आळंदीतील तीन शाळांना ऑनलाइन शिक्षणास एलईडी सेट भेट

दिनेश कुऱ्हाडे,आळंदी : येथील आळंदी नगरपरिषदेच्या तीन शाळांतुन मुलांना संगणक शिक्षणासह ते ऑनलाइन देता यावे यासाठी नगरपरिषदेच्या शाळेच्या आदर्श शिक्षिका लतिका महादेव कुर्‍हाडे यांचे स्मरणार्थ तीन शाळांना एलईडी संच व सुमारे १२०० पुस्तके क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंतीचे औचित्य साधून सुपूर्द करण्यात आली.

आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक १ चे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक महादेव कुर्‍हाडे गुरुजी यांचे हस्ते शाळांचे मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आले. शैक्षणिक साहित्य त्यांची कन्या वैशाली अंकुश मोरे यांचे वतीने शाळांना भेट देण्यात आले.

यावेळी आळंदी नगरपरिषद मुख्याध्यापक संतोष मरभळ, मुख्याध्यापिका विजया औटी, मुख्याध्यापक एकनाथ साकोरे,आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे सचिव अर्जुन मेदनकर,नागनाथ कुंभार,सुरेश मेहेर,जहीर सय्यद,वैशाली मोरे उपस्थित होते.

यावेळी शालेय मुलांत वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक शाळेस ३०० अशी ४ शाळांना १२०० पुस्तके शाळांना भेट देत असल्याचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव कुर्‍हाडे गुरुजी यांनी सांगितले. यावेळी आदर्श शिक्षक कुर्‍हाडे परिवाराच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा मुख्याध्यापकांनी गौरव केला.

Previous articleराजगुरुनगर मध्ये २२ वर्षीय तरूणाची डोक्यात दगड टाकून हत्या
Next articleनारायणगाव येथे साडेपाच लाखाचे गोमांस जप्त: दोघे जण ताब्यात