Home Blog Page 481

पिंपळगाव खडकी येथे वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई. सरपंच महिलेच्या सतर्कतमुळे महसुल खात्याला पकडण्यात यश ,

प्रमोद दांगट निरगुडसर, प्रतिनिधी

पिंपळगाव-खडकी येथील लिबाच्या मळ्यातील ओढ्यातुन बेकायदा वाळु उपसा करताना जेसीबी मशीन,ट्रॅक्टर ट्रॉली,ट्रक आणि दोन मोटार सायकली आणि दोन ब्रास वाळुचा साठा सरपंच महिलेच्या सतर्कतमुळे महसुल खात्याला पकडण्यात यश आले.हि धाडसी कारवाई रविवार दि.३१ रोजी पहाटे करण्यात आली.

पिंपळगांव-अवसरी खुर्द गावाच्या शिवेवर असणाऱ्या लिबाच्या मळ्यातील ओढ्यातुन जेसीबीच्या सहाय्याने वाळु काढत असल्याचा आवाज जवळच राहत असलेल्या सरपंच अश्विनी बांगर आणि त्यांचे पती अरुण बांगर यांना आला वाळुचोरांना कोणीतरी येत असल्याचा सुगावा लागताच त्यांनी अंधाराचा फायदा घेवुन जेसीबी,ट्रॅक्टर,ट्रक,दुचाकी मोटारसायकल ही वाहने तेथेच सोडुन पळुन गेले.त्यावेळी सरपंच अश्विनी बांगर यांनी वाळु चोरी करणारी वाहने येथे सापडल्याची माहिती तहसिलदार रमा जोशी,तलाठी नंदाराम आदक आणि पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांना दिली.पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांनी पोलिस उपनिरिक्षक अर्जुन शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाठविली.परंतु महसुल विभागाचे तलाठी हे सकाळी सहा वाजता आल्याचे सरपंच अश्विनी बांगर यांनी सांगितले.विशेष म्हणजे तलाठी भाऊसाहेब यांनी जेसीबी क्रमांक एमएच १२,ईबी १४०,ट्रक एमएच १२ केपी ४७३१ आणि दुचाकी गाडी नंबर एमएच सीएन ९५१२,एमएच१२ डीपी ६२७ आणि ट्रॅक्टर नंबर नसलेला ट्रॅक्टर यांचा पंचनामा केला.परंतु पंचनामा झाल्यानंतर तलाठी भाऊसाहेबांच्या उपस्थितीत एमएच १२ डीपी ६२७ दुचाकी मोटारसायकल अज्ञात इसमाने चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले.वाळुचोरीचा प्रकार गेल्या एक महिन्यापासुन चालु असतानाही महसुल विभागाला याची माहिती नसल्याबद्दल पिंपळगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरंपच आणि आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांबर यांनी आश्चर्य व्यक्त केले.ते म्हणाले महिला सरपंचांनी वाळु चोरुन नेणारी वाहने पकडली.तसेच तहसिलदारांना या घटनेची माहिती देण्यासाठी फोन करुन त्यांनी फोन उचलला नसल्याबद्दल खेद व्यक्त केला.पंचनामा तलाठी नंदाराम आदक,पोलिस पाटील बबुशा वाघ,पोलिस जवान सागर गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते दिपक ढोबळे यांचे हृदयविकाराने दुःखद निधन

प्रमोद दांगट: आंबेगाव तालुक्यातील अपंग अपंग बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणारे व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले पारगाव शिंगवे गावचे दिपक लक्ष्मण ढोबळे यांचे आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाल्याची दुःखद घटना घडली आहे. त्यांच्या या अचानक जाण्याने संपुर्ण गावात शोककळा पसरली असून संपूर्ण आंबेगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

दिपक ढोबळे यांनी तरुण वयातच अपंग हीच विकास व पुनर्वसन संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना करून या संघटनेच्या माध्यमातून अनेक अपंगांना न्याय मिळवून दिला होता तसेच अपंगांसाठी रोजगार मेळावे अपंगांना विविध सुविधा मिळवून देण्यासाठी मेळावे घेतले होते. तसेच गावच्या विकास कामात ते नेहमी सहभागी असायचे त्यांनी अपंगांच्या न्याय हक्कासाठी विविध आंदोलनाच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्या सह पुणे जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली होती अलीकडच्या काळात लॉक डाऊन असताना अपंगांना रेशनिंग मिळावे यासाठी त्यांनी विविध आमदार-खासदार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अगदी साध्या पद्धतीने विवाह करून आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली होती मात्र आज त्यांच्या या अचानक जाण्याने पारगाव शिंगवे गावावर शोककळा पसरली असून सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

