Home Blog Page 146

१४ एप्रिल २०२२ रोजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा होणार- गौतम खरात

घोडेगाव

युगप्रवर्तक प्रतिष्ठाण संचलित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त जयंती मोहत्सव समितीचे अध्यक्ष अमित (भाऊ) रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची बैठक पार पडली या वर्षी दरवर्षी प्रमाणे घोडेगाव या तालुक्याच्या ठिकाणी दिनांक १४ एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा ना दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जयंती मोहत्सव साजरा होणार असल्याची माहिती युगप्रवर्तक प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष गौतमराव खरात यांनी दिली यावेळी दोन वर्षे कोरोना संकट संपूर्ण मानव जातीवर आले होते.

त्यामुळे मागील दोन वर्षे जयंती धुमधडाक्यात साजरी करता आली नव्हती परंतु आता कोरोना संकट जवळजवळ दूर झाले असून या वर्षी जयंती चांगल्या प्रमाणात करण्याचे सर्वच सदस्यांनी सांगितले यावेळेस कोरोना काळात ज्या लोकांनी चांगल्या प्रकारे काम केले आहे मग त्या मध्ये डॉकटर,नर्स, परिचारिका,अंबुलन्स ड्रायव्हर,सामाजिक कार्यकर्ते ,सेवाभावी संस्था,पोलीस विभागातील कर्मचारी ,अधिकारी लॉकडाऊन काळात अन्नदान करणाऱ्या व्यक्ती ,संस्था यांचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात येणार असून आंबेगाव तालुक्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांना आंबेगाव भूषण पुरस्कार २०२२ वितरण सोहळा आयोजन करण्यात येणार आहे.

या मध्ये सामाजिक ,शैक्षणिक,
क्रीडा, कला,प्रशासकीय सेवा ,वैद्यकीय,विधीतज्ञ, इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून घोडेगाव शहरातून भव्य बाईक रॅली ,भव्य मिरवणूक( सवरगंधर्व बेंजो अवसरी खुर्द, तुकाई ढोल ताशा पथक कोटमदरा, जालिंदर शेवाळे यांचा सुप्रसिद्ध पारंपारिक ताफा , उंट,घोडे यांच्या समवेत,फटाक्यांची आतिषबाजी,विद्युत रोषणाई प्रसिद्ध व्याख्याते प्रा तानाजी बोऱ्हाडे यांचे भीमा तुझ्या जन्मामुळे या विषयावर व्याख्यान व मास्टर किरण महाजन यांचा भीमगीतांचा सदाबहार कार्यक्रम} होणार असून या कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री मा ना दिलीपराव वळसे पाटील ,शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी सामाजिक न्याय चे राज्य प्रमुख ऍड जयदेव गायकवाड ,युवा नेतृत्व मा पूर्वाताई वळसे पाटील ,सर्व संस्थांचे अध्यक्ष,सभापती संचालक तालुक्यातील सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहणार असून कार्यक्रम धुमधडाक्यात होणार असल्याची माहिती अध्यक्ष अमित(भाऊ) रोकडे यांनी दिली

नारायणगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास आघाडीची अधिकृत घोषणा

नारायणगाव – येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी श्री मुक्ताई हनुमान भागेश्वर शेतकरी विकास पॅनल च्या वतीने आज नारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताई देवीचे आशीर्वाद घेऊन पॅनल मधील उमेदवारांची  नावे अधिकृतपणे घोषित करण्यात आली.

याप्रसंगी श्री मुक्ताई, हनुमान, भागेश्वर शेतकरी विकास आघाडी या पॅनल मधून इतर मागासवर्ग या गटातून बिनविरोध निवडून आलेले अरुण आबा कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पॅनल प्रमुख संतोष नाना खैरे, सरपंच योगेश पाटे, उद्योजक संजय वारुळे, एकनाथ शेटे, ज्ञानेश्वर औटी आशिष फुलसुंदर, वारूळवाडी चे सरपंच राजेंद्र मेहेर, जांबुवंत कोल्हे, संतोष वाजगे, हनुमान देवस्थान ट्रस्ट चे उपाध्यक्ष राजकुमार कोल्हे, किशोर कोल्हे,माजी सरपंच अशोक पाटे, राहुल शेठ बनकर ,आशिष माळवदकर, विकास नाना तोडकरी, संजय खैरे, अजित वाजगे, ईश्वर पाटे,हेमंत कोल्हे,जालिंदर खैरे, आकाश कानसकर, प्रशांत खैरे उपस्थित होते.

