शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रताप ढमाले (कांचन ग्रुप) यांच्यावतीने आरोग्य शिबिर संपन्न

राजगुरुनगर-देशाचे लोकनेते शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कडूस येथे भव्य आरोग्य शिबिराचे आज (दि .२० ) रोजी आयोजित करण्यात आले होते.

या आरोग्य शिबिरात कडूस आणि पंचक्रोशीतील लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला ११५ लोकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतला.हे आरोग्य शिबिर कडूस येथील श्रीकृष्ण मंदिर ,बाजारपेठ येथे आयोजित करण्यात आले होते.या आरोग्य शिबीराचे ब्लडप्रेशर, मधुमेह,प्लस इत्यादी आजारांची तपासणी करण्यात आली.या शिबीराचे आयोजन प्रताप बाळासाहेब ढमाले (कांचन ग्रुप) यांच्यावतीने करण्यात आले होते

या आरोग्य शिबीराचे उद्घाटन आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा.कैलासराव सांडभोर(अध्यक्ष:- खेड तालुका) मा.सौ. कांचनताई प्रताप ढमाले(उपाध्यक्ष:- पुणे जिल्हा महिला ) अरुणशेठ चांभारे ,कैलास लिंभोरे , रमेशशेठ राळे ,अशोकभाऊ शेंडे, किसन भाऊ नेहरे ,ॲड अरुण मुळुक,ॲड मनिषाताई टाकळकर/पवळे ,सुजाताताई पचपिंड,शशिकला ढमाले, सुलभा चिपाडे, वर्षाताई मनोहर बच्चे, दत्ताभाऊ कंद, मनोहर बच्चे, बाळासाहेब बोंबले यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रताप बाळासाहेब ढमाले यांनी केले व आभार अनिकेत धायबर यांनी मानले.

Previous articleमंचर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष  पोलीस अंमलदार सोमनाथ वाफगावकर यांच्या तत्परतेमुळे मिळाले दहा तोळे सोन्याचे दागिने अवघ्या 2 तासात परत
Next articleराजगुरूनगर सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक किरण आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न