‘रानपाखरांची शाळा’ ई-मासिकाचे उत्साहात प्रकाशन

गणेश सातव,वाघोली,पुणे-साहित्य सहवास’ या राज्य ग्रुप वर शिक्षक व विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेवून त्यांना प्रेरणा मिळेल या हेतूने साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर आणि तंत्रस्नेही शिक्षक संदीप गारकर यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला असून,यातून राज्यातील अनेक शिक्षकांना प्रेरणा मिळेल आणि लिखाणाला प्रोत्साहन मिळेल,या उद्देशाने साहित्य सहवास या राज्य ग्रुप मार्फत रानपाखरांची शाळा हे ईमासिक जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्या हस्ते ऑनलाइन नुकतेच प्रकाशित करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘रयतेचा वाली’ दैनिकाचे संपादक शाहू भारती,’शिक्षक ध्येय’ साप्ताहिकाचे संपादक मधुकर घायदार,प्रसिद्ध साहित्यिक सु.ल. खुटवड,प्रसिद्ध विनोदी लेखक उत्तम सदाकाळ,निवृत्त केंद्रप्रमुख अरुण मुंगसे,युवा कवी संदीप वाघोले,प्रकाशक माऊली गायकवाड आदी मान्यवर साहित्य सहवास या व्हाट्सअप ग्रुप वर ऑनलाइन उपस्थित होते.

जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेचे मुख्याध्यापक वारे गुरुजी यांनी मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत प्रथमत: साहित्य सहवास या ग्रुपवर मासिकाचे ऑनलाईन प्रकाशन केले.याच वेळी वारे गुरुजींचा एक व्हिडिओ ग्रुपवर प्रसिद्ध करण्यात आला.त्यात ते म्हणाले, सचिन बेंडभर व संदीप गारकर या साहित्यिक शिक्षकांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना ईमासिकाच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ निर्माण केले आहे.याचा निश्चितच फायदा शिक्षक व विद्यार्थ्यांनाही होईल, असा माझा विश्वास आहे.तसेच अनेक लिहिणारे हात यातून तयार होतील,या मासिकाचे प्रकाशन माझ्या हस्ते केल्याबद्दल मी संपादकांचे मनःपूर्वक आभार मानतो.तसेच वाचकांनीही यातील कविता,लेख,कथा बारकाईने वाचून त्याचा अभिप्राय जरूर कळवावा.
सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे सगळ्या गोष्टी जागेवरच थांबले आहेत.पण मिळालेल्या गोष्टीचा सदुपयोग करून शिक्षकांनी लिहित्या हातांना निर्माण केलेले व्यासपीठ निश्चितच पुढील काळात दिशादर्शक ठरेल असा विश्वास वारे गुरुजी यांनी व्यक्त केला.

राजगुरु युथ फेस्टीवल चे यशस्वी आयोजन

चाकण-खेडचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील व महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “राजगुरु युथ फेस्टीवल” चे लॉकडाऊन कालावधीमध्ये कोरोना’ विषाणू संसर्ग व रोगप्रसाराबद्दल जनजागृती करण्यासाठी आयोजन करण्यात आले होते.

यावेळी चित्रकला ,रांगोळी, कविता, निबंध, लेखन ,पोस्टर प्रेझेन्टेशन ,वक्तृत्व स्पर्धा अशा विविध माध्यमातून जनजागृती पर विषयांवर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेचे परीक्षण खेड तालुका शिक्षक संघाचे मा. सभापती मुगुटराव मोरे, कवी प्रा. महेंद्र गाडे,आदर्श शिक्षक बाळासाहेब आरेकर,दैनिक लोकमतचे पत्रकार भानुदास पऱ्हाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस मनोज मोरे यांनी केले. या राजगुरु युथ फेस्टीवल चे आयोजन आदर्श सरपंच शशिकांत मोरे युथ फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले.यावेळी महाराष्ट्राच्या सर्वंच जिल्ह्यातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.तसेच गोवा राज्यातूनही स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

राजगुरु युथ फेस्टीवलचे विजेते पुढीलप्रमाणे..