यावेळी उमेदवार संतोष नाना खैरे, राजेंद्र देवराम पाटे, रामदास तोडकरी, कैलास डेरे, सिताराम खेबडे, बाळासाहेब भुजबळ, चंद्रकांत बनकर, अरूण आबा कोल्हे, आरती संदिप वारुळे, सीमा संदेश खैरे, बाबाजी लोखंडे, मारुती काळे व किरण वाजगे आदी मान्यवर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी संतोष नाना खैरे व योगेश पाटे बोलताना म्हणाले की, हा नारायणगाव आणि वारूळवाडी या दोन गावांचा पॅनेल आहे. यामध्ये सर्वपक्षीय तसेच सर्वसमावेशक उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. आम्ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र विरोधकांनी ही निवडणूक लादली आहे.

बिनविरोध निवडून आलेले संचालक अरुण आबा कोल्हे म्हणाले की, विरोधकांनी किती वावड्या उठवल्या तरी मी श्री मुक्ताई भागेश्वर हनुमान शेतकरी विकास आघाडी याच पॅनलचा उमेदवार म्हणून बिनविरोध निवडून आलो आहे.

यावेळी संजय वारुळे, आशिष फुलसुंदर, सरपंच राजेंद्र मेहेर, उद्योजक राहुल बनकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत श्री मुक्ताई हनुमान भागेश्वर शेतकरी विकास आघाडी पॅनल चे सर्व उमेदवार सर्वसमावेशक व लोकाभिमुख असल्याचे सांगितले.

डॉ.रविंद्र भोळे यांना “फेस ऑफ इंडिया 2022” अवार्ड प्रदान

उरुळी कांचन

राज, रचना, कला एवं साहित्य परिषद रायपुरच्या वतीने ‘फेस ऑफ इंडिया 2022 पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदिजी सहित नऊ केंद्रीय मंत्री, भारतातील दहा मुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रात सराहनीय, कार्य करणाऱ्या समर्पित कार्यकर्त्याना ‘फेस ऑफ इंडिया ‘ अवार्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

ह्या कार्यकमात महाराष्ट्रातिल सुप्रसिद्ध समाजिक, अध्यात्मिक, अपंग तसेच वैध्यकीय क्षेत्रांतील जेष्ठ समाजसेवक , प्रवचनकार डॉ रविंद्र दिनकर भोळे यांना वरिल’ फेस ऑफ इंडिया ‘अवार्ड प्रदान करण्यात आला.

डॉ रविंद्र भोळे ह्यानी विविध क्षेत्रात समर्पित तसेच निस्काम कर्मयोगी कार्ये केलेली असुन विविध क्षेत्रातील अतुलनीय कार्याब्द्दल त्याना यापूर्वीही रोमन मगसेस पुरस्कार प्राप्त, पद्मश्री स्व.डॉ मणीभाई देसाई ह्यानी 1991 सन्मान्पत्र देउन गौरव केलेलाआहे. डॉ रविंद्र भोळे हे राज्यातील निस्काम कर्मयोगाचे एक खास उदाहरण आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पारधी समाजातील लेखक भास्कर भोसले ह्यानी ‘वाळवंटातिल सामाजिक सरोवर डॉ रविंद्र भोळे ‘हे चरित्रत्माक पुस्तक लिहिले आहे. ह्या पुस्तकाचे प्रकाशन शिवशाहीर स्व बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे शुभ हस्ते पुणे येथे झाले होते. मराठवाडा भुकंपात कार्य केल्यामुळे स्व.बाळासाहेब देवरस सरसंचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्यानी कार्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. अनेक ऋषितुल्य विभूती समवेत समर्पित भावनेने डॉ रविंद्र भोळे ह्यानी कार्य केलेले आहे.

