Home Blog Page 145

पावनखिंड चित्रपटा बरोबरच मगरपट्टा-अमनोरा सिटीच्या सहलीने भारावले चिमुरडे : सह्याद्री प्रतिष्ठान व अस्तित्व कला मंचचा उपक्रम

उरुळी कांचन

पहिल्यांदाच पाहिलेले सोन्याचे झाड, उंच आकाशात घुसलेल्या इमारतींचे टॉवर, सरकत्या जिन्यावरील प्रवास, भव्य मॉल, त्यातील कल्पनेपलिकडील झगमगाट आणि पुस्तकातील इतिहास पडद्यावर जीवंत पाहण्याचा थरार ग्रामीण व आदीवासी भागातील चिमुरड्यांनी नुकताच मगरपट्टा व अमनोरा सिटीमध्ये अनुभवला. निमित्त होते, हडपसर येथील अस्तित्व कलामंच व कान्हेवाडी बुद्रुक (ता. खेड) येथील सह्याद्री प्रतिष्ठान तसेच जिल्हापरिषद शाळेच्या वतीने चिमुकल्यांसाठी आयोजित केलेल्या “पावनखिंड’ या चित्रपटाचे.

कान्हेवाडी बुद्रुक, सहाणेवाडी व ठाकर समाज आदीवासी वस्तीतील जिल्हापरिषद शाळेमधील चिमुकल्यांसाठी मगरपट्टासिटीतील सिझन मॉलमध्ये “पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना मॉल व चित्रपटासह अमनोरा सिटीतील सुवर्ण वृक्ष, गगनचुंबी टॉवर, कृत्रीम सरोवर, खुले सभागृह दाखविण्यात आले. दरम्यान, चित्रपटातील पात्रांच्या ऐतिहासिक संवादाबरोबर प्रेरित होऊन विद्यार्थी छत्रपतींच्या नावाचा जयघोष करून आनंद घेत होते. मध्यंतरास चित्रपटाचे पार्श्वगायक अवधूत गांधी यानी व्हिडीओ कॉलवरून चिमुकल्यांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही त्यांना हात उंचावून आनंद व्यक्त केला. सरकत्या जिन्यावरील प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी आश्चर्यचकित करणारा होता. आपल्या भिरभिरत्या नजरेने या विद्यार्थ्यांनी काही वेळातच हे नाविन्य डोळ्यात साठवून घेतले. सकाळी मिळालेला नाश्ता आणि दुपारच्या भोजन व्यवस्थेने त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. अमनोरा सिटीचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे व उपाध्यक्ष सुनील तरटे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन गप्पा मारल्या व कौतुक केले.

“छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सहकारी बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचा इतिहास पुस्तकातून वाचला आहे. राजांबद्दल निष्ठा ठेवणारे शिवा काशिद सारखे सवंगडीही ऐकले आहेत. मात्र, पावनखिंड चित्रपट पाहताना हे सगळे समोर घडल्यासारखे वाटले. प्रसिद्ध मोठ्या सिटी, त्यामधील इमारती, रस्ते, मॉलमधील आकर्षक गोष्टी पाहताना खूप आनंद वाटला,’ अशा भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

अस्तित्व कलामंचाचे योगेश गोंधळे, धीरज दरवडे, श्रुतिका चौधरी, डॉ अश्विनी शेंडे, प्रमिला लोखंडे, अश्विनी सुपेकर, पल्लवी धुरू आदी पंधरा स्वयंसेवकांसह सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकांत कोबल, कार्यकर्ते राहुल निमसे, विनायक रूके, देवेंद्र सहाणे, विलास कोबल, मुख्याध्यापक सुरेशराव नाईकरे, शिक्षक राजेंद्र थोरात गणपत खैरे, रोहीणी बेल्हेकर, गोरक्ष मुळुक शंकर बुरसे, संजय घुमटकर, वैजयंता नाईकडे यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.

विश्वनाथ गायकवाड, रविंद्र थोरात, मिलिंद कोबल, संतोष बेंडुरे, दिलीप मांजरे, चंद्रकांत कोबल, शंकर कोबल, विनोद कोबल, संतोष सावंत, चंद्रकांत सहाणे, रोहिणी तुपे यांनी सहकार्य केले.

