Home Blog Page 366

राळे कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे आश्वासन

राजगुरूनगर-अविवाहित असलेल्या कै. संभाजी यांचे यंदा लग्न होणार होते. मात्र तत्पूर्वीच देशासाठी कर्तव्य बजावत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही बाब मनाला चटका लावणारी बाब असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले. या घटनेमुळे राळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातला एकमेव कर्ता पुत्र देशसेवा करताना गमावला गेला आहे. त्यामुळे मी तसेच आमदार मोहिते पाटील आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी असून राळे कुटुंबाला आमच्याकडून सर्व प्रकारची मदत करु असा शब्द डॉ. कोल्हे यांनी दिला. यावेळी कै. संभाजी यांच्या भगिनीने लष्करात भरती होऊन आपल्या बंधुप्रमाणे देशसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. खासदार डॉ. कोल्हे व आमदार मोहिते पाटील यांनी त्यासाठी शक्य ती सर्व मदत केली जाईल असे आश्वासित केले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, बाजार समितीचे सभापती बाळशेठ ठाकूर, रमेशशेठ राळे, अरुण चांभारे, अॅड. मनीषा पवळे, माणिकशेठ कदम, युवराज पडवळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी तालुकाध्यक्ष निलेश काळे, सोशल मिडियाचे अध्यक्ष विलास मोहिते पाटील, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मयूर वाडेकर, कांचनताई ढमाले आदी उपस्थित होते.

राळे कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करू- खासदार डॉ.अमोल कोल्हे

राजगुरुनगर – खेड तालुक्यातील कोये कुरकुंडी गावचे सुपुत्र शहीद जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी त्यांचे सांत्वन केले

अविवाहित असलेल्या कै. संभाजी यांचे यंदा लग्न होणार होते. मात्र तत्पूर्वीच देशासाठी कर्तव्य बजावत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही बाब मनाला चटका लावणारी बाब असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले. या घटनेमुळे राळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातला एकमेव कर्ता पुत्र देशसेवा करताना गमावला गेला आहे. त्यामुळे मी तसेच आमदार मोहिते पाटील आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी असून राळे कुटुंबाला आमच्याकडून सर्व प्रकारची मदत करु असा शब्द डॉ. कोल्हे यांनी दिला. यावेळी कै. संभाजी यांच्या भगिनीने लष्करात भरती होऊन आपल्या बंधुप्रमाणे देशसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. खासदार डॉ. कोल्हे व आमदार मोहिते पाटील यांनी त्यासाठी शक्य ती सर्व मदत केली जाईल असे आश्वासित केले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, बाजार समितीचे सभापती बाळशेठ ठाकूर, रमेशशेठ राळे, अरुण चांभारे, अॅड. मनीषा पवळे, माणिकशेठ कदम, युवराज पडवळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी तालुकाध्यक्ष निलेश काळे, सोशल मिडियाचे अध्यक्ष विलास मोहिते पाटील, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मयूर वाडेकर, कांचनताई ढमाले आदी उपस्थित होते.

२८ वर्षांपासून वाळुंजवाडी बेपत्ता,प्रशासनाचा गलथान कारभारामुळे विकासापासून वंचित

सिताराम काळे घोडेगाव-

ध चा म झाला तसं वाडीचे नगर केले आणि आंबेगाव तालुक्यातील वाळुंजवाडी या महसुली गावात मागील 28 वर्षांपासून शासना च्या निधीमधून वगळून सदर गावचा निधी दुसऱ्या गावाला दिल्याचा प्रकार घडला हे प्रशासनाच्या गलथानपणामुळे वाळुंज वाडी हे गाव शासनाच्या आर्थिक निधी व गावात असणारे साडेतीनशे इतर मागासवर्गीय समाजातील नागरिक लाभांपासून वंचित राहिले असल्याची माहिती वाळुंज वाडी ग्रामस्थांनी मंचर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मंचर येथे वाळुंज वाडी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रुक्मिणी पुनाजी खंडागळे (सरपंच), सोनाली सुनील वाळुंज (माजी उपसरपंच), पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, बाळासाहेब एकनाथ लोंढे, नवनाथ चिंतामण वाळुंज, भिमराव बाजीराव वाळुंज, जीवन बाजीराव निघोट, मनोहर जनाजी लोंढे, सागर कोंडीभाऊ वाळुंज, कांतीलाल ज्ञानेश्वर वाळुंज, प्रकाश ज्ञानेश्वर वाळुंज, आदी उपस्थित होते.

मागील 28 वर्षापासून आंबेगाव तालुक्यातील वाळुंज वाडी हे महसुली गाव शासनाच्या निधीमधून वगळून सदरचा निधी दुसऱ्याच गावाला दिला जात आहे शासनाच्या या गलथान पणामुळे आजपर्यंत हे गाव शासनाच्या वेगवेगळ्या आर्थिक निधी आणि लावण पासून वंचित राहिले आहे वाळुंज वाडी आणि वडगाव काशिंबेग या दोन गावांसाठी एक ग्रामपंचायत होती वडगाव काशिंबेग गावची लोकसंख्या सत्तावीसशे सतरा व वाळुंज वाडी गावची लोकसंख्या 1026 अशी एकूण लोकसंख्या तीन हजार 643 होती त्यानुसार सदर ग्रामपंचायत वडगाव काशिंबे कडे दोन्ही गावच्या लोकसंख्येच्या तुलनेत निधी शासनाकडून उपलब्ध होणे गरजेचे होते परंतु आज अखेर केवळ वडगाव काशिंबेग गावच्या लोकसंख्येच्या तुलनेत निधी आल्याने सदर तुटपुंज्या निधीमुळे गावचा विकास अनेक वर्ष रखडला असले ची माहिती नवनाथ वाळुंज यांनी दिली.

वाळुंज वाडी गावास वडगाव काशिंबेग पासून तोडून स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर झाली त्यानंतर तेथील तरुणांच्या व ग्रामस्थांच्या ही गोष्ट निदर्शनास आली गेली अठ्ठावीस वर्षे वाडी गावाचा सेन्सेक्स व लोकसंख्या यांचा वापर करून एक महसुली असलेल्या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली आणि गेली 28 वर्षे आनंदवाडी गावात लोकसंख्येच्या तुलनेत मिळणारा सर्व निधी एका गावच्या विकासासाठी स्वतंत्र स्थापन केलेल्या ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आला आहे.

याबाबत नवनाथ वाळुंज यांनी गटविकास अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला आहे मात्र गावचे झालेले नुकसान भरून निघू शकत नाही, गावात झालेला अन्याय हा ज्यांच्यामुळे झाला आहे, शिवाय वाळुंज वाडी गावात साडेतीनशे ठाकर समाजाचे नागरिक असताना मागील 28 वर्षात त्यांना कोणताही लाभ नाही मिळाला तो लाभ सदर दुसऱ्या गावाला गेला आहे, ज्या गावाला मिळाला त्या गावातील नागरिक यांचे मतदान सुद्धा वाळुंज वाडी गावात दाखवले जात आहे व त्या गावचे मतदार हे दुसऱ्या गावातील दाखवले आहे, हा प्रशासनाने केलेला मोठा नागरीकांचा फसवणुकीचा प्रकार आहे,त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी केली आहे.

वडगाव काशिंबेग पासून तोडून तयार झालेली वाळुंज वाडी ग्रामपंचायतीचा गेले 28 वर्ष मिळालेला निधी ज्या गावाला मिळाला त्या गावाला सेन्सेक्स नंबर नसतानाही दिला गेला याबाबत गटविकास अधिकारी व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करणार असून शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील व उत्पादनशुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कानावर हा विषय घालून त्याची पूर्तता करणार असल्याची माहिती प्रा. राजाराम बाणखेले यांनी दिली.

युवकमित्र परिवार आयोजित राज्यस्तरीय युवा संमेलन उत्साहात सपंन्न

अमोल भोसले,पुणे

विवेकानंदाच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी आजच्या युवकांनी कठोर परिश्रम घेणे गरजेचे असून अंगी असलेल्या युवाशक्तीद्वारा देशासमोरील आव्हानावर उपाय शोधणे आवश्यक असल्याचे मत प्रसिद्ध वक्ते साहित्यिक युसूफ पठाण यांनी पत्रकार भवन येथे आयोजित ‘युवकमित्र राज्यस्तरीय युवा संमेलनात व्यक्त केले. राजमाता आई जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती निमित्त युवकमित्र परिवार, नंदूरबार या राज्यात वाचन चळवळ राबवीणाऱ्या संस्थेमार्फत पुणे शहरात ‘राज्यस्तरीय युवा संमेलन’ यशस्वी पार पडले.

यावेळी राज्यात युवा चळवळीत कार्य करणाऱ्या युवक, युवतीचा व उपक्रमशील शिक्षक, पत्रकार बांधवाचा यावेळी ‘ युवा प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून महाएनजीओ फेडरेशनचे संचालक मुकुंद शिंदे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरु युवा केंद्राचे पुणे जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर तर प्रमुख अतिथी म्हणून विश्व जनकल्याण समितीच्या अध्यक्षा छायाताई भगत, येरवडा येथील सावित्रीबाई फुले सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्वला गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार बाळकृष्ण बागुल, राज्य युवा परिषदेचे समन्वयक प्रवीण प्रधान, युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन, उदयकाळ फौंडेशनचे अध्यक्ष मयूर बागुल, युवकमित्रचे प्रदीप देवरे लोढरेकर, वाचन चळवळीचे कार्तिक चव्हाण यांच्यासह राज्यातील युवक युवती उपस्थित होते. अमर हजारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रमोद पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

वीज पंपाच्या कनेक्शनचा आत्ता मार्ग मोकळा

अमोल भोसले,उरुळी कांचन –

शेतकरयांना वीज पम्प कनेक्शनसाठी स्वतंत्र ट्रान्सफर्मर घ्यावा लागणार ही जाचक अट आत्ता रद्द झाली असून यापुढे पूर्वी प्रमाणेच कनेक्शन देण्याचा निर्णय ऊर्जा मंत्र्यांनी घेतल्याची माहिती राज्य इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किणीकर यांनी दिली आहे. या निर्णयामुळे गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेला दोन ते अडीच लाखाचा खर्चाचा भुरदण्ड कमी होऊन तो आता १० ते २० हजारावर खाली आला आहे. शिवाय ५ ते ६ वर्ष थांबलेली वीज जोड कनेक्शन देण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. हे महाराष्ट्र राज्य अरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली दीर्घ काळ दिलेल्या लढ्याचे यश आहे असेही किणीकर यांनी नमूद केले आहे.

कृषी पँपना वीज जोड घेण्यासाठी स्वतंत्र ट्रान्सफर्मर घेण्याची जाचक अट मागील फडणवीस सरकारने घातली होती. या निर्णयास राज्यातील तमाम शेतकरी वर्गाच्या हिता विरोधी असल्यानं यास प्रचंड विरोध असतानाही फडणवीस सरकाने हा निर्णय लादला होता. शेतपिकाना वेळेवर पाणी देणे आवश्यक असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून स्वतंत्र ट्रान्सफर्मर साठी दोन ते अडीच लाख रुपये भरून विजजोडसाठी अर्ज केले. परंतु महा वितरणने अपुरी यंत्रणा असल्याचे कारण देत वीज जोड देण्यास टाळा टाळ केली होती. पैसे भरून देखील शेतकरी वीज जोड मिळण्यासाठी महा वितरणकडे उंबरे झिजवत होते. राज्य इरिगेशन फेडरेशनने प्रा एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या मार्च मध्ये ऊर्जा मंत्री यांचे समवेत बैठक घेऊन स्वतंत्र कनेक्शनसाठी ट्रान्सफर्मर घेण्याची जाचक अट रद्द करावी ही मागणी केली होती. या नंतर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, यांच्या पुढाकाराने कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील आमदार यांचेसह ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे समवेत मंत्रालयात बैठक घेण्यात आली.

याच बैठकीत वीज जोड प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन ऊर्जा मंत्री राऊत यांनी दिलेले होते परंतु नंतर उदभवलेल्या कोरोना परिस्थितीने या संबंधी हालचाली थांबल्या होत्या.दरम्यान राज्यात वीज जोड लाखो प्रकरणे प्रलंबित असल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरलेली होती. दरम्यान वीज वितरणने शेतकऱ्यांना सौर उर्जेवरील वीज जोड देण्याचा पर्याय पुढे मांडला, परंतु शेतकरी वर्गाने यास प्रतिसाद दिला नाही.
त्यामुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत याना वीज जोड धोरणात बदल करून व्यापक आणि शेतकरी हितावह निर्णय घ्यावा लागला. विशेष – ऊर्जा मंत्री यांची घोषणा- वीज जोड धोरणातील बदल करण्याची ऊर्जा मंत्री याची घोषणा हा प्रा, एन, डी, पाटील यांच्या दीर्घ काळ दिलेल्या लढ्याचे यश आहे, वीज जोड साठी स्वतंत्र ट्रान्सफर्मर ही अट रद्द करणार. कमी खर्चात वीज जोड देणार — नव्या वीज जोड धोरणा नुसार यापूर्वी पैसे भरून जोडसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या स्वतंत्र ट्रान्सफर्मर ऐवजी पूर्वी प्रमाणेच वीज जोड देणार. १०० होलटच्या एका ट्रान्स्फरवर २० ते २५ शेतकऱ्यांना वीज जोड देणार, त्यामुळे महा वितरणाचा खर्च वाचणार आहे, शेतकऱ्यांना यापुढे फक्त १०ते २० हजार रूपये द्यावे लागणार.

महा वितरणला १५०० कोटी मिळणार — वीज कनेक्शन जोडण्यासाठी म्हणून शासन महा वितरणला वर्षाला १५०० कोटी रुपये देणार आहे, हे पैसे पुढील पाच वर्ष दरवर्षी नियमित मिळणार आहेत.

यामुळे वीज जोड देण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघाला आहे. मागील फडणवीस सरकाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाच फळे शेतकरी अद्याप पर्यंत भोगत आहेत,यासाठी प्रा, एन, डी, पाटील यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ रस्तावरील आणि मंत्रालय पातळीवर दिलेल्या इरिगेशन फेडरेशनचे हे यश आहे.
आघाडी शासनाचे अभिनंदन — आघाडी सरकारने वीज जोडसाठी फडणवीस सरकारने घेतलेला जाचक निर्णय रद्द करून शेतकऱ्यांना अंत्यत कमी खर्चात त्वरित वीज जोड निर्णयाचे राज्यातील तमाम शेतकरी वर्गाचे वतीने आघाडी सरकारच् हार्दिक अभिनंदन.

वाघोली गावच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असेल -आमदार अशोक पवार

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिरुर – हवेली विधानसभा मतदार संघात असलेल्या वाघोली गावाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले नेतृत्व म्हणजे आमदार अॅड् अशोक पवार आमदार हे सतत पाठपुरावा करुन वाघोलीला पुणे महानगरपालिकेमध्ये समावेश करुन घेतले. वाघोलीसाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत बाबी उत्तम दर्जाच्या मिळाव्यात व वाघोली हे पुण्यानजीकचे एक सर्वोकृष्ट उपनगर बनावे यासाठी आमदार अॅड् अशोक पवार सदैव प्रयत्नशील आहेत.

आज भामा-आसखेड प्रकल्पाचे पाणी वाघोली साठी मिळावे यासाठी पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमदार अॅड् अशोक पवार यांनी निवेदन दिले. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

मंचर पोलीस ‘‘ जिल्ह्यातील सर्वोत्तम संघटीत गुन्हेगारीवर उत्कृष्ट प्रतिबंधक कारवाई’’ या पुरस्काराने सन्मानित

पुणे- मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, पोलीस नाईक सोमनाथ वाफगांवकर, पोलीस नाईक नवनाथ नाईकडे, पो.काॅ. सुदर्षन माताडे, पो.काॅ. योगेश रोेडे, रामदास तनपुरे, दादा जाधव यांनी (दि. 23 ) रोजी मंचर पोलीस स्टेशन हददीतील मौजे वडगांव काशिंबेग गावचे हददीत अवैध वाळु उपसा करणारे वाहनांवर कायदेशीर कारवाई करून तेथुन 39,93,000/- रूपये किंमतीची एकुण 5 वाहने आणि इतर मुददेमाल जप्त केला होता.


त्याची दखल घेत मंचर पोलीसांचे या उत्कृश्ट कामगिरीबददल जिल्हा पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी वरील सर्वांचा (दि.०७) रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय पुणे ग्रामीण येथे प्रशस्तीपत्रक देवुन डिसेंबर 2020 चा ‘‘सर्वोत्तम संघटीत गुन्हेगारीवर उत्कृष्ट कारवाई’’ या पुरस्काराने सन्मान केला.

संग्राम घोडेकर प्राणघातक हल्ला प्रकरणी मुख्य सूत्रधार चंद्रशेखर कोराळे याला अटक

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे काल (दि ७ ) रोजी कोल्हे मळा येथे झालेल्या सामाजिक कार्यकर्ते संग्राम घोडेकर यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार चंद्रशेखर कोऱ्हाळे यांना नारायणगाव पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक केली आहे. या गुन्ह्यातील अन्य चार आरोपींची नावे देखील निष्पन्न झाली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