नारायणगाव येथील तमाशा पंढरीत राहुट्या उभारणीला प्रारंभ

नारायणगाव (किरण वाजगे)

ग्रामीण भागात यात्रा जत्रा, उरूस तसेच पारंपारिक उत्सवानिमित्त गावोगावी लोकनाट्य तमाशा ला मोठी मागणी असते. याच अनुषंगाने नारायणगाव येथील तमाशा पंढरी मध्ये तमाशा च्या राहुट्या म्हणजेच तमाशा संपर्क कार्यालय उभारण्याचा शुभारंभ आज नारायणगाव येथील कोल्हेमळा शिवारात करण्यात आला.गेली अनेक वर्षांपासून नारायणगाव येथे गावोगावचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष तसेच यात्रा कमिटीचे संचालक उरूस, जत्रा यात्रेनिमित्त तमाशा ठरवण्यासाठी नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये येत असतात.

यासाठी राहुट्या उभारणीसाठी आज नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, तसेच विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, माजी उपसरपंच संतोष वाजगे उद्योजक संजय वारुळे राहुल बनकर, विकास नाना तोडकरी, अजित वाजगे, ईश्वर पाटे, जालिंदर खैरे, आकाश कानसकर, तसेच तमाशा फडमालक मुसा भाई इनामदार, पप्पू मुळे मांजरवाडीकर, मोहित नारायणगावकर, किरणकुमार ढवळपुरीकर तसेच इतर तमाशा फडमालक, कलावंत व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

येथील कानडे, कोल्हे, तसेच महाजन या ग्रामस्थांनी तमाशा कलावंतांसाठी राहत्या उभारणी करिता मोफत जागा उपलब्ध करून दिली आहे तसेच नारायणगाव ग्रामपंचायत च्या वतीने पुढील दोन ते अडीच महिने मोफत पाणी व कचरा गाडी आदी सोयी-सुविधा दिल्या आहेत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून महिला दिनानिमित्त रणरागिणींच्या सन्मानार्थ आकर्षक सवलती

पुणे- संपूर्ण जगभरामध्ये ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. २०२२ च्या जागतिक महिला दिनाची Theme GENDER EQUALITY FOR FOR THE SUSTAINABLE TOMORROW’ म्हणजेच आजची लैंगिक समानता, उद्याची शाश्वती अशी आहे. २१ व्या शतकातील महिला अधिक शाश्वत भविष्य निर्माण करणेकरीता हवामान बदली अनुकूलन, शमन आधि प्रतिसाद यावरील जबाबदारीचे नेतृत्व पार पाडणेकरिता महत्वपूर्ण योगदान देत आहेत हि बाब लक्षात घेता UNITED NATIONS ने सदर थिम जाहीर केली आहे.

 

अगदी सगळयाच क्षेत्रामध्ये अग्रेसरपणे खंबीरपणे परिस्थितींचा सामना करणाऱ्या रणरागिणींना / महिलांना अधिक सक्षम करणेकरीता तसेच त्यांच्या प्रति असलेला आदर, सन्मान, प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण प्रयत्नशील असणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याची भावना मा पर्यटन मंत्री आदित्यसाहेब ठाकरे आणि मा. पर्यटन राज्यमंत्री आदीतीताई तटकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यास अनुसरुन मा. आदित्य ठाकरे साहेब आणि आदीतीताई तटकरे मॅडम यांच्या सुचनेनुसार मा. पर्यटन सचिव बल्सा नायर मॅडम आणि मा. व्यवस्थापकिय संचालिका श्रीमती जयश्री भोज मॅडम यांच्या संकल्पनेतून दि. ८ मार्च २०२२ रोजी महिला दिनाचे औचित्य साधत दि. ६ मार्च २०२२ ते १० मार्च २०२२ या ५ दिवसीय कालावधीत महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास येणाऱ्या महिला अतिथिना आणि त्यांच्या परिवारास निवासकक्ष आरक्षणावर ५०% सूट देण्याबाबत मान्यता दिली आहे.

