चीन सीमेवर हुतात्मा झालेल्या वीर जवानांना शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन व सह्याद्री प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने वाहण्यात आली श्रद्धांजली

अतुल पवळे पुणे

शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन व सह्याद्री प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने चीन सीमेवर हुतात्मा झालेल्या वीर जवानांना काल संकल्प चौक, चिंचवडेनगर येथे हुतात्मा स्मारक समोर श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी मोठ्या प्रमाणात येथे राष्ट्र प्रेमी नागरिक जमले होते, मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टनसिंग चा वापर करत चिनी मालाचा बहिष्कार आणि स्वदेशी मालाचा स्वीकार याबाबत नागरिकांनी उस्फुर्त पणे घोषणा दिल्या.

हिंदुस्थान आणि चीन मध्ये सीमेवर झालेल्या हिंसक झटापटीत आपल्या देशाचे जवान हुतात्मा झाले, आपण आपल्या देशाचे सजग नागरिक म्हणून चिनी मालाचा बहिष्कार करत चीन ला धडा शिकवलाच पाहिजे, अश्या प्रतिक्रिया मान्यवरांनी दिल्या.

यावेळी नगरसेविका व ब प्रभाग अध्यक्षा सौ.करूणा शेखर चिंचवडे,शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व भाजपा पिं चिं शहर जिल्हा चे उपाध्यक्ष शेखर बबनराव चिंचवडे, सहयाद्री प्रतिष्ठान चे श्री.श्रमीकजी गोजमगुंडे, डॉ. चंद्रशेखर गोजमगुंडे,सौ.श्रिया गोजमगुंडे, सौ.पल्लवी मारकड, सौ.वैशाली कदम श्री.आबा पडवळ, श्री.विजय शिंदे, श्री.रणजित औटी, श्री. अतुल वरपे, श्री.वसंत ढवळे, श्री.शिवाजी चिंचवडे, श्री.विशाल वाणी, श्री गौरव शेवाळे तसेच इतर मान्यवर, शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन व सह्याद्री प्रतिष्ठान चे सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleमाजी मंत्री महादेव जानकर यांनी शेळीपालन करणाऱ्या मोरे इंनोवेटीव्ह फार्म”ला दिली भेट
Next articleवसंतराव भसे यांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून साबुर्डी –  कहू रस्त्याची केली दुरुस्ती