गिरवली येथे जमिनीच्या वादातुन बाप लेकाला मारहाण

प्रमोद दांगट, निरगुडसर प्रतिनिधी

घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या गिरवली तालुका आंबेगाव तेथे जमिनीच्या वादातुन रागातून शुक्रवार दि.११ रोजी येथील दिपक गोपाळ पाटील यांना व त्याच्या वडिलांना मारहाण करण्यात आली असून त्यांनी यासंदर्भात घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार गिरवली गावातील फिर्यादी दिपक पाटील व भाऊसाहेब बंडू सैद यांची चिंचोडी (लांडेवाडी) येथील जमिनीवरुन वाद असून त्या संदर्भात फिर्यादी यांनी अनेकवेळा भाऊसाहेब बंडू सैद यांस भेटून व फोन करुन सदरची जमिन पुन्हा आमचे नावावर करुन दे असे सांगत होतो. त्यानंतर दि.११ रोजी भाऊसाहेब सैद याने फिर्यादीस फोन करुन जमिनीचे वादाचे संदर्भात बोलायचे आहे, तु इकडे येऊ शकतो का? असे विचारले असता फिर्यादी आपल्या गावी जाऊन आपल्या वडिलांना घेऊन भाऊसाहेब सैद यांना भेटण्यासाठी गेला त्यावेळी प्रसाद भाऊसाहेब सैद याने फिर्यादिस गाडीतुन खाली ओढून लोखंडी गजाने मारहाण केली. फिर्यादीचे वडील गोपाळ चिमाजी सैद हे मधे पडले असता त्याठिकाणी भाऊसाहेब सैद,यांनी लाकडी काठीने मारहाण करण्यास सुरवात केली.फिर्यादी आपल्या वडीलांना वाचविण्यासाठी गेले असता प्रसाद सैद व इतर सर्वांनी मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत दिपक गोपाळ पाटील यांनी भाऊसाहेब बंडू सैद, त्यांचा मुलगा प्रसाद भाऊसाहेब सैद, पत्नी अनिता भाऊसाहेब सैद, रामदास नबाजी सैद, युवराज महादेव मुळुक, उत्तम सबाजी सैद (सर्व रा.गिरवली ता.आंबेगाव जि.पुणे )यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास घोडेगाव पोलिस करत आहेत.

Previous articleशिरुर तालुक्यात महिला सरपंचाने दबंग कामगिरी करीत अवैधरित्या दारू विकणाऱ्यास दिला चोप
Next articleरांजनी येथे जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल