खंडणी मागितल्या प्रकरणी रांजनी येथील पोलीस पाटील व त्याच्या मुलाविरुद्ध फिर्याद दाखल

 प्रमोद दांगट, प्रतिनिधी : निरगुडसर

मंचर पोलीस ठाण्यात असलेले प्रकरण मिटवण्यासाठी ३५ हजार रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी रांजणी गावचे पोलीस पाटील व त्यांच्या मुलाविरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार दगडू आप्पा औटी हे राहणार रांजनी ता. आंबेगाव जिल्हा पुणे हे गावातीलच गणेश वाघ यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करतात. दिनांक ३० रोजी गावातील भगवान वाघ यांनी सांगितले की मातंग वस्ती येथील महिलांना मोलमजुरीसाठी घेऊन जा त्यावेळी फिर्यादी हा मातंग वस्तीवर गेला असता तेथील दीपक कांताराम खुडे यांनी लॉकडाऊन काळात तुम्ही कुठे कामाला जाता असे विचारले यावरून फिर्यादी व दीपक खुडे यांच्यात बाचाबाची झाली त्यानंतर दिनांक ८ रोजी गावातील गणेश वाघ हे फिर्यादीस म्हणाले की दिपक खुडे याने तुझ्या विरोधात पोलीस ठाण्यात केस दाखल केली आहे. त्यानंतर दिनांक 9 रोजी सोनवणे पोलीस पाटील म्हणाले की तुझ्यावर दिपक खुडे यांनी अँड्रॉसिटी कलमाद्वारे तक्रार अर्ज पोलीस स्टेशनला दिला असून तु मला अडीच लाख रुपये दे मी दिपक खुडेला लगेच केस मागे घेण्यास सांगतो त्यानंतर फिर्यादी यांनी माझ्याकडे एवढे पैसे नाहीत असे सांगितले असता पोलीस पाटील यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी ३५ हजार रुपये तरी द्यावे लागतील नाहीतर तुझ्याविरुद्ध अँड्रॉ सीटी चा गुन्हा दाखल होईल अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी हा घाबरला व आपल्यावर गुन्हा दाखल होईल म्हणून काही दिवस आपल्या बहिणीकडे गेला त्यानंतर काही दिवसांनी तो गावात आला असता फिर्यादीचा मालक गणेश वाघ यांनी पोलीस पाटील यास दिनांक ११ रोजी हे प्रकरण मिटवण्यासाठी १० हजार रुपये दिले असल्याचे सांगितले.व अजून २५ हजार मागत असल्याचे सांगितले याबाबत फिर्यादी दगडू आप्पा औटी यांनी पोलीस पाटील रोहिदास सोनवणे व त्यांचा मुलगा प्रशांत रोहिदास सोनवणे यांच्या विरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.

Previous articleरांजनी येथे जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल
Next articleखासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश युक्रेन मध्ये अडकलेले विद्यार्थी महाराष्ट्रात परतले