मराठी भाषा गौरव दिन संपन्न

घोडेगाव – येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात नुकताच मराठी भाषा गौरव दिन आणि या वसतिगृहात राहून इयत्ता बारावीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शुभेच्छा समारंभ अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बी.डी.काळे महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसतिगृहाच्या अधीक्षिका सुहासिनी कांबळे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. वाल्हेकर यांनी ‘कवी भुजंग मेश्राम यांच्या ‘उलगुलान’ या कवितासंग्रहातील ‘आश्रम शाळेतल्या कविता’ या शीर्षकाखाली असलेल्या पाच कवितेतील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्यांच्या जगण्याची पद्धत, परिवर्तन आणि सुधारणावादी विचार, विद्यार्थ्यांची जिद्द, विद्यार्थ्यांचे ध्येय,त्यांचा नवा दृष्टीकोण परिचय करून दिला. विशेषतः तानाजी सिडाम, नरसिंह राठोड, भिमराव बोईनवाड, कोंडबा गिरडकर, लहान्या शिंगड्या या कवितेतील विद्यार्थी पात्रांचा परिचय करून दिला.

याशिवाय इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींना त्यांनी येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.कावेरी सुपे यांनी केले.

कवठे येमाई महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

धनंजय साळवे

कवठे येमाई येथे महिला दिनानिमित्त महिलांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन रामविजय फाऊंडेशनच्या मा. पं. सदस्या डॉ. सौ. कल्पनाताई पोकळे यांनी केले आहे.

यात मुख्य आकर्षण क्रांति माळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा असेल. यात महिलांसाठी अनेक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.प्रथम क्रमांकासाठी AQUAGUARD,द्वितीय क्रमांकासाठी एलईडी टी. व्ही,तृतीया क्रमांकासाठी ओव्हन,चतुर्थ क्रमांकासाठी मिक्सर,पाचवा क्रमांकासाठी टेबल फॅन अशा प्रकारची बक्षिसे असतील. तसेच प्रत्येक विजेत्यास,स्पर्धकास आकर्षक भेटवस्तू .. मोहन पडवळ लिखित गुल्हर चित्रपटाची पन्नास तिकिटे मोफत देण्यात येतील

कार्यक्रमाचे स्थळ माहेश्वरी लॉन्स मंगल कार्यालय कवठे येमाई येथे असेल. तसेच कोविड मध्ये काम केलेल्या सर्व अंगणवाडी सेविका,मदतनीस,आरोग्य परिचारिका,आदर्श माता यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रामविजय फाऊंडेशनच्या माध्यमातुन नेहमीच समाजासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. जसे मोफत विवाह सोहळे, क्रीडा स्पर्धा,होतकरू तरुणांना शैक्षणिक मदत, गोर गरीब जनतेला मदत असे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.

आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली- बळवंत गायकवाड

घोडेगाव

आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली असे गौरवोदगार प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी काढले.आदिवासी शासकीय मुलींचे वसतिगृह शिनोली येथील मार्च २०२२ मध्ये होणाऱ्या एच एस सी परीक्षेला जाताना करावयाची तयारी व इयत्ता १२ वीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून गायकवाड साहेब बोलत होते..

आदिवासी विकास विभागातील विद्यार्थी यांनी आश्रमशाळा व वसतिगृहात शिक्षण घेत असताना वेळेचा सदुपयोग करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करून अवांतर वाचन करून १२ वी मध्येच आपले धेय्य निश्चित जीवनाचा मार्ग निवडला पाहिजे तर आपण यशाच्या शिखरावर निश्चित पोहचू असा आत्मविश्वास प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला

मौजे शिनोली येथील आदिवासी मुलींचे वसतिगृह येथे निरोप समारंभ आयोजित केला होता यावेळी सकाळी ११ वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली पाहुण्याच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली नंतर वसतिगृहातील विद्यार्थिनींनी इशस्तवन व स्वागतगीत सादर केले त्या नंतर गृहपाल खरात यांनी प्रास्तविक केले त्या नंतर पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन वसतिगृह तर्फे सत्कार करणयात आला यानंतर यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक अविनाश ठाकूर सर यांनी सुप्रसिद्ध व्याख्याते जयसिंगराव गाडेकर यांच्या कार्याची ओळख करून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले .

