Home Blog Page 480

वसंतराव भसे यांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून साबुर्डी –  कहू रस्त्याची केली दुरुस्ती

चाकण-खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंतराव भसे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला. वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळून दुरवस्था झालेल्या खेड तालुक्यातील पश्चिम पट्टयातील साबुर्डी –  कहू या रस्त्यावर स्वखर्चाने भराव करून रस्ता प्रवास व येण्याचा जाण्याकरता दुरुस्त करत सामाजिक बांधिलकी जपली.

खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस चे वसंतराव भसे यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने वसंतराव भसे मित्र परीवार यांच्या माध्यमातुन  साबुर्डी गावामध्ये दळणवळणाच्या दृष्टीने  महत्वाच्या असणाऱ्या साबुर्डी (देशमुखवाडी) ते कहु या रस्त्यावर भराव करुन मुरुमीकरण व सपाटीकरण करण्यात आले.

यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंतराव भसे, देवीदास सस्ते पाटिल, उपसरपंच साबुर्डी विजयराव हुरसाळे, माजी सरपंच सुधाकर देशमुख,पांडुरंग आण्णा देशमुख, शरदकाका सावंत, आझाद देशमुख, सागर गायकवाड आदींसह साबुर्डी ग्रामस्थ ऊपस्थित होते. दरम्यान दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या रस्त्याचे सपाटीकरण केल्याने वसंत भसे यांचे आभार माणुन साबुर्डीकरांनी समाधान व्यक्त केले.

चीन सीमेवर हुतात्मा झालेल्या वीर जवानांना शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन व सह्याद्री प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने वाहण्यात आली श्रद्धांजली

अतुल पवळे पुणे

शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन व सह्याद्री प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने चीन सीमेवर हुतात्मा झालेल्या वीर जवानांना काल संकल्प चौक, चिंचवडेनगर येथे हुतात्मा स्मारक समोर श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी मोठ्या प्रमाणात येथे राष्ट्र प्रेमी नागरिक जमले होते, मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टनसिंग चा वापर करत चिनी मालाचा बहिष्कार आणि स्वदेशी मालाचा स्वीकार याबाबत नागरिकांनी उस्फुर्त पणे घोषणा दिल्या.

हिंदुस्थान आणि चीन मध्ये सीमेवर झालेल्या हिंसक झटापटीत आपल्या देशाचे जवान हुतात्मा झाले, आपण आपल्या देशाचे सजग नागरिक म्हणून चिनी मालाचा बहिष्कार करत चीन ला धडा शिकवलाच पाहिजे, अश्या प्रतिक्रिया मान्यवरांनी दिल्या.

यावेळी नगरसेविका व ब प्रभाग अध्यक्षा सौ.करूणा शेखर चिंचवडे,शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व भाजपा पिं चिं शहर जिल्हा चे उपाध्यक्ष शेखर बबनराव चिंचवडे, सहयाद्री प्रतिष्ठान चे श्री.श्रमीकजी गोजमगुंडे, डॉ. चंद्रशेखर गोजमगुंडे,सौ.श्रिया गोजमगुंडे, सौ.पल्लवी मारकड, सौ.वैशाली कदम श्री.आबा पडवळ, श्री.विजय शिंदे, श्री.रणजित औटी, श्री. अतुल वरपे, श्री.वसंत ढवळे, श्री.शिवाजी चिंचवडे, श्री.विशाल वाणी, श्री गौरव शेवाळे तसेच इतर मान्यवर, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन व सह्याद्री प्रतिष्ठान चे सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी मंत्री महादेव जानकर यांनी शेळीपालन करणाऱ्या मोरे इंनोवेटीव्ह फार्म”ला दिली भेट

अतुल पवळे पुणे

माजी दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर साहेब यांनी आमच्या “मोरे इंनोवेटीव्ह फार्म”ला भेट दिली.त्यावेळी त्यांच्या हस्ते शेततळ्याचे उदघाटन केले व आठवण म्हणून त्यांच्या हस्ते आंब्याच्या रोपाची लागवड केली.पंचायत समिती सदस्या पुजा मोरे यांचे वडील अशोक मोरे यांच्या मेहनीतुन व कल्पनेतून उभा केलेल्या आधुनिक शेळी पालन प्रकल्पाला भेट दिली.व शेतात फिरून गोदावरी पट्यातील भौगोलिक परिस्थितीचा व पाणी परिस्थितीचा आढावा घेतला.

या वेळी पंचक्रोशीतील शेतकर्यांसोबत त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दूध,शेळीपालन, मत्स्यपालन चा आधार घ्या असे आवाहन केले.या त्यांच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या पारंपरिक शेतीचा दृष्टिकोन बदलून आधुनिकतेकडे ते वाटचाल करतील यात शंका नाही.

खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश युक्रेन मध्ये अडकलेले विद्यार्थी महाराष्ट्रात परतले

पुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून युक्रेनमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी नुकतेच पुण्यात परतले.

भारतातील शेकडो विद्यार्थी युक्रेनमधील केआयवायव्ही (KIYV) युनिव्हर्सिटीत वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र संपल्याने त्यांना भारतात परत येणे गरजेचे होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विमानसेवा बंद झाल्याने या विद्यार्थ्यांना भारतात परत येण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी होती. या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी खासदार डॉ. कोल्हे यांना ई-मेल, व्हॉट्स ॲप, ट्विटर, फेसबुक अशा विविध माध्यमातून संपर्क साधून मदतीची विनंती केली होती.

डॉ. कोल्हे यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून सकारात्मक प्रतिसाद देत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार करुन ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत फ्लाईट उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर केंद्र सरकारने युक्रेनमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष विमानसेवा उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली. त्यानंतर अन्य भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यार्थीही परत येणे अपेक्षित असताना विमानात जागा देताना आपल्याला डावलण्यात येत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या.

डॉ. कोल्हे यांनी या तक्रारीची दखल घेऊन परराष्ट्रमंत्री जयशंकर व नागरी हवाई वाहतूक मंत्री यांच्याशी पुन्हा पत्रव्यवहार केला. डॉ. कोल्हे यांनी नेटाने व संयमाने परिस्थिती हाताळत पाठपुरावा केल्यामुळे अखेरीस केआयवायव्ही (kiyv) युक्रेन – पुणे फ्लाईटमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार जवळपास ३०-४० विद्यार्थी गुरुवारी (दि. १८ रोजी) पुण्यात परतले. आपल्याला परत येण्यासाठी मदत करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी डॉ. कोल्हे यांचे आभार व्यक्त केले.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, युक्रेनमधून ही पहिली बॅच भारतात परत आली असून उर्वरीत सर्व विद्यार्थी परत येईपर्यंत आपण पाठपुरावा करणार आहोत. युक्रेन व्यतिरिक्त रशिया, किर्गिजस्तान येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठीही माझे प्रयत्न सुरू असून तेथील काही विद्यार्थी परतही आले आहेत. त्याचप्रमाणे नोकरी गमावलेल्या सौदी अरेबियातील महाराष्ट्रातील नागरिकांनीही परत आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. यापैकी अनेकांना ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत परत आणण्यात यश आले असले तरी अद्याप खूप मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील नागरिक परदेशात विविध ठिकाणी अडकले आहेत. यापैकी असंख्य लोकं माझ्याशी संपर्क साधत आहेत. त्यांना माझ्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी निश्चित प्रयत्नशील आहे, असे डॉ. कोल्हे म्हणाले.

खंडणी मागितल्या प्रकरणी रांजनी येथील पोलीस पाटील व त्याच्या मुलाविरुद्ध फिर्याद दाखल

 प्रमोद दांगट, प्रतिनिधी : निरगुडसर

मंचर पोलीस ठाण्यात असलेले प्रकरण मिटवण्यासाठी ३५ हजार रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी रांजणी गावचे पोलीस पाटील व त्यांच्या मुलाविरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार दगडू आप्पा औटी हे राहणार रांजनी ता. आंबेगाव जिल्हा पुणे हे गावातीलच गणेश वाघ यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करतात. दिनांक ३० रोजी गावातील भगवान वाघ यांनी सांगितले की मातंग वस्ती येथील महिलांना मोलमजुरीसाठी घेऊन जा त्यावेळी फिर्यादी हा मातंग वस्तीवर गेला असता तेथील दीपक कांताराम खुडे यांनी लॉकडाऊन काळात तुम्ही कुठे कामाला जाता असे विचारले यावरून फिर्यादी व दीपक खुडे यांच्यात बाचाबाची झाली त्यानंतर दिनांक ८ रोजी गावातील गणेश वाघ हे फिर्यादीस म्हणाले की दिपक खुडे याने तुझ्या विरोधात पोलीस ठाण्यात केस दाखल केली आहे. त्यानंतर दिनांक 9 रोजी सोनवणे पोलीस पाटील म्हणाले की तुझ्यावर दिपक खुडे यांनी अँड्रॉसिटी कलमाद्वारे तक्रार अर्ज पोलीस स्टेशनला दिला असून तु मला अडीच लाख रुपये दे मी दिपक खुडेला लगेच केस मागे घेण्यास सांगतो त्यानंतर फिर्यादी यांनी माझ्याकडे एवढे पैसे नाहीत असे सांगितले असता पोलीस पाटील यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी ३५ हजार रुपये तरी द्यावे लागतील नाहीतर तुझ्याविरुद्ध अँड्रॉ सीटी चा गुन्हा दाखल होईल अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी हा घाबरला व आपल्यावर गुन्हा दाखल होईल म्हणून काही दिवस आपल्या बहिणीकडे गेला त्यानंतर काही दिवसांनी तो गावात आला असता फिर्यादीचा मालक गणेश वाघ यांनी पोलीस पाटील यास दिनांक ११ रोजी हे प्रकरण मिटवण्यासाठी १० हजार रुपये दिले असल्याचे सांगितले.व अजून २५ हजार मागत असल्याचे सांगितले याबाबत फिर्यादी दगडू आप्पा औटी यांनी पोलीस पाटील रोहिदास सोनवणे व त्यांचा मुलगा प्रशांत रोहिदास सोनवणे यांच्या विरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.

रांजनी येथे जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

प्रमोद दांगट निरगुडसर, प्रतिनिधी

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रांजणी तालुका आंबेगाव येथे चांभार समाजाच्या कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जनाविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की रांजणी येथील प्रशांत रोहिदास सोनवणे शनिवार दिनांक 6 रोजी नेहमीप्रमाणे गावातील नरसिंह देवस्थानच्या मंदिरात दर्शनासाठी गेले असता तेथील त्यांच्या गावातील भगवान महादू वाघ व ऋतिक बंडेश वाघ यांनी काही एक कारण नसताना ये चांभारडया तुला गावातून काढून टाकणार आहे असा दम दिला तसेच तुझ्या बापाची पाटीलकी काढून टाकन्यासाठी प्रयत्न करतो असेही म्हणाले त्यानंतर दिनांक ११ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास फिर्यादी मळ्यातून त्याची पत्नी सह येत असतांना गावातील गणेश निवृत्ती वाघ, तेजस लक्ष्मण भोर, योगेश बाळासाहेब भोर ,महादू बाबुराव भोर यांनी जातीवाचक शिवीगाळ केली.

याबाबत प्रशांत रोहिदास सोनवणे यांनी मंचर पोलीस ठाण्यात वरील सहा जणांविरोधात फिर्याद दाखल केली असून त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.

गिरवली येथे जमिनीच्या वादातुन बाप लेकाला मारहाण

प्रमोद दांगट, निरगुडसर प्रतिनिधी

घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या गिरवली तालुका आंबेगाव तेथे जमिनीच्या वादातुन रागातून शुक्रवार दि.११ रोजी येथील दिपक गोपाळ पाटील यांना व त्याच्या वडिलांना मारहाण करण्यात आली असून त्यांनी यासंदर्भात घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार गिरवली गावातील फिर्यादी दिपक पाटील व भाऊसाहेब बंडू सैद यांची चिंचोडी (लांडेवाडी) येथील जमिनीवरुन वाद असून त्या संदर्भात फिर्यादी यांनी अनेकवेळा भाऊसाहेब बंडू सैद यांस भेटून व फोन करुन सदरची जमिन पुन्हा आमचे नावावर करुन दे असे सांगत होतो. त्यानंतर दि.११ रोजी भाऊसाहेब सैद याने फिर्यादीस फोन करुन जमिनीचे वादाचे संदर्भात बोलायचे आहे, तु इकडे येऊ शकतो का? असे विचारले असता फिर्यादी आपल्या गावी जाऊन आपल्या वडिलांना घेऊन भाऊसाहेब सैद यांना भेटण्यासाठी गेला त्यावेळी प्रसाद भाऊसाहेब सैद याने फिर्यादिस गाडीतुन खाली ओढून लोखंडी गजाने मारहाण केली. फिर्यादीचे वडील गोपाळ चिमाजी सैद हे मधे पडले असता त्याठिकाणी भाऊसाहेब सैद,यांनी लाकडी काठीने मारहाण करण्यास सुरवात केली.फिर्यादी आपल्या वडीलांना वाचविण्यासाठी गेले असता प्रसाद सैद व इतर सर्वांनी मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत दिपक गोपाळ पाटील यांनी भाऊसाहेब बंडू सैद, त्यांचा मुलगा प्रसाद भाऊसाहेब सैद, पत्नी अनिता भाऊसाहेब सैद, रामदास नबाजी सैद, युवराज महादेव मुळुक, उत्तम सबाजी सैद (सर्व रा.गिरवली ता.आंबेगाव जि.पुणे )यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास घोडेगाव पोलिस करत आहेत.

शिरुर तालुक्यात महिला सरपंचाने दबंग कामगिरी करीत अवैधरित्या दारू विकणाऱ्यास दिला चोप

बाबाजी पवळे:शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला गावच्या दबंग सरपंच मनीषा खेडकर यांनी आज अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या इसमास चोप दिला असून संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरातच खळबळ  उडाली आहे.

