Home Blog Page 367

कुरकुंडी गावच्या जवानाचे निधन

राजगुरूनगर-खेड तालुक्याच्या कुरकुंडी या गावातील भारतीय सैन्य दलातील जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे (वय २८)यांचे आसाम येथे दु:खद निधन झाले.या घटनेमुळे खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे

संभाजी राळे आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता.यामुळे शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून,त्यांच्या पाठीमागे आई वडील दोन विवाहित व एक अविवाहित बहीनी आहेत.त्यांचा अंत्यविधी शुक्रवार दि.८ रोजी कुरकुंडी येथे सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे.

कुरकुंडी गावच्या जवानाचे निधन

राजगुरूनगर-खेड तालुक्याच्या कुरकुंडी या गावातील भारतीय सैन्य दलातील जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे (वय २८)यांचे आसाम येथे दु:खद निधन झाले.या घटनेमुळे खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे


संभाजी राळे आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता.यामुळे शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून,त्यांच्या पाठीमागे आई वडील दोन विवाहित व एक अविवाहित बहीनी आहेत.त्यांचा अंत्यविधी शुक्रवार दि.८ रोजी कुरकुंडी येथे सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे.

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणासाठी विशेष मार्गदर्शन मोहिमेचे आयोजन सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांची माहिती

नारायणगाव (किरण वाजगे)

महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या निर्णयानुसार राज्यातील गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण अभियान राबविण्यासाठी शासनाच्या वतीने विशेष मोहीम सुरू करण्यात येत आहे.
या अनुषंगाने मानीव अभिहस्तांतरण प्रमाण वाढवण्यासाठी यापुढे पुणे जिल्ह्यात विशेष मार्गदर्शन मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जुन्नरच्या सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांनी दिली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये केवळ २ हजार ५०० गृहनिर्माण संस्थांनी मानीव अभिहस्तांतरण केले आहे. म्हणजेच नोंदणी केली आहे. यानुसार केवळ दहा टक्के संस्था या नोंदणीकृत आहेत.

याबाबत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जुन्नर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात गुरुवार दिनांक ७ ते सोमवार दिनांक ११ या कालावधीमध्ये दुपारी दोन ते सायंकाळी सहा दरम्यान विशेष मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांनी दिली.

नारायणगावात सामाजिक कार्यकर्ते संग्राम घोडेकर यांच्यावर कोयत्याने हल्ला

किरण वाजगे,नारायणगाव – येथील मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे माजी संचालक स्वर्गीय जगन्नाथ घोडेकर यांचे चिरंजीव व सामाजिक कार्यकर्ते संग्राम घोडेकर यांच्यावर आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील कोल्हे मळा येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला. अज्ञात तीन जणांनी मोटरसायकल वर येऊन घोडेकर यांच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केले असल्याचे समजते. घोडेकर हे गंभीर जखमी झाले असून. हल्ला केल्यानंतर मारेकरी पसार झाले आहेत.

दरम्यान घोडेकर यांना नारायणगाव येथील डॉ. भोसले हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले.

परंतु डोक्यामध्ये गंभीर स्वरूपाचे वार असल्यामुळे घोडेकर यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. संग्राम घोडेकर हे सामाजिक कार्यकर्ते असून ते सध्या मुक्ताई देवस्थान च्या कार्यालयात कार्यरत होते. मुक्ताई देवस्थानच्या वतीने सध्या चालू असलेल्या मोठ्या सांस्कृतिक हॉलच्या कामाची देखरेख ते करत होते. या घटनेचा पुढील तपास नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड व पोलीस कर्मचारी करत आहेत.

