अभियान ग्रुपचा ग्रामस्वच्छता,रक्तदान शिबीर स्तुत्य उपक्रम – सुनिल जगताप

अमोल भोसले,उरुळी कांचन

राज्यात उद्भवलेल्या रक्ताच्या गंभीर तुटवड्याच्या समस्येवर तरुणाईने साथ दिली तर निश्र्चित मात करता येईल. ड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक विधायक स्तुत्य उपक्रम घेतल्याने सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन असे प्रतिपादन पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनिल जगताप यांनी केले.

उरुळी कांचन मधील ड्रिम्स युवा सोशल फाऊंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप व बी. जे. मेडिकल कॉलेज ससून हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना जगताप बोलत होते. यावेळी १६६ जणांनी रक्तदान करुन पुणे येथील ससून रुग्णालयाच्या रक्तपेढीला सहकार्य केले आहे.
जागतिक पातळीवर कोरोना विषाणूच्या साथीने मोठे आव्हान उभे राहिले असताना राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. जिल्हा प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत येथील उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे सर्व युवक एकत्र येत रक्तदान शिबिर आयोजित करुन जे विधायक काम केले आहे ते कौतुकास्पद असेच आहे.

याप्रसंगी हवेली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष जयदीप जाधव, संतोष चौधरी, शांताराम चौधरी, अजिंक्य कांचन, किरण वांझे, शिवाजी नवगिरे, सोमनाथ बगाडे, शैलेश गायकवाड, महादेव काकडे, शैलेश बाबर, संतोष संभाजी चौधरी, आशुतोष तुपे आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात सोशल डिस्टनशिंग पाळत चांगला प्रतिसाद दिला रक्तदाते यांनी प्रत्येक रक्तदात्यास तुळशीचे रोप , कापडी पिशवी व मास्क चे वाटप करण्यात आले.

Previous articleमनसेच्या वतीने पोलिस वर्धापन दिनानिमित्त आळंदीत पोलिस बांधवांना मास्क वाटप
Next articleराजगुरुनगर मध्ये २२ वर्षीय तरूणाची डोक्यात दगड टाकून हत्या