सृष्टी वाचायची असेल झाडे लावली पाहिजे –  सुनिल जगताप

अमोल भोसले-उरुळी कांचन

वृक्षारोपण रोपण काळाची गरज – सृष्टी वाचायची असेल झाडे लावली पाहिजे – झाडाच्या मुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात म्हटले आहे की, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी” सर्वांनी झाडे लावली पाहिजेत व त्यांचे संगोपन केले पाहिजे तरच भविष्यात आपण ऑक्सिजन नैसर्गिकरित्या घेऊ शकू अन्यथा तो विकत घेऊन जगण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे मत पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक तथा हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल जगताप यांनी व्यक्त केले.

हवेली तालुका पत्रकार संघाच्या व वनविभागाच्या संयुक्त विद्यमाने लोणी काळभोर वनक्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारच्या सुमारे ५० झाडांची लागवड करून जागतिक पर्यावरण दिन व हवेली तालुका पत्रकार संघाचे सदस्य चंद्रकांत दुंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

पुणे जिल्हा पत्रकार संघात प्रथमच सदस्याच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपणचा कार्यक्रम सोशल डिस्टनशिंग ठेऊन घेण्यात आला. याप्रसंगी वनअधिकिरी जागृती सातारकर, तुळशीराम घुसाळकर, राजेंद्र काळभोर, संदीप बोडके, अमोल अडागळे, विजय काळभोर, धनराज साळुंखे, निलेश करडे, रमेश भोसले, सुधीर कांबळे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Previous articleवसंतराव भसे यांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून साबुर्डी –  कहू रस्त्याची केली दुरुस्ती
Next articleहुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना महत्त्वाची – प्रमिला मडके