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

राजगुरूनगर -येथील सावित्रीबाई फुले सभागृहात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कोव्हिड १९ चे नियम पाळून साजरी करण्यात आली

यावेळी शिवसेना अध्यक्ष विजया ताई शिंदे, राजगुरूनगर नगरपरिषदेच्या उपअध्यक्ष सारिका घुमटकर,बेबीताई कड ,संध्याताई जाधव,शोभाताई सेवकरी मंगलताई जाधव,ज्योती वाघ, मंगलताई सोनवणे, मनीषा टाकळकर अलकाताई ताई जोगदंड, जयश्री खेडकर,संगीता जाधव, जयश्री जाधव,चाकणचे नगरसेवक प्रकाश सेठ भुजबळ उपस्थित होते

नारायणगाव येथे साडेपाच लाखाचे गोमांस जप्त: दोघे जण ताब्यात

किरण वाजगे – नारायणगाव

नारायणगाव पोलिसांनी बेकायदेशीररित्या वाहतूक करून नेत असलेले सुमारे साडेपाच लाख रुपयांचे गोमांस ताब्यात घेतले आहे. या घटनेतील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडीत देण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार (दि. ०५) जानेवारी रोजी पहाटे ०३:३० वाजण्याच्या सुमारास वारुळवाडी गावच्या हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपा समोर नाशिक-पुणे रोड जवळ टेम्पो मधून ३५०० किलो वजनाचे गोमांस वाहतूक करताना दोन जणांना फिर्यादी व साक्षीदारांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपींना नारायणगाव पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबतची फिर्याद शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय २७ वर्ष, धंदा समाजसेवा, राहणार ११७७/३३, रेव्हेन्यु कॉलनी शिवाजीनगर पुणे ४११००५) यांनी दिली आहे.
या घटनेतील आरोपी सुफियान शब्‍बीर अन्सारी (वय ३३ वर्ष,धंदा ड्रायव्हर, राहणार शिळफाटा मुंब्रा,ठाणे जिल्हा) ,व अश्फाक मोहम्मद हनीफ आतार  (वय ४० वर्ष,धंदा मजुरी, राहणार मंगळवार पेठ जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.) या दोघांना अटक करण्यात आली असून या आरोपींना न्यायालयाकडून दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ( दि.०५) रोजी पहाटे ०३:३० वाजण्याच्या सुमारास वारुळवाडी गावच्या हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर नाशिक-पुणे रोडवर वरील दोन आरोपींनी त्यांच्या ताब्यातील आयशर कंपनीचा टेम्पो (गाडी क्र. एम एच १४ एच जी २४०९) यामध्ये गाई व बैलांचे कापलेले मांस (अंदाजे वजन ३५०० किलो) बेकायदेशीरपणे घेऊन चालले होते. या गोमांस ची किंमत सुमारे ५,२५,००० रुपये एवढी आहे. आरोपींकडे पशुसंवर्धन विभागाचा कोणताही परवाना नसताना गोवंश कापणे व वाहतूक करणे बंदी असताना वरील वाहनांमधून वाहतूक करताना फिर्यादी व साक्षीदारांना मिळून आले आहेत. दरम्यान जप्त केलेल्या गोमांसची नारायणगाव पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा घेऊन विल्हेवाट लावली आहे.
वरील फिर्यादीवरून आरोपींवर भारतीय दंड विधान कलमानुसार पशु परीक्षण अधिनियम १९४८ कलम ५(क), महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम १९७६ चे कलम ९(अ), (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आळंदीतील तीन शाळांना ऑनलाइन शिक्षणास एलईडी सेट भेट

दिनेश कुऱ्हाडे,आळंदी : येथील आळंदी नगरपरिषदेच्या तीन शाळांतुन मुलांना संगणक शिक्षणासह ते ऑनलाइन देता यावे यासाठी नगरपरिषदेच्या शाळेच्या आदर्श शिक्षिका लतिका महादेव कुर्‍हाडे यांचे स्मरणार्थ तीन शाळांना एलईडी संच व सुमारे १२०० पुस्तके क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंतीचे औचित्य साधून सुपूर्द करण्यात आली.

आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक १ चे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक महादेव कुर्‍हाडे गुरुजी यांचे हस्ते शाळांचे मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आले. शैक्षणिक साहित्य त्यांची कन्या वैशाली अंकुश मोरे यांचे वतीने शाळांना भेट देण्यात आले.

