युवकमित्र परिवार आयोजित राज्यस्तरीय युवा संमेलन उत्साहात सपंन्न

अमोल भोसले,पुणे

विवेकानंदाच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी आजच्या युवकांनी कठोर परिश्रम घेणे गरजेचे असून अंगी असलेल्या युवाशक्तीद्वारा देशासमोरील आव्हानावर उपाय शोधणे आवश्यक असल्याचे मत प्रसिद्ध वक्ते साहित्यिक युसूफ पठाण यांनी पत्रकार भवन येथे आयोजित ‘युवकमित्र राज्यस्तरीय युवा संमेलनात व्यक्त केले. राजमाता आई जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती निमित्त युवकमित्र परिवार, नंदूरबार या राज्यात वाचन चळवळ राबवीणाऱ्या संस्थेमार्फत पुणे शहरात ‘राज्यस्तरीय युवा संमेलन’ यशस्वी पार पडले.

यावेळी राज्यात युवा चळवळीत कार्य करणाऱ्या युवक, युवतीचा व उपक्रमशील शिक्षक, पत्रकार बांधवाचा यावेळी ‘ युवा प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून महाएनजीओ फेडरेशनचे संचालक मुकुंद शिंदे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरु युवा केंद्राचे पुणे जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर तर प्रमुख अतिथी म्हणून विश्व जनकल्याण समितीच्या अध्यक्षा छायाताई भगत, येरवडा येथील सावित्रीबाई फुले सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्वला गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार बाळकृष्ण बागुल, राज्य युवा परिषदेचे समन्वयक प्रवीण प्रधान, युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन, उदयकाळ फौंडेशनचे अध्यक्ष मयूर बागुल, युवकमित्रचे प्रदीप देवरे लोढरेकर, वाचन चळवळीचे कार्तिक चव्हाण यांच्यासह राज्यातील युवक युवती उपस्थित होते. अमर हजारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रमोद पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Previous articleवीज पंपाच्या कनेक्शनचा आत्ता मार्ग मोकळा
Next article२८ वर्षांपासून वाळुंजवाडी बेपत्ता,प्रशासनाचा गलथान कारभारामुळे विकासापासून वंचित