शिरुर तालुक्यात महिला सरपंचाने दबंग कामगिरी करीत अवैधरित्या दारू विकणाऱ्यास दिला चोप

बाबाजी पवळे:शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला गावच्या दबंग सरपंच मनीषा खेडकर यांनी आज अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या इसमास चोप दिला असून संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरातच खळबळ  उडाली आहे.

पिंपरी दुमाला परिसरामध्ये सदर इसम हा गेल्या अनेक दिवसांपासून गावातील काही लोकांच्या राजकीय वरदहस्तामुळे दारू विक्री करत होता. मात्र या दारू विक्री मुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले होते ही बाब वारंवार सरपंच मनीषाताई खेडकर यांना खटकत होती. या बाबत पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सांगून पोलीसांकडून तात्पुरती कारवाई होत होती.पून्हा दारु धंदे जोमात सुरु होत असे.

त्यामुळे या दारु विक्रेत्याला धडा शिकवायचा या उद्देशाने मनिषा खेडकर यांनी तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन शेळके पोलीस पाटील संतोष जाधव यांच्या उपस्थितीमध्ये या दारू विक्रेत्यास चांगलाच धडा शिकवला. झालेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे व मनीषाताई यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले जात आहे.

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी व लोकप्रतिनिधींनी या अवैध व्यवसायावर आळा घालावा अशी मागणी मनिषाताई खेडकर व ग्रामस्थांनी केली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमातून फिरु लागताच रांजणगाव पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मुद्देमाल जप्त केला आहे.

Previous articleजेष्ठ पञकार एस. एम. देशमुख  यांची विधान परिषदवर आमदार म्हणून नियुक्ती करावी…खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकार बांधवाच्या वतीने निवेदन
Next articleगिरवली येथे जमिनीच्या वादातुन बाप लेकाला मारहाण