रांजनी येथे जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

प्रमोद दांगट निरगुडसर, प्रतिनिधी

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रांजणी तालुका आंबेगाव येथे चांभार समाजाच्या कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जनाविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की रांजणी येथील प्रशांत रोहिदास सोनवणे शनिवार दिनांक 6 रोजी नेहमीप्रमाणे गावातील नरसिंह देवस्थानच्या मंदिरात दर्शनासाठी गेले असता तेथील त्यांच्या गावातील भगवान महादू वाघ व ऋतिक बंडेश वाघ यांनी काही एक कारण नसताना ये चांभारडया तुला गावातून काढून टाकणार आहे असा दम दिला तसेच तुझ्या बापाची पाटीलकी काढून टाकन्यासाठी प्रयत्न करतो असेही म्हणाले त्यानंतर दिनांक ११ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास फिर्यादी मळ्यातून त्याची पत्नी सह येत असतांना गावातील गणेश निवृत्ती वाघ, तेजस लक्ष्मण भोर, योगेश बाळासाहेब भोर ,महादू बाबुराव भोर यांनी जातीवाचक शिवीगाळ केली.

याबाबत प्रशांत रोहिदास सोनवणे यांनी मंचर पोलीस ठाण्यात वरील सहा जणांविरोधात फिर्याद दाखल केली असून त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous articleगिरवली येथे जमिनीच्या वादातुन बाप लेकाला मारहाण
Next articleखंडणी मागितल्या प्रकरणी रांजनी येथील पोलीस पाटील व त्याच्या मुलाविरुद्ध फिर्याद दाखल