आंबेगाव तहसिल कार्यालयात ग्रामपंचायत लढविणा-या उमेदवारांच्या सोयीसाठी एक खिडकी कक्ष

  सिताराम काळे ,घोडेगाव-आंबेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा सुरू असून निवडणूक लढविणा-या उमेदवारांना सभा, दौरे कार्यक्रमासाठी लागणा-या विविध परवानगीसाठी आंबेगाव तहसिलदार कार्यालय घोडेगाव येथे एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती तहसिलदार रमा जोशी यांनी दिली.

आंबेगाव तालुक्यात २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुक लढवण्यास उभे राहिलेल्या उमेदवारांची गैरसोय होवु नये म्हणुन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणा-या परवानगीसाठी एक खिडकी कक्ष तीन ठिकाणी तहसिल कार्यालयात सुरू केली आहे.

गावडेवाडी, शिरदाळे, जवळे, काठापुर, बु., खडकी, रानमळा, लांडेवाडी-पिंगळवाडी, काळेवाडी-कोटमदरा व महाळुंगे पडवळ या ग्रामपंचायतींसाठी ए. बाळसराफ, रोहन डावरे यांची एक खिडकी कक्षाकरिता नियुक्ती केली आहे. गिरवली, काळेवाडी-दरेकरवाडी, धोंडमाळ-शिंदेवाडी, कोलदरा-गोनवडी, पिंपळगांव तर्फे म्हाळुंगे, अवसरी खुर्द व मंचर यासाठी कृषी अधिकारी पाटोळे व योगेश सोनवणे यांची नियुक्ती तर शेवाळवाडी, एकलहरे, पेठ, थुगांव, लौकी, शिंगवे, भागडी, खडकी व वळती या ग्रामंपचायतींसाठी एस. एस. वांगसकर, सुनिल रोकडे यांची एक खिडकी कक्षासाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे तहसिलदार रमा जोशी यांनी सांगितले.

Previous articleकुरकुंडी गावच्या जवानाचे निधन
Next articleऔरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी महाराज नगर करण्याची पुणे जिल्हा मनसेची मागणी