*शचित्रकला स्पर्धा
1.विजय भाऊसाहेब कराळे (वाफगाव)
2. श्रुती अग्रवाल (जळगाव)
3.समृद्धी सांडभोर (राजगुरूनगर)

निबंध स्पर्धा -खुला गट
1)रोहिणी लोंढे (राजगुरुनगर)
2)स्नेहल मुगूटराव मोरे (सिद्धेगव्हाण)
3)मनोहर दुलाजी मोहरे
4)सुवर्णा चंद्रकांत खैरे(खैरेनगर,शिरूर)

शालेय गट -1) प्रथमेश रमेश वाजे
2)तन्वी आनंदा मांजरे
3)रागिणी सुभाष आखाडे

काव्यलेखन स्पर्धा निकाल
1) बाळासाहेब दुंडे (दावडी ता.खेड)
2) सुचिता कराळे (वाफगाव,ता.खेड )
3)चंद्रकांत बो-हाडे
(रेटवडी ता.खेड)
4)मीना देवकुळे
(खराबवाडी,चाकण)

रांगोळी स्पर्धा
1.अनिरुद्ध संदिप खेडेकर (नांदगाव, रायगड)
2.वैष्णवी अशोक घुले (हडपसर,पुणे)
3.सुरेश शांताराम म्हैसधुणे (देवळाली,नाशिक)
4.अश्विनी दिपक वार्हाडे (वणी,यवतमाळ)

पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा
1.सिद्धी प्रकाश धनावडे (रावेत, पुणे)
2.स्वरांगी संतोष रासम (दादर,मुंबई)
3निधी दीपक मोहीले (माटुंगा,मुंबई)
4.अथर्व श्रीकृष्ण नाटेकर(मुंबई)

वक्तृत्व स्पर्धा
1.छाया पांडुरंग गावडे (धानोरे,पुणे)
2.अमोल पांडुरंग कांदे (आळंदी,पुणे)
3.आरती कोल्हे (डोंबिवली)
*आयोजक- आदर्श सरपंच शशिकांत मोरे पाटील युथ फाऊंडेशन*

संवाद  कौशल्याचा  प्रभावी वापर रोगजगारसंधींसाठी  उपयुक्त  – हेमांगी धोकटे

पुणे :  रोजगारसंधी प्राप्त करण्यासाठी संवाद  कौशल्याचा प्रभावी वापर उपयुक्त ठरतो  असे मत एक्च्युएशन टेक्नॉलॉजीस इर्मसन ऑटोसोल कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापिका हेमांगी  धोकटे यांनी  व्यक्त केले.  यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेन्ट  सायन्स (आयआयएमएस) तर्फे आयोजित  सॉफ्ट  स्किल्सचे  महत्व  या विषयावरील  वेबिनारमध्ये  त्या  बोलत होत्या. यावेळी पुढे बोलताना त्या  म्हणाल्या कि, इंटरव्ह्यूला जाताना आपली वेशभूषा नीटनेटकी व व्यक्तिमत्वास  अनुरूप असावी. तसेच  आपली आवड,  छंद या   बाबी  आपल्या करिअरला पोषक  कशा ठरतील  याकडेही  प्रत्येकाने  लक्ष  द्यावे, असे सांगत त्यांनी  आपले   विद्यार्थीदशेतील  अनुभव सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी वेबिनारमध्ये बोलताना टाइम्सऑफ इंडिया ग्रुपचे मुख्य मनुष्यबळ  व्यवस्थापक टिकम शेखावत

यांनी  सॉफ्ट स्किल्सचा प्रभावी वापर याबाबत मनोगत व्यक्त केले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,  नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाण्याअगोदर संबंधित  कंपनीबाबत व ज्या पदासाठी आपण नोकरीचा अर्ज करत असाल त्या पदाचे कामकाजाचे स्वरूप, जबाबदारी याबाबत  पुरेशी  माहिती करून घेणे   फायद्याचे ठरते. तसेच  इंटरव्हयु देताना तुम्हाला विचारल्या जाणाऱ्या  प्रश्नांची उत्तरे व्यक्तिगत पातळीवर न देता तुम्ही  ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या संबंधित पदावरील  व्यक्ती कशापद्धतीने त्या प्रश्नांना  उत्तरे देईल या मनोभूमिकेतून उत्तरे द्यायला हवीत असेही त्यांनी   सांगितले. तसेच प्रत्येकाने स्वतःच्या करिअरला  सहाय्यकारी ठरेल अशापद्धतीने स्वतःच्या व्यक्तिमत्वाची घडण करावी असेही नमूद केले.