यावेळी आळंदी नगरपरिषद मुख्याध्यापक संतोष मरभळ, मुख्याध्यापिका विजया औटी, मुख्याध्यापक एकनाथ साकोरे,आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे सचिव अर्जुन मेदनकर,नागनाथ कुंभार,सुरेश मेहेर,जहीर सय्यद,वैशाली मोरे उपस्थित होते.

यावेळी शालेय मुलांत वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक शाळेस ३०० अशी ४ शाळांना १२०० पुस्तके शाळांना भेट देत असल्याचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव कुर्‍हाडे गुरुजी यांनी सांगितले. यावेळी आदर्श शिक्षक कुर्‍हाडे परिवाराच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा मुख्याध्यापकांनी गौरव केला.

राजगुरुनगर मध्ये २२ वर्षीय तरूणाची डोक्यात दगड टाकून हत्या

बाबाजी पवळे,राजगुरूनगर – येथील ढुम्या डोंगराच्या पायथ्याशी शिरोली येथील 22 वर्षीय तरुणाची डोक्यात आणि चेहऱ्यावर दगड टाकून करण्यात खून करण्यात आली असल्याची घटना घडली आहे.

राहुल बाबाजी सावंत असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

रात्री मद्य पाजून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करण्यात येत आहे.

 

अभियान ग्रुपचा ग्रामस्वच्छता,रक्तदान शिबीर स्तुत्य उपक्रम – सुनिल जगताप

अमोल भोसले,उरुळी कांचन

राज्यात उद्भवलेल्या रक्ताच्या गंभीर तुटवड्याच्या समस्येवर तरुणाईने साथ दिली तर निश्र्चित मात करता येईल. ड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक विधायक स्तुत्य उपक्रम घेतल्याने सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन असे प्रतिपादन पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनिल जगताप यांनी केले.

उरुळी कांचन मधील ड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप व बी. जे. मेडिकल कॉलेज ससून हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना जगताप बोलत होते. यावेळी १६६ जणांनी रक्तदान करुन पुणे येथील ससून रुग्णालयाच्या रक्तपेढीला सहकार्य केले आहे.
जागतिक पातळीवर कोरोना विषाणूच्या साथीने मोठे आव्हान उभे राहिले असताना राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. जिल्हा प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत येथील उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे सर्व युवक एकत्र येत रक्तदान शिबिर आयोजित करुन जे विधायक काम केले आहे ते कौतुकास्पद असेच आहे.

याप्रसंगी हवेली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष जयदीप जाधव, संतोष चौधरी, शांताराम चौधरी, अजिंक्य कांचन, किरण वांझे, शिवाजी नवगिरे, सोमनाथ बगाडे, शैलेश गायकवाड, महादेव काकडे, शैलेश बाबर, संतोष संभाजी चौधरी, आशुतोष तुपे आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात सोशल डिस्टनशिंग पाळत चांगला प्रतिसाद दिला रक्तदाते यांनी प्रत्येक रक्तदात्यास तुळशीचे रोप , कापडी पिशवी व मास्क चे वाटप करण्यात आले.

मनसेच्या वतीने पोलिस वर्धापन दिनानिमित्त आळंदीत पोलिस बांधवांना मास्क वाटप

आळंदी-पोलिस वर्धापन दिनानिमित्त आळंदी शहर मनसेच्या वतीने आळंदी वाहतूक विभाग पोलीस निरीक्षक सुनील टोनपे तसेच आळंदी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक इकबाल शेख यांना ज्ञानेश्वरी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच वाहतूक पोलिस कर्तव्य बजावत आसताना मास्क वाटप करण्यात आले .आळंदी पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस बांधवांना मास्क वाटप करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा रस्ते आस्थापनाचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश लोखंडे तालुका अध्यक्ष प्रसाद बोराटेे, शहर अध्यक्ष तुषार (बाळु)नेटकेे , आळंदीचे शहराध्यक्ष निलेश घुंडरे पा.,कैलास बोरगावकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते