सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणासाठी विशेष मार्गदर्शन मोहिमेचे आयोजन सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांची माहिती

नारायणगाव (किरण वाजगे)

महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या निर्णयानुसार राज्यातील गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण अभियान राबविण्यासाठी शासनाच्या वतीने विशेष मोहीम सुरू करण्यात येत आहे.
या अनुषंगाने मानीव अभिहस्तांतरण प्रमाण वाढवण्यासाठी यापुढे पुणे जिल्ह्यात विशेष मार्गदर्शन मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जुन्नरच्या सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांनी दिली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये केवळ २ हजार ५०० गृहनिर्माण संस्थांनी मानीव अभिहस्तांतरण केले आहे. म्हणजेच नोंदणी केली आहे. यानुसार केवळ दहा टक्के संस्था या नोंदणीकृत आहेत.

याबाबत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जुन्नर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात गुरुवार दिनांक ७ ते सोमवार दिनांक ११ या कालावधीमध्ये दुपारी दोन ते सायंकाळी सहा दरम्यान विशेष मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांनी दिली.

Previous articleनारायणगावात सामाजिक कार्यकर्ते संग्राम घोडेकर यांच्यावर कोयत्याने हल्ला
Next articleकुरकुंडी गावच्या जवानाचे निधन