याशिवाय वेबिनारच्या तिसऱ्या  वक्त्या  यशस्वी ग्रुपच्या मनुष्यबळ  व्यवस्थापिका मनिषा  खोमणे  यांनी  आपल्या मनोगतात   रेझ्युमे  व सादरीकरणाची  कौशल्ये परिणामकारक  कशी ठरू शकतात  याबद्दल मार्गदर्शन  केले, यावेळी बोलताना  त्या म्हणाल्या  कि, समोर येईल त्या आव्हानांना  सामोरे जाण्याची तयारी ठेवून कामात  बदल करायची वेळ आल्यास  तो सहजगत्या स्वीकारण्याची लवचिक मानसिकता जोपासणे  गरजेचे आहे. विशेषतः  आर्थिक संकट काळात  टिकून राहिल्याने ज्या ज्या  नवनवीन गोष्टी, बदल  हे स्वीकारावे लागतात  ते अंगिकारल्यामुळे पुढे जाऊन आपल्या  उज्वल भविष्यासाठी  असे अनुभव शिदोरी ठरतात.

या वेबिनारमध्ये  विविध व्यवस्थापन शास्त्र  महाविद्यालयांचे विद्यार्थी,प्राध्यापक  सहभागी  झाले होते, या वेबिनारसाठी समन्वयक म्हणून प्रा.अमर गुप्ता  यांनी काम पाहिले तर  आभारप्रदर्शन डॉ. वंदना मोहांती  यांनी केले.

                                 

पुणे विभागातील 10 हजार 455 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे :- पुणे विभागातील 10 हजार 455 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 16 हजार 469  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 5 हजार 269आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 745 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 264 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.48 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.52 टक्के आहे,अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

            यापैकी पुणे जिल्हयातील 12  हजार 919  बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 8  हजार 125  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 259 आहे. कोरोनाबाधित एकूण 535 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 264 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.89 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.14 टक्के इतके आहे.

            कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत  पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 576 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 530, सातारा जिल्ह्यात 21, सोलापूर जिल्ह्यात 24, कोल्हापूर  जिल्ह्यात 1 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

            सातारा जिल्हयातील 766 कोरोना बाधीत रुग्ण असून 560 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.        ॲक्टीव रुग्ण 171 संख्या  आहे. कोरोनाबाधित एकूण  35  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

            सोलापूर जिल्हयातील 1 हजार 811 कोरोना बाधीत रुग्ण असून 996 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 655 आहे. कोरोना बाधित एकूण  160 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

            सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 247 रुग्ण असून 130 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण 110 संख्या  आहे. कोरोना बाधित एकूण 7  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत 726 रुग्ण असून 644 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.   ॲक्टीव रुग्ण संख्या 74 आहे. कोरोना बाधित एकूण 8  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

            आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 24 हजार 612 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1  लाख 20 हजार 314  नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4  हजार 297 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1  लाख 3 हजार 585 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 16 हजार 469  नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.        

( टिप :- दि. 17 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तयार करा – विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या सूचना

पुणे, दि.17 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या आढावा घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तयार करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.

            कोरोना विषाणू प्रार्दुभाव निर्मूलन आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, साखर आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल, आदिवासी संसोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा नाईक आदि उपस्थित होते.

            विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोविड-19 च्या अनुषंगाने रुग्णांवर उपचार करीत असलेल्या रुग्णालयांचे लेखापरीक्षण करणे गरजेचे आहे. काही खाजगी रुग्णालय कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करीत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच काही खाजगी रुग्णालय कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर वाढीव दर आकारणी करीत असल्याच्याही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबी गंभीर असून कायद्याचे उल्लघंन करण्याऱ्या आहेत. रुग्णांवर उपचाराअंती देण्यात येणाऱ्या वैद्यकीय देयकांची तपासणी करण्यासाठी पाच अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्याबरोबरच कोरोना बाधित रुग्णांवर उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी दिल्या.

