शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चाकण येथे रक्तदान शिबीर संपन्न

चाकण-खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जुन्नर आंबेगाव खेड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबीर चाकण मार्केट यार्ड या ठिकाणी संपन्न झाले या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे सभापती विनायक घुमटकर, तालुकाध्यक्ष अध्यक्ष कैलासशेठ सांडभोर, युवक तालुकाध्यक्ष कैलास लिंभोरे, सौ संध्याताई जाधव महिला अध्यक्षा, खेड, मयूरशेठ मोहिते, शाम देशमुख, निलेश देशमुख, गणेश शेवकर, सयाजी गाडेकर, वेंकटेश तात्या सोरटे,मोबिन काझी,  नगरसेवक प्रकाश भुजबळ,नगरसेवक विशाल भाऊ नायकवडी ,पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल नायकवाडी, प्रशांत मुंगसे, मयूर शेठ वाडेकर ,वैभव परदेशी , मंगल ताई जाधव , बाबू भाई शेख हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच कोविंड काळात ज्यांनी रुग्णांची सेवा केली लोकांची सेवा केली अशा १५ लोकांचा कोविड योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला तसेच पाच शिक्षिकांचा ही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्ष राम गोरे यांनी केली.आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले उल्लेखनीय  व कामगिरी केली त्यांचा गौरव केला. आभार जुन्नर आंबेगाव खेड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियनचे अध्यक्ष महेंद्र शेठ गोरे यांनी मानले.

Previous articleराजगुरूनगर सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक किरण आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
Next articleचास येथे सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या,नव-यासह चौघांवर गुन्हा दाखल