वसंतराव भसे यांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून साबुर्डी –  कहू रस्त्याची केली दुरुस्ती

चाकण-खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंतराव भसे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला. वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळून दुरवस्था झालेल्या खेड तालुक्यातील पश्चिम पट्टयातील साबुर्डी –  कहू या रस्त्यावर स्वखर्चाने भराव करून रस्ता प्रवास व येण्याचा जाण्याकरता दुरुस्त करत सामाजिक बांधिलकी जपली.

खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस चे वसंतराव भसे यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने वसंतराव भसे मित्र परीवार यांच्या माध्यमातुन  साबुर्डी गावामध्ये दळणवळणाच्या दृष्टीने  महत्वाच्या असणाऱ्या साबुर्डी (देशमुखवाडी) ते कहु या रस्त्यावर भराव करुन मुरुमीकरण व सपाटीकरण करण्यात आले.

यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंतराव भसे, देवीदास सस्ते पाटिल, उपसरपंच साबुर्डी विजयराव हुरसाळे, माजी सरपंच सुधाकर देशमुख,पांडुरंग आण्णा देशमुख, शरदकाका सावंत, आझाद देशमुख, सागर गायकवाड आदींसह साबुर्डी ग्रामस्थ ऊपस्थित होते. दरम्यान दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या रस्त्याचे सपाटीकरण केल्याने वसंत भसे यांचे आभार माणुन साबुर्डीकरांनी समाधान व्यक्त केले.

Previous articleचीन सीमेवर हुतात्मा झालेल्या वीर जवानांना शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन व सह्याद्री प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने वाहण्यात आली श्रद्धांजली
Next articleसृष्टी वाचायची असेल झाडे लावली पाहिजे –  सुनिल जगताप