कनेरसर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला इमारतीसाठी मिळणार 34 लाखाचा निधी

Ad 1

राजगुरुनगर-आमदार भाई गिरकर यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री यांचे कनेरसर ता.खेड येथील जि.प.शाळा इमारतीसाठी 34 लाख निधीचे लिखित उत्तरात ठोस आश्वासन व मागणी मान्य केली आहे.

आमदार भाई गिरकर यांनी विधानपरिषदेत कनेरसर जि.प.शाळा इमारत प्रश्नी दोन वेळा तारांकित प्रश्न उपस्थित केल्यामुळे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चार वर्ग खोल्यांसाठी 34 लाख रूपये निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे सन 2020-21 मध्ये नवीन चार वर्गखोल्या बांधण्यासाठी मागणी केल्याचे लिखित स्वरूपात उत्तर दिले आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक टाव्हरे व विधानभवन सेक्रेटरी राजु खंडीझोड यांच्या पाठपुराव्यानुसार आमदार गिरकर यांनी पुन्हा तारांकित प्रश्न क्रमांक ५९७१उपस्थित केला होता.

इमारत धोकादायक असल्याचे लेखी अहवालात जिल्हा परिषद प्रशासनाने मान्य केले असताना शाळेच्या इमारत बांधकामास सुरूवात का केली नाही अशी विचारणा गिरकर यांनी केली होती,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लेखी उत्तरात इमारत धोकादायक असल्याचे मान्य करून बांधकामास विलंब होण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कनेरसर जि.प.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर म्हसुडगे व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांनी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांना इमारत समस्या सांगितली असता त्यांनी भाजप विधानभवन कार्यालयाला निवेदन दिले.सेक्रेटरी राजु खंडीझोड यांनी शाळेला भेट दिली.आमदार गिरकर यांनी त्यामुळे फेब्रुवारी मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा शाळा इमारत धोकादायक असल्याचे जिल्हा परिषदेने मान्य करून निधीबाबतचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार माजी सरपंच सुधीर माशेरे यांनी आमदार दिलीपराव मोहीते व जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. जि.प.अध्यक्षा पानसरे यांनी शाळेची पाहणी करून आश्वासन दिले होते, परंतु कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हा परिषदेला आरोग्यासाठी निधी तरतुद करावी लागल्याने विलंब होईल या भावनेने अशोकराव टाव्हरे व राजु खंडीझोड यांनी आमदार भाई गिरकर यांची भेट घेतली .गिरकर यांनी पुन्हा प्रश्न उपस्थित करून ग्रामविकास मंत्री यांच्याकडून लिखित उत्तरात ठोस आश्वासन घेतल्याने जिल्हा परिषद शाळा इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी विद्यार्थी, शिक्षक व पालंकामध्ये आशा निर्माण झाली आहे.