मांडवी ते स्प्लेंडर कंट्री हा एक दिवसाचा रस्ता.. शाहीविवाह सोहळ्यासाठी होता का जीव घेण्यासाठी ?

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मांडवी ते स्प्लेंडर कंट्री दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते, परंतु हे काम फक्त एक दिवसा पुरतेच मर्यादित होते का? असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेला पडला आहे. खडकवासला मतदार संघाच्या आमदारांच्या मुलाचा विवाह सोहळा डावजे येथील विश्वास गड रिसॉर्ट येथे होता. यासाठी तर ह्या एक दिवसाच्‍या रस्त्याचे कामकाज सुरू केले होते? असा प्रश्न ग्रामीण जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

या शाही विवाह सोहळ्यासाठी दिग्गज राजकीय नेते उपस्थित राहणार होते, यासाठी तर हा एक दिवसाच्या रस्त्याचे काम करून करून घेतल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या रस्त्याचे टेंडर घेणाऱ्या ठेकेदाराकडे रस्त्यासाठी लागणारा, कच्चामाल उपलब्ध नव्हता तर त्याचे टेंडर कसे मंजूर झाले? की मंजूर करून घेण्यात आले,असा प्रश्न उपस्थित होतो. मांडवी व बहुली यावरच्या गावातील नागरिकांना जातांना मात्र अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

ह्या एक दिवसाच्या कच्चा कामामुळे या रस्त्यावर डांबर कमी व खडी जास्त टाकण्यात आली होती. ह्या नंतर मात्र हे काम बंद ठेवण्यात आले, व यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता, संबंधित अधिकार्‍याकडून मनाला न पटणारी उत्तर ऐकायला मिळाली. कर जनता भरते मग सुख सुविधा नेत्यांनाच का? किंवा संबंधित ठेकेदाराकडे डांबर उपलब्ध नव्हते तर त्याने काम सुरूच का केले, या रस्त्यामुळे अनेक नागरिक अपघाताला सामोरे गेले याचं नुकसान सार्वजनिक बांधकाम विभाग भरून देणार का, की संबंधित ठेकेदाराकडून भरून घेणार का? ही बाब युवा सेनेचे पदाधिकारी तुषार गायकवाड यांनी खडकवासला मतदार संघाचे प्रमुख नितीन दादा वाघ यांच्या लक्षात आणून दिली.

त्यासंबंधी शिवसेनेचे खडकवासला मतदार संघाचे प्रमुख नितीन दादा वाघ व त्यांचे सहकारी उपतालुकाप्रमुख शिवसैनिक संतोष दादा शेलार आणि शिवसैनिक संतोष पवार यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या रस्त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आठ दिवसात रस्ता सुरू झाला नाही तर शिवसेना खडकवासला मतदार संघातर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. रस्त्याचा खर्च जनतेच्या पैशातून मग सुख सुविधा राजकीय नेत्यांना का? सामान्य नागरिकांचाही अधिकार आहे. विकासा हा जनतेच्या भल्यासाठी असावा जीव घेण्यासाठी नव्हे.

Previous articleमहाराष्ट्र मास्टर्स गेम्स असोसिएशनच्या जॉईंट सेक्रेटरी धनंजय मदने
Next articleऑनलाइन शिक्षणातील वाढीव फी’तून होणारी लुटमार थांबवा: क्षत्रिय मराठा परिवाराचा आंदोलनाचा इशारा