या प्रसंगी इयत्ता १२वी व इयत्ता १०वी च्या विद्यार्थिनींना प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड व पाहुण्याच्या हस्ते गुलाब पुष्प लिखाणाचे पॅड व पेन देऊन सत्कार करण्यात आला या काळात १२ वी व १० वी च्या विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली सहा प्रकल्प अधिकारी योगेश खंदारे व सहा प्रकल्प अधिकारी शिक्षण व्ही टी भुजबळ ,मुख्याध्यापक अविनाश ठाकूर सर यांनी मार्गदर्शन केले या नंतर सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा जयसिंग गाडेकर यांनी विद्यार्थिनींना इयत्ता १२वी व १० वी च्या परीक्षेला जाताना करावयाची तयारी या बाबत मार्गदर्शन करून मंत्र मूग्ध करण्यात आले

प्रास्तविक व सूत्रसंचालन गौतमराव खरात यांनी केले आभार विद्यार्थिनींनी मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

घोडेगाव येथील १३ वर्षीय दिप्तीचा प्रेरणादायी प्रवास

घोडेगाव (ता. आंबेगाव ) येथील रहिवासी दीप्ती ( बेबो ) बाळासाहेब काळे हीचा घोडेगावकरांना सार्थ अभिमान आहे. घोडेगाव येथील दीप्ती ही १३ वर्षाची असून या मुलीने ४ महिन्यात जवळ जवळ ३५०० किलो मिटर पायी प्रवास करून नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे.तसेच तिच्याबरोबर मनीषा काळे, संजीवनी गव्हाणे व बाळासाहेब उर्फ शांताराम काळे यांनीही नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दलत्याबद्दल त्यांचे समस्त घोडेगावकर मंडळींच्या वतीने स्वागत करण्यात आले.

दीप्तीला ही परिक्रमा पूर्ण करताना तिच्याही मार्गामध्ये अनेक अडथळे आले .तिच्या पायाला इजा झाल्या परंतु तिने न थकता चार महिने पायी प्रवास करून नर्मदा मैयेच्या आशीर्वादाने ही परिक्रमा पूर्ण केली. अनेक वेळा जेव्हा तिला फोनवर विचारलं जायचं तुला थकल्यासारखं वाटतंय का तुला काही त्रास होतोय का परंतु ती तिकडून खूप सुंदर उत्तर द्यायची मला अजिबात थकल्यासारखं वाटत नाही हसत-खेळत चालत अत्यंत आनंदाने ही परिक्रमा पूर्ण करत आहे.

परिक्रमा पूर्ण करून घोडेगाव परिसरात आल्यावर प्रथम श्री हरिश्चंद्र महादेव मंदीर येथे पूजन करून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर नर्मदे हर परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विनोद काळे सर यांच्या संकल्पनेतून नर्मदा मैया परिक्रमा पूर्ण करून आलेल्या भक्तगणांची जंगी मिरवणूक घोडेगाव परिसरात काढण्यात आली या वेळी संत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेने दिप्तीचा व तिच्या परिवाराचा उचित असा सन्मान घोडेगाव येथील चावडी चौक येथे करण्यात आला.

याप्रसंगी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन पुरुषोत्तम भास्कर ,घोडेगावचे सरपंच क्रांतीताई गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, पतसंस्थेचे संचालक कैलासशेठ सोमवंशी ,गोविंदशेठ घोडेकर ,रत्नाताई गाडे, नर्मदे हर परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विनोद काळे सर ,आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष तुकाराम काळे, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ समन्वय समितीचे चेअरमन संतोष भास्कर ,धनंजय काळे, सतीश जाधव , वैभव मंडलिक, पोपट कासार ,रमणबाबा मेहेर, गणेश घोडेकर, माधव काळे, लक्ष्मण गव्हाणे ,सावता महाराज पतसंस्थेच्या सचिव दिपाली मेहेर, प्रियांका भास्कर, वर्षा काळे ,सविता काळे ,अनिता काळे ,विमल काळे ,मीराबाई काळे ,निर्मला काळे ,तसेच घोडेगाव ग्रामस्थ व संपूर्ण नर्मदे हर परिवार उपस्थित होता

आंबेगाव तालुक्यात वन विभागामार्फत आदिवासी भागात रोजगार उपलब्ध करून द्यावे: ट्रायबल फोरमची मागणी

घोडेगाव- वन विभागामध्ये भीमाशंकर वनपरिक्षेत्रात विविध योजनांच्या माध्यमातून स्थानिक आदिवासी लोकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावे ही मागणी घेऊन ट्रायबल फोरमचे शिष्टमंडळ यांनी वनपरिक्षेत्राधिकारी श्री महेश गारगोटे यांची घोडेगाव येथे वनपरिक्षेत्र कार्यालयात भेट घेतली यावेळी ट्रायबल फोरमचे अध्यक्ष डॉक्टर हरीश खामकर तालुका कार्याध्यक्ष दीपक चिमटे महासचिव विशाल दगडे तसेच ट्रायबल फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सकारात्मक चर्चा होऊन आदिवासी भागातील रोजगारासाठी उपाययोजनांच्या मार्फत व शासकीय योजना राबवून अनेक आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही वनपरिक्षेत्र अधिकारी श्री महेश गारगोटे यांनी दिली.

