पिंपळगाव खडकी येथे वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई. सरपंच महिलेच्या सतर्कतमुळे महसुल खात्याला पकडण्यात यश ,

प्रमोद दांगट निरगुडसर, प्रतिनिधी

पिंपळगाव-खडकी येथील लिबाच्या मळ्यातील ओढ्यातुन बेकायदा वाळु उपसा करताना जेसीबी मशीन,ट्रॅक्टर ट्रॉली,ट्रक आणि दोन मोटार सायकली आणि दोन ब्रास वाळुचा साठा सरपंच महिलेच्या सतर्कतमुळे महसुल खात्याला पकडण्यात यश आले.हि धाडसी कारवाई रविवार दि.३१ रोजी पहाटे करण्यात आली.

पिंपळगांव-अवसरी खुर्द गावाच्या शिवेवर असणाऱ्या लिबाच्या मळ्यातील ओढ्यातुन जेसीबीच्या सहाय्याने वाळु काढत असल्याचा आवाज जवळच राहत असलेल्या सरपंच अश्विनी बांगर आणि त्यांचे पती अरुण बांगर यांना आला वाळुचोरांना कोणीतरी येत असल्याचा सुगावा लागताच त्यांनी अंधाराचा फायदा घेवुन जेसीबी,ट्रॅक्टर,ट्रक,दुचाकी मोटारसायकल ही वाहने तेथेच सोडुन पळुन गेले.त्यावेळी सरपंच अश्विनी बांगर यांनी वाळु चोरी करणारी वाहने येथे सापडल्याची माहिती तहसिलदार रमा जोशी,तलाठी नंदाराम आदक आणि पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांना दिली.पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांनी पोलिस उपनिरिक्षक अर्जुन शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाठविली.परंतु महसुल विभागाचे तलाठी हे सकाळी सहा वाजता आल्याचे सरपंच अश्विनी बांगर यांनी सांगितले.विशेष म्हणजे तलाठी भाऊसाहेब यांनी जेसीबी क्रमांक एमएच १२,ईबी १४०,ट्रक एमएच १२ केपी ४७३१ आणि दुचाकी गाडी नंबर एमएच सीएन ९५१२,एमएच१२ डीपी ६२७ आणि ट्रॅक्टर नंबर नसलेला ट्रॅक्टर यांचा पंचनामा केला.परंतु पंचनामा झाल्यानंतर तलाठी भाऊसाहेबांच्या उपस्थितीत एमएच १२ डीपी ६२७ दुचाकी मोटारसायकल अज्ञात इसमाने चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले.वाळुचोरीचा प्रकार गेल्या एक महिन्यापासुन चालु असतानाही महसुल विभागाला याची माहिती नसल्याबद्दल पिंपळगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरंपच आणि आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांबर यांनी आश्चर्य व्यक्त केले.ते म्हणाले महिला सरपंचांनी वाळु चोरुन नेणारी वाहने पकडली.तसेच तहसिलदारांना या घटनेची माहिती देण्यासाठी फोन करुन त्यांनी फोन उचलला नसल्याबद्दल खेद व्यक्त केला.पंचनामा तलाठी नंदाराम आदक,पोलिस पाटील बबुशा वाघ,पोलिस जवान सागर गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

Previous articleसामाजिक कार्यकर्ते दिपक ढोबळे यांचे हृदयविकाराने दुःखद निधन
Next articleजेष्ठ पञकार एस. एम. देशमुख  यांची विधान परिषदवर आमदार म्हणून नियुक्ती करावी…खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकार बांधवाच्या वतीने निवेदन