नारायणगाव येथे साडेपाच लाखाचे गोमांस जप्त: दोघे जण ताब्यात

Ad 1

किरण वाजगे – नारायणगाव

नारायणगाव पोलिसांनी बेकायदेशीररित्या वाहतूक करून नेत असलेले सुमारे साडेपाच लाख रुपयांचे गोमांस ताब्यात घेतले आहे. या घटनेतील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडीत देण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार (दि. ०५) जानेवारी रोजी पहाटे ०३:३० वाजण्याच्या सुमारास वारुळवाडी गावच्या हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपा समोर नाशिक-पुणे रोड जवळ टेम्पो मधून ३५०० किलो वजनाचे गोमांस वाहतूक करताना दोन जणांना फिर्यादी व साक्षीदारांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपींना नारायणगाव पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबतची फिर्याद शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय २७ वर्ष, धंदा समाजसेवा, राहणार ११७७/३३, रेव्हेन्यु कॉलनी शिवाजीनगर पुणे ४११००५) यांनी दिली आहे.
या घटनेतील आरोपी सुफियान शब्‍बीर अन्सारी (वय ३३ वर्ष,धंदा ड्रायव्हर, राहणार शिळफाटा मुंब्रा,ठाणे जिल्हा) ,व अश्फाक मोहम्मद हनीफ आतार  (वय ४० वर्ष,धंदा मजुरी, राहणार मंगळवार पेठ जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.) या दोघांना अटक करण्यात आली असून या आरोपींना न्यायालयाकडून दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ( दि.०५) रोजी पहाटे ०३:३० वाजण्याच्या सुमारास वारुळवाडी गावच्या हद्दीतील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर नाशिक-पुणे रोडवर वरील दोन आरोपींनी त्यांच्या ताब्यातील आयशर कंपनीचा टेम्पो (गाडी क्र. एम एच १४ एच जी २४०९) यामध्ये गाई व बैलांचे कापलेले मांस (अंदाजे वजन ३५०० किलो) बेकायदेशीरपणे घेऊन चालले होते. या गोमांस ची किंमत सुमारे ५,२५,००० रुपये एवढी आहे. आरोपींकडे पशुसंवर्धन विभागाचा कोणताही परवाना नसताना गोवंश कापणे व वाहतूक करणे बंदी असताना वरील वाहनांमधून वाहतूक करताना फिर्यादी व साक्षीदारांना मिळून आले आहेत. दरम्यान जप्त केलेल्या गोमांसची नारायणगाव पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा घेऊन विल्हेवाट लावली आहे.
वरील फिर्यादीवरून आरोपींवर भारतीय दंड विधान कलमानुसार पशु परीक्षण अधिनियम १९४८ कलम ५(क), महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम १९७६ चे कलम ९(अ), (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.