वृक्ष लागवड वृक्ष संगोपन तसेच गॅस बंब अशा योजना आदिवासी भागात राबवाव्यात स्थानिकांना वनक्षेत्रात गौण खनिज साधनसंपत्ती तसेच गौण वन उत्पादन याबाबत माहिती द्यावी मार्गदर्शन करावे त्याच बरोबर वन विभागाने स्थानिक आदिवासींना बांधवांना विश्वासात घेऊन योजना राबवाव्यात जेणेकरून वन विभाग व स्थानिक आदिवासी ग्रामस्थ मध्ये सहकार्याची भावना वाढेल असे मत डॉक्टर हरीश खामकर यांनी व्यक्त केले त्याच प्रमाणे मा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार वृक्ष लागवड व संवर्धन समिती पुनर्गठीत करावी त्याचबरोबर वन विभागामार्फत तालुकास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्याबाबत ही मत मांडण्यात आले याबाबत लवकरच समिती स्थापन करू असे वनविभागातर्फे आश्वासन देण्यात आले आहे.

निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून संत निरंकारी मिशन तर्फे देशभरात मोफत नेत्रचिकित्सा शिबिरे, स्वच्छता व वृक्षारोपण अभियान संपन्न

पुणे : संत निरंकारी मिशनच्या वतीने बाबा हरदेवसिंहजी यांच्या जन्मदिनी दि.२३ फेब्रुवारी, २०२२ रोजी निरंकारी सत्संग भवन गंगाधाम, बिबवेवाडी या ठिकाणी मोफत नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. आजूबाजूच्या परिसरातून ४१६ व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला. जवळपास १९१ गरजू रुग्णांना मिशनच्या वतीने मोफत औषधे व चश्मे वाटण्यात आले. एच व्ही देसाई हॉस्पिटलच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. आजच्या दिवशी संपूर्ण भारतात १६ राज्यात ६१ निरंकारी सत्संग भवनांमध्ये मोफत नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय ज्या नेत्ररुग्णांच्या बाबतीत मोतीबिंदू निष्पन्न होईल त्यांचे ऑपरेशन सरकारी इस्पितळांमध्ये करण्यात येणार आहे.

याचबरोबर ज्या ठिकाणी मिशनची सत्संग भवन आहेत त्या ठिकाणच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सर्वांना विदितच आहे, की निरंकारी बाबा हरदेवसिंह जी महाराज यांच्या सान्निध्यात संत निरंकारी मिशनने आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून जगाला प्रेम, दया, करुणा, एकत्व यांसारख्या उदात्त भावनांशी जोडून भिंतीविरहित जगाची परिकल्पना साकार केली. त्यांनी आपल्या भक्तांना आध्यात्मिकतेबरोबरच मानवता व प्रकृतीची सेवा करत आपल्या कर्तव्यांचे पालन करण्याची प्रेरणा दिली.

या व्यतिरिक्त कोरोनाच्या कालखंडात जेव्हा भारतभर इस्पितळांमध्ये ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला होता तेव्हा मिशनच्या वतीने ‘वननेस वन परियोजने अंर्तगत २१ ऑगस्ट, २०२१ रोजी संपूर्ण भारतात जवळपास ३५० ठिकाणी दिड लाखाच्या आसपास वृक्ष लागवड करण्यात आली. त्याचबरोबर त्यांची देखभाल करण्यासाठी तीन वर्षे दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण करण्याचाही संकल्प करण्यात आला.

हेच महाअभियान पुढे घेऊन जात असताना मिशनच्या सेवादारांकडून आजच्या दिवशी कोरेगाव मूळ ,उरुळीकांचन या ठिकाणच्या ‘ वननेस वन ‘ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणी ७५०० वृक्ष लावण्यात आले .अजून २५०० वृक्ष पुढील चार दिवसात लावण्यात येणार आहेत.

