नारायणगावात सामाजिक कार्यकर्ते संग्राम घोडेकर यांच्यावर कोयत्याने हल्ला

किरण वाजगे,नारायणगाव – येथील मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे माजी संचालक स्वर्गीय जगन्नाथ घोडेकर यांचे चिरंजीव व सामाजिक कार्यकर्ते संग्राम घोडेकर यांच्यावर आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील कोल्हे मळा येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला. अज्ञात तीन जणांनी मोटरसायकल वर येऊन घोडेकर यांच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केले असल्याचे समजते. घोडेकर हे गंभीर जखमी झाले असून. हल्ला केल्यानंतर मारेकरी पसार झाले आहेत.

दरम्यान घोडेकर यांना नारायणगाव येथील डॉ. भोसले हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले.

परंतु डोक्यामध्ये गंभीर स्वरूपाचे वार असल्यामुळे घोडेकर यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. संग्राम घोडेकर हे सामाजिक कार्यकर्ते असून ते सध्या मुक्ताई देवस्थान च्या कार्यालयात कार्यरत होते. मुक्ताई देवस्थानच्या वतीने सध्या चालू असलेल्या मोठ्या सांस्कृतिक हॉलच्या कामाची देखरेख ते करत होते. या घटनेचा पुढील तपास नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड व पोलीस कर्मचारी करत आहेत.

Previous articleक्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
Next articleसहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणासाठी विशेष मार्गदर्शन मोहिमेचे आयोजन सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांची माहिती