रोड रोलरला मोटारसायकलची जोरदार धडक : वाडा येथील दुचाकीस्वार जागीच ठार

राजगुरुनगर , प्रमोद दांगट

आंबेगाव तालुक्यातील पेठ /कुरवंडी रस्त्यावर दुचाकी चालकाने रस्ताचे काम करणाऱ्या रोलरला पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना रविवार (दि .२०) रोजी घडली आहे.मारुती धोंडीभाऊ सुतार (वय ४० रा.पावडेवाडी वाडा,ता.खेड जि पुणे) हे अपघातामध्ये ठार झाले असून या बाबत हनुमंत धोंडिभाऊ सुतार यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की मारुती सुतार हे त्याची ड्रीम युगा ही दुचाकी ( एम.एच.१४ ई.टी.४९०४) घेऊन पेठ कडून कुरवंडीकडे जात असताना ते भरधाव वेगात होते रस्त्याचे काम सुरू असलेल्या रोडवर कडेला उभा केलेला रोलरला त्यांनी पाठीमागून धडक दिली या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा म्रुत्यू झाला आहे. या घटनेचा पुढील तपास सहा फौजदार के.पी.कड करत आहेत

Previous articleशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बेलवाडीत ३०७ जणांचे रक्तदान
Next articleआंबेगाव तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई