मंचर पोलीस ‘‘ जिल्ह्यातील सर्वोत्तम संघटीत गुन्हेगारीवर उत्कृष्ट प्रतिबंधक कारवाई’’ या पुरस्काराने सन्मानित

पुणे- मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, पोलीस नाईक सोमनाथ वाफगांवकर, पोलीस नाईक नवनाथ नाईकडे, पो.काॅ. सुदर्षन माताडे, पो.काॅ. योगेश रोेडे, रामदास तनपुरे, दादा जाधव यांनी (दि. 23 ) रोजी मंचर पोलीस स्टेशन हददीतील मौजे वडगांव काशिंबेग गावचे हददीत अवैध वाळु उपसा करणारे वाहनांवर कायदेशीर कारवाई करून तेथुन 39,93,000/- रूपये किंमतीची एकुण 5 वाहने आणि इतर मुददेमाल जप्त केला होता.


त्याची दखल घेत मंचर पोलीसांचे या उत्कृश्ट कामगिरीबददल जिल्हा पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी वरील सर्वांचा (दि.०७) रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय पुणे ग्रामीण येथे प्रशस्तीपत्रक देवुन डिसेंबर 2020 चा ‘‘सर्वोत्तम संघटीत गुन्हेगारीवर उत्कृष्ट कारवाई’’ या पुरस्काराने सन्मान केला.

Previous articleसंग्राम घोडेकर प्राणघातक हल्ला प्रकरणी मुख्य सूत्रधार चंद्रशेखर कोराळे याला अटक
Next articleवाघोली गावच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असेल -आमदार अशोक पवार