपरीत परिणाम होत असून ,ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शाळांकडून भरमसाठ फी आकारली जात आहे. यातून गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका असून, ऑनलाइन वाढीव फि ची शाळांची मनमानी थांबवण्यात शिक्षणमंत्र्यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे ,अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा क्षत्रिय मराठा परिवाराच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांना निवेदनाद्वारे देण्यात आला .

कोरोना पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. परंतु याकरिता शाळांकडून वाढीव फी आकारली जात आहे.यातून गरीब कुटुंबावर अन्याय होत आहे ,शाळांनी फी बाबत पालकांना आग्रह करू नये.दबाव आणू नये अशा सूचना व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वी दिलेले आहेत. परंतु त्यानंतरही काही शाळांकडून हा नियम धुडकावून लावला जात आहे. यातून काही शाळांनी फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केले आहे. याबाबत शिक्षण मंत्र्यांनी लक्ष देऊन संबंधित शाळांवर कारवाई करणे गरजेचे आहे. याबाबत प्रदेश प्रमुख विजय मोहिते तसेच जिल्हाप्रमुख वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा व शहर महिलां तर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले .

यावेळी रणरागिनी पुणे जिल्हा प्रिया गायकवाड, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सुषमा पाटील,पुणे शहर अध्यक्षा पूजा पिसाळ, युवक जिल्हा अध्यक्ष दत्ता सपकाळ, जिल्हा उपप्रमुख ओंकार तापकीर बापूसाहेब पाटील प्रमुख आदी उपस्थित होते.

Previous articleमांडवी ते स्प्लेंडर कंट्री हा एक दिवसाचा रस्ता.. शाहीविवाह सोहळ्यासाठी होता का जीव घेण्यासाठी ?
Next articleकनेरसर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला इमारतीसाठी मिळणार 34 लाखाचा निधी