‘रानपाखरांची शाळा’ ई-मासिकाचे उत्साहात प्रकाशन

गणेश सातव,वाघोली,पुणे-साहित्य सहवास’ या राज्य ग्रुप वर शिक्षक व विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेवून त्यांना प्रेरणा मिळेल या हेतूने साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर आणि तंत्रस्नेही शिक्षक संदीप गारकर यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला असून,यातून राज्यातील अनेक शिक्षकांना प्रेरणा मिळेल आणि लिखाणाला प्रोत्साहन मिळेल,या उद्देशाने साहित्य सहवास या राज्य ग्रुप मार्फत रानपाखरांची शाळा हे ईमासिक जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्या हस्ते ऑनलाइन नुकतेच प्रकाशित करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘रयतेचा वाली’ दैनिकाचे संपादक शाहू भारती,’शिक्षक ध्येय’ साप्ताहिकाचे संपादक मधुकर घायदार,प्रसिद्ध साहित्यिक सु.ल. खुटवड,प्रसिद्ध विनोदी लेखक उत्तम सदाकाळ,निवृत्त केंद्रप्रमुख अरुण मुंगसे,युवा कवी संदीप वाघोले,प्रकाशक माऊली गायकवाड आदी मान्यवर साहित्य सहवास या व्हाट्सअप ग्रुप वर ऑनलाइन उपस्थित होते.

जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेचे मुख्याध्यापक वारे गुरुजी यांनी मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत प्रथमत: साहित्य सहवास या ग्रुपवर मासिकाचे ऑनलाईन प्रकाशन केले.याच वेळी वारे गुरुजींचा एक व्हिडिओ ग्रुपवर प्रसिद्ध करण्यात आला.त्यात ते म्हणाले, सचिन बेंडभर व संदीप गारकर या साहित्यिक शिक्षकांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना ईमासिकाच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ निर्माण केले आहे.याचा निश्चितच फायदा शिक्षक व विद्यार्थ्यांनाही होईल, असा माझा विश्वास आहे.तसेच अनेक लिहिणारे हात यातून तयार होतील,या मासिकाचे प्रकाशन माझ्या हस्ते केल्याबद्दल मी संपादकांचे मनःपूर्वक आभार मानतो.तसेच वाचकांनीही यातील कविता,लेख,कथा बारकाईने वाचून त्याचा अभिप्राय जरूर कळवावा.
सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे सगळ्या गोष्टी जागेवरच थांबले आहेत.पण मिळालेल्या गोष्टीचा सदुपयोग करून शिक्षकांनी लिहित्या हातांना निर्माण केलेले व्यासपीठ निश्चितच पुढील काळात दिशादर्शक ठरेल असा विश्वास वारे गुरुजी यांनी व्यक्त केला.

Previous articleराजगुरु युथ फेस्टीवल चे यशस्वी आयोजन
Next articleसामाजिक कार्यकर्ते दिपक ढोबळे यांचे हृदयविकाराने दुःखद निधन