सामाजिक कार्यकर्ते दिपक ढोबळे यांचे हृदयविकाराने दुःखद निधन

Ad 1

प्रमोद दांगट: आंबेगाव तालुक्यातील अपंग अपंग बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणारे व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले पारगाव शिंगवे गावचे दिपक लक्ष्मण ढोबळे यांचे आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाल्याची दुःखद घटना घडली आहे. त्यांच्या या अचानक जाण्याने संपुर्ण गावात शोककळा पसरली असून संपूर्ण आंबेगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

दिपक ढोबळे यांनी तरुण वयातच अपंग हीच विकास व पुनर्वसन संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना करून या संघटनेच्या माध्यमातून अनेक अपंगांना न्याय मिळवून दिला होता तसेच अपंगांसाठी रोजगार मेळावे अपंगांना विविध सुविधा मिळवून देण्यासाठी मेळावे घेतले होते. तसेच गावच्या विकास कामात ते नेहमी सहभागी असायचे त्यांनी अपंगांच्या न्याय हक्कासाठी विविध आंदोलनाच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्या सह पुणे जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली होती अलीकडच्या काळात लॉक डाऊन असताना अपंगांना रेशनिंग मिळावे यासाठी त्यांनी विविध आमदार-खासदार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अगदी साध्या पद्धतीने विवाह करून आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली होती मात्र आज त्यांच्या या अचानक जाण्याने पारगाव शिंगवे गावावर शोककळा पसरली असून सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.