पिंपरी दुमाला परिसरामध्ये सदर इसम हा गेल्या अनेक दिवसांपासून गावातील काही लोकांच्या राजकीय वरदहस्तामुळे दारू विक्री करत होता. मात्र या दारू विक्री मुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले होते ही बाब वारंवार सरपंच मनीषाताई खेडकर यांना खटकत होती. या बाबत पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सांगून पोलीसांकडून तात्पुरती कारवाई होत होती.पून्हा दारु धंदे जोमात सुरु होत असे.

त्यामुळे या दारु विक्रेत्याला धडा शिकवायचा या उद्देशाने मनिषा खेडकर यांनी तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन शेळके पोलीस पाटील संतोष जाधव यांच्या उपस्थितीमध्ये या दारू विक्रेत्यास चांगलाच धडा शिकवला. झालेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे व मनीषाताई यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले जात आहे.

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी व लोकप्रतिनिधींनी या अवैध व्यवसायावर आळा घालावा अशी मागणी मनिषाताई खेडकर व ग्रामस्थांनी केली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमातून फिरु लागताच रांजणगाव पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मुद्देमाल जप्त केला आहे.

जेष्ठ पञकार एस. एम. देशमुख  यांची विधान परिषदवर आमदार म्हणून नियुक्ती करावी…खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकार बांधवाच्या वतीने निवेदन

उरुळी कांचन — प्रतिनिधी

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून निवड करण्यात यावे ,अशा मागणीचे निवेदन मराठी पञकार परिषद व पुणे जिल्हा पञकार संघाने बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना दिले. त्यांच्यासमवेत आमदार संजय जगताप ,माजी आमदार अशोक टेकवडे,जेष्ठ नेते सुदामआप्पा इंगळे, शामकांत भिंताडे, हेमंतकुमार माहूरकर,पीडीसी बँकेचे संचालक प्रा.डाँ.दिगंबर दुर्गाडे, पुणे जि.प.सदस्य दत्ताञय झुरंगे, निमंञित सदस्य शिवाजी पोमण, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, महिला अध्यक्षा गौरी कुंजीर ,अँड.कलाताई फडतरे आदीसह काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते
निवेदनप्रसंगी मराठी पञकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पुणे जिल्हा पञकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर ,जिल्हा समन्वयक सुनील जगताप ,परिषद प्रतिनिधी एम.जी.शेलार, उपाध्यक्ष सुर्यकांत किंद्रे, जिल्हा प्रतिनिधी बी.एम.काळे, चंद्रकांत जाधव, प्रदिप जगताप ,भोर तालुका पञकार संघ अध्यक्ष सारंग शेटे, हवेली तालुका पञकार संघ सचिव अमोल भोसले, विजय तुपे, पुरंदर तालुका पञकार संघ उपाध्यक्ष अमोल बनकर, राहुल शिंदे, सचिव योगेश कामथे ,सहसचिव वामन गायकवाड ,संघटक भरत निगडे, ए.टी.माने, हनुमंत वाघले, योगेश खुटवड आदी उपस्थित होते.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून निवड करण्यात यावे यासाठी राज्यभर सर्वच पञकार आपल्यापरीने सर्वोतोपरी योगदान देत आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांचा कोरोना पार्श्वभूमीवर पुरंदर तालुका दौरा होता.यावेळी त्यांना मराठी पञकार परिषद ,पुणे जिल्हा पञकार संघ,पुरंदर ,भोर,हवेली तालुका पदाधिकारी यांनी भेट घेवून निवेदन दिले.एस.एम.देशमुख यांनी पञकार व पञकारांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी घेतलेले कष्ट,पञकार हितासाठी केलेले प्रयत्नपुर्वक योगदान यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पञकार त्यांच्या पाठीशी उभे ठाकले आहेत.त्यांना राञ्यपाल कोट्यातून आमदार म्हणून विधानपरिषदेवर नियुक्त करावी अशी मागणी पञकार पदाधिकारी यांनी खा.सुप्रिया सुळे यांच्याकडे केली.
यावेळी खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या ,एस.एम.देशमुख यांचे पञकारीता क्षेञातील योगदान महाराष्ट्राला ज्ञात आहे.लोकनेते शरद पवार साहेब यांच्याशी बोलून चर्चा करण्याचे आश्वासन पञकार पदाधिकारी यांना दिले.

सासवड ( ता.पुरंदर ) येथे खा.सुप्रिया सुळे यांना निवेदन देत असताना सुनील लोणकर समवेत आ.संजय जगताप , शरद पाबळे,बापूसाहेब गोरे,सुनील जगताप ,एम.जी.शेलार,प्रदिप जगताप ,योगेश कामथे ,राहुल शिंदे,वामन गायकवाड,भरत निगडे,ए.टी.माने व इतर मान्यवर
( छायाचिञ – अमोल भोसले)