वीज पंपाच्या कनेक्शनचा आत्ता मार्ग मोकळा

अमोल भोसले,उरुळी कांचन –

शेतकरयांना वीज पम्प कनेक्शनसाठी स्वतंत्र ट्रान्सफर्मर घ्यावा लागणार ही जाचक अट आत्ता रद्द झाली असून यापुढे पूर्वी प्रमाणेच कनेक्शन देण्याचा निर्णय ऊर्जा मंत्र्यांनी घेतल्याची माहिती राज्य इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किणीकर यांनी दिली आहे. या निर्णयामुळे गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेला दोन ते अडीच लाखाचा खर्चाचा भुरदण्ड कमी होऊन तो आता १० ते २० हजारावर खाली आला आहे. शिवाय ५ ते ६ वर्ष थांबलेली वीज जोड कनेक्शन देण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. हे महाराष्ट्र राज्य अरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली दीर्घ काळ दिलेल्या लढ्याचे यश आहे असेही किणीकर यांनी नमूद केले आहे.

कृषी पँपना वीज जोड घेण्यासाठी स्वतंत्र ट्रान्सफर्मर घेण्याची जाचक अट मागील फडणवीस सरकारने घातली होती. या निर्णयास राज्यातील तमाम शेतकरी वर्गाच्या हिता विरोधी असल्यानं यास प्रचंड विरोध असतानाही फडणवीस सरकाने हा निर्णय लादला होता. शेतपिकाना वेळेवर पाणी देणे आवश्यक असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून स्वतंत्र ट्रान्सफर्मर साठी दोन ते अडीच लाख रुपये भरून विजजोडसाठी अर्ज केले. परंतु महा वितरणने अपुरी यंत्रणा असल्याचे कारण देत वीज जोड देण्यास टाळा टाळ केली होती. पैसे भरून देखील शेतकरी वीज जोड मिळण्यासाठी महा वितरणकडे उंबरे झिजवत होते. राज्य इरिगेशन फेडरेशनने प्रा एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या मार्च मध्ये ऊर्जा मंत्री यांचे समवेत बैठक घेऊन स्वतंत्र कनेक्शनसाठी ट्रान्सफर्मर घेण्याची जाचक अट रद्द करावी ही मागणी केली होती. या नंतर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, यांच्या पुढाकाराने कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील आमदार यांचेसह ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे समवेत मंत्रालयात बैठक घेण्यात आली.

याच बैठकीत वीज जोड प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन ऊर्जा मंत्री राऊत यांनी दिलेले होते परंतु नंतर उदभवलेल्या कोरोना परिस्थितीने या संबंधी हालचाली थांबल्या होत्या.दरम्यान राज्यात वीज जोड लाखो प्रकरणे प्रलंबित असल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरलेली होती. दरम्यान वीज वितरणने शेतकऱ्यांना सौर उर्जेवरील वीज जोड देण्याचा पर्याय पुढे मांडला, परंतु शेतकरी वर्गाने यास प्रतिसाद दिला नाही.
त्यामुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत याना वीज जोड धोरणात बदल करून व्यापक आणि शेतकरी हितावह निर्णय घ्यावा लागला. विशेष – ऊर्जा मंत्री यांची घोषणा- वीज जोड धोरणातील बदल करण्याची ऊर्जा मंत्री याची घोषणा हा प्रा, एन, डी, पाटील यांच्या दीर्घ काळ दिलेल्या लढ्याचे यश आहे, वीज जोड साठी स्वतंत्र ट्रान्सफर्मर ही अट रद्द करणार. कमी खर्चात वीज जोड देणार — नव्या वीज जोड धोरणा नुसार यापूर्वी पैसे भरून जोडसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या स्वतंत्र ट्रान्सफर्मर ऐवजी पूर्वी प्रमाणेच वीज जोड देणार. १०० होलटच्या एका ट्रान्स्फरवर २० ते २५ शेतकऱ्यांना वीज जोड देणार, त्यामुळे महा वितरणाचा खर्च वाचणार आहे, शेतकऱ्यांना यापुढे फक्त १०ते २० हजार रूपये द्यावे लागणार.

महा वितरणला १५०० कोटी मिळणार — वीज कनेक्शन जोडण्यासाठी म्हणून शासन महा वितरणला वर्षाला १५०० कोटी रुपये देणार आहे, हे पैसे पुढील पाच वर्ष दरवर्षी नियमित मिळणार आहेत.

यामुळे वीज जोड देण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघाला आहे. मागील फडणवीस सरकाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाच फळे शेतकरी अद्याप पर्यंत भोगत आहेत,यासाठी प्रा, एन, डी, पाटील यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ रस्तावरील आणि मंत्रालय पातळीवर दिलेल्या इरिगेशन फेडरेशनचे हे यश आहे.
आघाडी शासनाचे अभिनंदन — आघाडी सरकारने वीज जोडसाठी फडणवीस सरकारने घेतलेला जाचक निर्णय रद्द करून शेतकऱ्यांना अंत्यत कमी खर्चात त्वरित वीज जोड निर्णयाचे राज्यातील तमाम शेतकरी वर्गाचे वतीने आघाडी सरकारच् हार्दिक अभिनंदन.

Previous articleवाघोली गावच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असेल -आमदार अशोक पवार
Next articleयुवकमित्र परिवार आयोजित राज्यस्तरीय युवा संमेलन उत्साहात सपंन्न