            या बैठकीत कोवीड-19 च्या अनुषंगाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. 21 मे रोजीच्या शासन निर्णयानुसार खाजगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा आरक्षित करणे. त्याचबरोबर रुग्णालयातील उपलब्ध असलेले बेडस्, व्हेंटिलेटर, आयसीयू बेड, खाजगी रुग्णालयात आरक्षित असलेले विलगीकरण कक्ष तसेच रुग्णालयात रुग्णांवर उपचार केल्यानंतर देण्यात येणाऱ्या खर्चाबाबतचा आढावाही घेण्यात आला.

अहिरे गावातील नागरिकांना एन डी ए प्रशासनाने वेळेची मर्यादित शिथिलता देण्याबाबत शिवसेनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना व तहसीलदारांना निवेदन


अतुल पवळे पुणे
कोरोनाच्या पाश्वभूमीवर सगळीकडे लाॅकडाऊन करण्यात आले होते. तेव्हापासून एन डी ए प्रशासनाने अहिरे गाव व जवळपासच्या सगळ्या वाड्यांना व नागरिकांना त्यांच्या हद्दीतून जा ये करण्यास काही कडक नियम घातले आहे. आता संपूर्ण देशात नियमांमध्ये शिथिलता करण्यात आल्या आहेत, तरी प्रशासन मात्र जुन्याच नियमानुसार चालत आहे. वेळेची बंधन देखील पूर्वीचीच लावत आहे. या भागातील लोक शेतकरी असल्याने त्यांना बि बियाणे व शेतीसंबंघी काही खरेदी करायची असल्यास सकाळी यावं लागत आहे, परंतु परत जाण्यासाठी मात्र संध्याकाळपर्यंत थांबावे लागत आहे. या सगळ्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, यासाठी शिवसेनेच्या वतीने नितीन वाघ माजी पंचायत समिती सदस्य यांनी पुणे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले, यामध्ये वेळेच बंधन वाढविण्यासाठी मागणी केली व नियमांमध्ये शिथिलता देण्याबाबत विनंती केली आहे.

एक तासाच्या आत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घेतली मनसेच्या तक्रारीची दखल

अतुल पवळे पुणे
प्रभाग क्रमांक १७मधील नवशांती निकेतन सोसायटी, मिरॅकल हौसिंग सोसायटी, चैतन्य पार्क सोसायटी येथील आवारात मोठ्या प्रमाणात ५ते ६ दिवसापासून कचरा असल्याची तक्रार मनसेचे चिंचवड विधानसभा उपविभाग अध्यक्ष प्रविण माळी यांच्याकडे तेथील स्थानिक नागरिकांनी केली. याची दखल घेऊन प्रविण माळींनी संबंधित अधिकार्यांशी बोलून तक्रारीचे निवारण केले व अधिकार्यांनी एक तासाच्या आत ३ घंटागाड्या पाठवून तेथील समस्या सोडविण्यासाठी सहकार्य केले.

मराठी पाऊल पडते पुढे, नितीन वाघ क्षेत्रिय प्रमुख खडकवासला विधानसभा

अतुल पवळे पुणे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तरूणांना आव्हान केले आहे की, व्यवसायासाठी सगळ्यांना संधी उपलब्ध आहे. आता तुम्ही पुढे या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा. या आव्हानाला प्रतिसाद देत,आज कोंढवे धावडे येथे शिवसैनिक संतोष शेलार यांना गावातील तरुण सहकारी अमीन विश्वकर्मा व प्रकाश पवार यांना विश्वकर्मा एंटरप्राइजेस नावाने कार्यालय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देऊन विशेष सहकार्य केले. या

कार्यालयाचे उद्घाटन करताना खडकवासला विधानसभा क्षेत्रिय प्रमुख नितीन वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी शिवसैनिक संतोष शेलार, गणेश गवांडे,महेश नायडू, अंकुश मोकाशी, अविनाश सरोदे, अनिल हगवणे, अमोल गुंजाळ व परिसरातील नागरिक उपस्थित होते.