दरम्यान या हल्ला प्रकरणी संग्राम घोडेकर यांच्या दुसऱ्या पत्नी रत्ना घोडेकर यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये काल दिनांक ७ रोजी चंद्रशेखर कोऱ्हाळे यांच्याविरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात आरोपींवर भारतीय दंड विधान कलम ३०७, ५०६, १२० (ब) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी अवघ्या चोवीस तासाच्या आत माजी पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर कोऱ्हाळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यानुसार पोलिस चौकशी अंती या प्रकरणातील अन्य आरोपी प्रशांत माने (वय ३८, रा. नारायणगाव), सोन्या राठोड ( वय २४, रा. चौदा नंबर), साहिल शेख (वय १८, रा. वारूळवाडी) व भावेश राजेंद्र लेंडे (वय २० रा. पिंपळवंडी) या चार अन्य आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यांना शोधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख व उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक रवाना झाले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुंड यांनी सांगितले.

या घटनेचा काही तासातच छडा लावणाऱ्या नारायणगाव पोलिसांचे समस्त ग्रामस्थांच्या वतीने पोलीस स्थानकावर एसटी स्टँड ते नारायणगाव असे चालत जाऊन अभिनंदन करण्यात आले.

 युवा नेते सुजित खैरे, मुक्ताई देवस्थानचे विश्वस्त विकास नाना तोडकरी, सरपंच योगेश पाटे, आशिष माळवदकर, भागेश्वर डेरे, अजित वाजगे, जयेश कोकणे, ऍडव्होकेट राजेंद्र कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य राजू बाप्ते, गणेश पाटे, संतोष पाटे, आरिफ आतार, संतोष दांगट, ईश्वर पाटे, आकाश काणसकर, अनिल खैरे, राजू पाटे, किरण ताजणे, निलेश जाधव, हेमंत कोल्हे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी महाराज नगर करण्याची पुणे जिल्हा मनसेची मागणी

राजगुरूनगर – मनसेचे जिल्हा अध्यक्ष समिरभाऊ थिगळे यांच्या नेतृत्वाखाली खेड येथील राजगुरूनगर एसटी स्टँड येथे पुणे औरंगाबाद एसटी वर छत्रपती संभाजी महाराज नगर असे फलक लावून आंदोलन करण्यात आले.

 

यावेळी कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष मनोजशेठ खराबी, मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष मंगेशभाऊ सावंत, खेड तालुका सचिव नितीन ताठे ,राजगुरूनगर शहर अध्यक्ष सोपान डुंबरे ,शहर उपाध्यक्ष आदित्य शिर्के, विभाग अध्यक्ष किरण पार्टे ,शहर उपाध्यक्ष वसीम पटेल व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

आंबेगाव तहसिल कार्यालयात ग्रामपंचायत लढविणा-या उमेदवारांच्या सोयीसाठी एक खिडकी कक्ष

  सिताराम काळे ,घोडेगाव-आंबेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा सुरू असून निवडणूक लढविणा-या उमेदवारांना सभा, दौरे कार्यक्रमासाठी लागणा-या विविध परवानगीसाठी आंबेगाव तहसिलदार कार्यालय घोडेगाव येथे एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती तहसिलदार रमा जोशी यांनी दिली.

आंबेगाव तालुक्यात २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुक लढवण्यास उभे राहिलेल्या उमेदवारांची गैरसोय होवु नये म्हणुन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणा-या परवानगीसाठी एक खिडकी कक्ष तीन ठिकाणी तहसिल कार्यालयात सुरू केली आहे.

गावडेवाडी, शिरदाळे, जवळे, काठापुर, बु., खडकी, रानमळा, लांडेवाडी-पिंगळवाडी, काळेवाडी-कोटमदरा व महाळुंगे पडवळ या ग्रामपंचायतींसाठी ए. बाळसराफ, रोहन डावरे यांची एक खिडकी कक्षाकरिता नियुक्ती केली आहे. गिरवली, काळेवाडी-दरेकरवाडी, धोंडमाळ-शिंदेवाडी, कोलदरा-गोनवडी, पिंपळगांव तर्फे म्हाळुंगे, अवसरी खुर्द व मंचर यासाठी कृषी अधिकारी पाटोळे व योगेश सोनवणे यांची नियुक्ती तर शेवाळवाडी, एकलहरे, पेठ, थुगांव, लौकी, शिंगवे, भागडी, खडकी व वळती या ग्रामंपचायतींसाठी एस. एस. वांगसकर, सुनिल रोकडे यांची एक खिडकी कक्षासाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे तहसिलदार रमा जोशी यांनी सांगितले.