संग्राम घोडेकर प्राणघातक हल्ला प्रकरणी मुख्य सूत्रधार चंद्रशेखर कोराळे याला अटक

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे काल (दि ७ ) रोजी कोल्हे मळा येथे झालेल्या सामाजिक कार्यकर्ते संग्राम घोडेकर यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार चंद्रशेखर कोऱ्हाळे यांना नारायणगाव पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक केली आहे. या गुन्ह्यातील अन्य चार आरोपींची नावे देखील निष्पन्न झाली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

दरम्यान या हल्ला प्रकरणी संग्राम घोडेकर यांच्या दुसऱ्या पत्नी रत्ना घोडेकर यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये काल दिनांक ७ रोजी चंद्रशेखर कोऱ्हाळे यांच्याविरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात आरोपींवर भारतीय दंड विधान कलम ३०७, ५०६, १२० (ब) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी अवघ्या चोवीस तासाच्या आत माजी पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर कोऱ्हाळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यानुसार पोलिस चौकशी अंती या प्रकरणातील अन्य आरोपी प्रशांत माने (वय ३८, रा. नारायणगाव), सोन्या राठोड ( वय २४, रा. चौदा नंबर), साहिल शेख (वय १८, रा. वारूळवाडी) व भावेश राजेंद्र लेंडे (वय २० रा. पिंपळवंडी) या चार अन्य आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यांना शोधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख व उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक रवाना झाले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुंड यांनी सांगितले.

या घटनेचा काही तासातच छडा लावणाऱ्या नारायणगाव पोलिसांचे समस्त ग्रामस्थांच्या वतीने पोलीस स्थानकावर एसटी स्टँड ते नारायणगाव असे चालत जाऊन अभिनंदन करण्यात आले.

 युवा नेते सुजित खैरे, मुक्ताई देवस्थानचे विश्वस्त विकास नाना तोडकरी, सरपंच योगेश पाटे, आशिष माळवदकर, भागेश्वर डेरे, अजित वाजगे, जयेश कोकणे, ऍडव्होकेट राजेंद्र कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य राजू बाप्ते, गणेश पाटे, संतोष पाटे, आरिफ आतार, संतोष दांगट, ईश्वर पाटे, आकाश काणसकर, अनिल खैरे, राजू पाटे, किरण ताजणे, निलेश जाधव, हेमंत कोल्हे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleऔरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी महाराज नगर करण्याची पुणे जिल्हा मनसेची मागणी
Next articleमंचर पोलीस ‘‘ जिल्ह्यातील सर्वोत्तम संघटीत गुन्हेगारीवर उत्कृष्ट प्रतिबंधक कारवाई’’ या पुरस्काराने सन्मानित