सदर ५०% आरक्षणावरील सवलत फक्त रविवार दि. ६ मार्च ते गुरुवार १० मार्च २०२२ या कालावधीकरिताच देण्यात आलेली आहे. तसेच सदरच्या सवलती हया फक्त निवास कक्ष आरक्षणावर ५०% सवलत असून त्यानुसार EP प्लॅन (Only Room) ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उपहारगृहांमधील सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण यासाठी ही सवलत लागू नाही. महिला दिनाच्या औचित्याने देण्यात आलेल्या आरक्षण सवलतींना अनुसरून एखाद्या महिलेने कक्षाचे आरक्षण केल्यास सदर आरक्षण रद्द करता येणार नाही, तसेच ज्या महिलांच्या नावे आरक्षण • असेल त्या महिलांनी त्या ठिकाणी आपल्या ओळखपत्रासह उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे.

महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये आलेल्या महिला अतिथीचे आगमन होताच त्यांचे विशेष स्वागत करण्यात येणार आहे.

माहिती तंत्रज्ञान शाखेदारे सर्व पर्यटक निवास व्यवस्थापक यांना महिला अतिथीना ५०% आरक्षण सवलत देणेकरिता आवश्यक PROMO CODES संकेतस्थळावर (www.mtde.co) उपलब्ध करुन देण्यात आलेली असून त्यामुळे सदर आरक्षणे पारदर्शक आणि सुरळीत होणार आहेत. Promo Codes हे महामंडळाद्वारे भाडेतत्वावर देण्यात आलेल्या पर्यटक निवासासाठी लागु नाहीत. तसेच या सवलती फक्त निवास कक्ष आरक्षणास वैध असून Extra Beds तसेच conference Halls, lawns करीता लागू असणार नाहीत.

शासनाने कोरोना बाबतचे निबंध शिथील केले असल्याने महामंडळाची सर्वच पर्यटक निवासे मोठया प्रमाणावर आरक्षित होत असुन या उत्साही वातावरणामध्ये सदरच्या सवलतींमुळे पर्यटनाचा आनंद द्विगुणीत तर होणार आहेच, पण महामंडळाकडुन रणरागिणींचा सन्मान केला जात असल्याने महिला पर्यटकांमधुनही समाधान व्यक्त होत असल्याची माहीती महामंडळाचे पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी दिली..

किरण बोराडे यांची जिल्हा प्रतिनिधी पदी बिनविरोध निवड

पवनानगर-सहाय्यक कृषी अधिकारी संघटना मावळ ची त्रैवार्षिक निवडणूक रविवार दि. २७ रोजी वडगाव मावळ येथे पार पडली.यावेळी सर्व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

सदर निवडणुक मध्ये खालीलप्रमाणे नवनिर्वाचीत कार्यकारणी निवडण्यात आली.

जिल्हा प्रतिनिधी पदी किरण पंढरीनाथ बो-हाडे , तालुका अध्यक्ष पदी घनश्याम रामदास दरेकर, तालुका कार्याध्यक्ष पदी प्रियंका शरद पाटील, महिला संघटक पदी श्रद्धा अमित कुलकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी सर्व सभासदांनी पेढे भरुन आंनदत्सव साजरा केला.

सदर निवडणुकीसाठी निवडणुक अधिकारी सी.एस.राजपुत व एस.एम.विरणक यांनी काम पाहिले आहे.

वाघु कोकरे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड

पवनानगर

आपटी ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी वाघु बाळु कोकरे यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे. मावळते उपसरपंच कैलास दशरथ टाकवे यांचा ठरल्याप्रमाणे कार्यकाळ संपल्याने उपसरपंच पदासाठी सरपंच अनिता विनोद शिळवणे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी वाघु कोकरे यांचा एकमेव उपसरपंच पदासाठी अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, चेअरमन गणेश धानिवले, माजी सरपंच अंजना कोकरे,दशरथ शिळवणे,दत्तात्रय साबळे,बबन कोशिरे,ग्रामसेवक महेश भोईर,सदस्य सुनंदा टाकवे,पुष्पा घारे,संगिता रौवणे,प्रमोद शेंडे,यांच्या गावातील मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थितीत होते.निवडीनंतर गुलालाची उधळण करुन आंनद उत्सव साजरा केला.

राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या पुणे जिल्हा सरचिटणीसपदी डॉ सोनाली कदम यांची नियुक्ती :- आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

उरुळी कांचन

राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या पुणे जिल्हा सरचिटणीसपदी डॉ सोनाली कदम यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्र खासदार संसदरत्न डॉ अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी सभापती सुजाता पवार , राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ.शिवदीप उंद्रे आदी उपस्थिती होते.

यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष विजय तुपे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर कांचन, मा उपसरपंच भाऊसाहेब कंचन, माजी अध्यक्ष अर्जुन कांचन, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शिरीष घुले, डॉ. सुंदरम कदम हे उपस्थित होते.

सर्व सामान्य नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या माध्यमातून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत डॉ सोनाली कदम यांनी सांगितले.

आदर्श शिक्षिका रंजना कांदळकर यांचा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सत्कार

धनंजय साळवे

कवठे येमाई – पिंपळे खालसा येथील आदर्श उपशिक्षिका सौ. रंजना विलास कांदळकर यांचा पुणे जिल्हा परिषद तर्फे पंचवीस विध्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेतआल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शिष्यवृत्ती परीक्षेत उपशिक्षिका सौ. रंजना विलास कांदळकर यांच्या यशस्वी मार्गदर्शनामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत असे यश या शाळेस मिळाले.

या सत्कार समारंभा प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे सी. ई.ओ. आयुष प्रसाद,अध्यक्षा निर्मालाताई पानसरे,उपाध्यक्ष रणजित शिवतारे हे उपस्थित होते.हा कार्यक्रम पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात आला.

त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.सौ. रंजना विलास कांदळकर या कवठे येमाई येथील रहिवासी आहेत त्या मुळे कवठेकर मंडळी व टाकळी-कवठे जिल्हा परिषद गटातून विशेष अभिनंदन होत आहे.

बापुसाहेब गावडे सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये जगदंबा सहकार परीवर्तन पॕनलने मारली बाजी

धनंजय साळवे

कवठे यमाई (मुंजाळवाडी ) येथील बापुसाहेब गावडे वि .कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जगदंबा सहकार परीवर्तन पॕनलने बाजी मारली .अतिशय चुरशीच्या उत्कंठावर्धक लढतीत जगदंबा सहकार परीवर्तन पॕनलने बाजी मारली.ह्या पॕनलचे आठ उमेदवार निवडुन आले व शिवसेना पुरस्कृत जगदंबा सहकार पॕनलचे चार उमेदवार निवडुन आले .एक लढत बरोबरीत सुटली होती परंतु श्री.लहु मारुती येडे यांनी चिट्ठी टाकण्याएवजी प्रतिस्पर्ध्याच्या गळ्यात विजयी माळ टाकली त्यांच्या दिलदारपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या विजयामुळे राष्ट्रवादी च्या गोटात आनंदाचे वातावरण तयार झाले.येत्या पाच तारखेला पुन्हा कवठे वि.का.सोसायटीची निवडणुक असल्यामुळे शिवसेना पुरस्कृत जगदंबा सहकार पॕनलला जोमाने काम करावे लागणार आहे.व राष्ट्रवादी पुरस्कृत जगदंबा सहकार परीवर्तन पॕनललाही गाफील राहुन चालणार नाही. या मधील विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांचा सन्मान शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जगदंबा सहकार परीवर्तन पॕनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे – १)कांदळकर साहेबराव भाऊसाहेब (एकूण मते १३६).२)हिलाळ मारुती चिमा (एकूण मते १३3). ३)किठे देविदास तुकाराम (एकूण मते १२६). ४ )देवकर सोपान मारुती (एकूण मते १२५). ५)मुंजाळ समिंद्राबाई हनुमंत (एकूण मते १३२). ६) मुंजाळ भाऊ बबन (एकूण मते ११७). ७)मुंजाळ पांडुरंग गोविंद (एकूण मते १३१). ८)उघडे कवठेकर अंकुश भागाजी ( बिनविरोध ) तर शिवसेना पुरस्कृत जगदंबा सहकार पॕनलचे विजयी उमेदवारपुढीलप्रमाणे – १) पवार हेमंत भास्कर (एकूण मते १२५). २) घोडे भाऊ पांडुरंग (एकूण मते ११९). ३)घोडे दिनकर दादाभाऊ (एकूण मते ११९ ). ४) मुंजाळ जिजाबाई तुकाराम (एकूण मते १२९). एकूण मतदान २७९ झाले . निवडणूक अधिकारी म्हणून श्री. के. डी. मोरे यांनी काम पहिले.