वाघु कोकरे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड

पवनानगर

आपटी ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी वाघु बाळु कोकरे यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे. मावळते उपसरपंच कैलास दशरथ टाकवे यांचा ठरल्याप्रमाणे कार्यकाळ संपल्याने उपसरपंच पदासाठी सरपंच अनिता विनोद शिळवणे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी वाघु कोकरे यांचा एकमेव उपसरपंच पदासाठी अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, चेअरमन गणेश धानिवले, माजी सरपंच अंजना कोकरे,दशरथ शिळवणे,दत्तात्रय साबळे,बबन कोशिरे,ग्रामसेवक महेश भोईर,सदस्य सुनंदा टाकवे,पुष्पा घारे,संगिता रौवणे,प्रमोद शेंडे,यांच्या गावातील मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थितीत होते.निवडीनंतर गुलालाची उधळण करुन आंनद उत्सव साजरा केला.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या पुणे जिल्हा सरचिटणीसपदी डॉ सोनाली कदम यांची नियुक्ती :- आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
Next articleकिरण बोराडे यांची जिल्हा प्रतिनिधी पदी बिनविरोध निवड