याचबरोबर खुटबाव येथील प्रकल्पामध्ये २६८५ तसेच कामशेत आणि पाषाण येथे प्रत्येकी २०० वृक्ष लावण्यात आले . ज्यायोगे प्रदूषणाचा स्तर कमी होऊ शकेल आणि प्राणवायुची निर्मिती अधिकाधिक प्रमाणात होऊ शकेल जो मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. अशी माहिती संत निरंकारी मिशनचे पुणे झोन प्रभारी श्री.ताराचंद करमचंदानी यांनी दिली. या सर्व उपक्रमांचे आयोजन कोविड-१९ च्या दिशा-निर्देशांचे पालन करत करण्यात आले.

मराठी भाषा गौरव दिन व शुभेच्छा समारंभ संपन्न

घोडेगाव – येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात नुकताच मराठी भाषा गौरव दिन आणि या वसतिगृहात राहून इयत्ता बारावीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शुभेच्छा समारंभ अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बी.डी.काळे महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसतिगृहाच्या अधीक्षिका सुहासिनी कांबळे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. वाल्हेकर यांनी ‘कवी भुजंग मेश्राम यांच्या ‘उलगुलान’ या कवितासंग्रहातील ‘आश्रम शाळेतल्या कविता’ या शीर्षकाखाली असलेल्या पाच कवितेतील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्यांच्या जगण्याची पद्धत, परिवर्तन आणि सुधारणावादी विचार, विद्यार्थ्यांची जिद्द, विद्यार्थ्यांचे ध्येय,त्यांचा नवा दृष्टीकोण परिचय करून दिला. विशेषतः तानाजी सिडाम, नरसिंह राठोड, भिमराव बोईनवाड, कोंडबा गिरडकर, लहान्या शिंगड्या या कवितेतील विद्यार्थी पात्रांचा परिचय करून दिला.याशिवाय इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींना त्यांनी येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.कावेरी सुपे यांनी केले.

शेतकरी अडचणीत असताना विकास सोसायटीकडे राजकारण म्हणून पाहू नका-सरपंच योगेश पाटे

नारायणगाव : (किरण वाजगे)
राज्यात सर्वत्र शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी व शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या कार्यरत असतात. केवळ आपल्या स्वार्थासाठी व राजकारण करण्यासाठी विविध कार्यकारी सोसायट्या नाहीत असे सांगून नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मध्ये विरोधी पॅनल ने सर्वसमावेशक व सर्वानुमते पॅनल न करतात ही निवडणूक लादली असल्याची टीका नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांनी आज केली आहे.

नारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताईदेवी च्या प्रांगणामध्ये श्री मुक्ताई हनुमान भागेश्वर शेतकरी विकास आघाडी या पॅनलच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी सरपंच योगेश पाटे बोलत होते.


याप्रसंगी उद्योजक संजय वारुळे, मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे एकनाथ शेटे, डिके भुजबळ, दादाभाऊ खैरे, वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, आशिष फुलसुंदर, संतोष वाजगे, सुजित खैरे, माजी सरपंच अशोक पाटे, राहुल शेठ बनकर, संजय कानडे, आशिष माळवदकर, एमडी भुजबळ, विकास नाना तोडकरी, अनिल खैरे, राजेंद्र वाजगे, अजित वाजगे, वसंत वाजगे, विलास पाटे, राजेंद्र खैरे, अंबादास वाजगे, उमाकांत डेरे, माजी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान उमेदवार मारुती काळे माजी उपसरपंच सचिन वारुळे, संदीप वारुळे, राजेंद्र पाटे, रामदास तोडकरी, कैलास डेरे, सीताराम खेबडे, बाळासाहेब भुजबळ, चंद्रकांत बनकर, अरुण कोल्हे, आरती संदीप वारुळे, सीमा संदेश खैरे, बाबाजी लोखंडे, किरण वाजगे, तसेच नारायणगाव चे उपसरपंच आरिफ आतार, हेमंत कोल्हे, किशोर कोल्हे, राजेंद्र कोल्हे, पांडुरंग वाजगे, जितेंद्र वाजगे, समीर वाजगे, भाऊ जोरी, प्रशांत खैरे, अक्षय खैरे, रोहन पाटे, शैलेश औटी विनायक डेरे, नंदू अडसरे, दिलीप पाटे, महेश पाटे, संग्राम घोडेकर तसेच अनेक जेष्ठ नागरिक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी सुजित खैरे, डी.के. भुजबळ, आशिष माळवदकर, राजेंद्र वाजगे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.
सोसायटीच्या वतीने शेतकरी हिताचे निर्णय घेऊन वेगवेगळे कृषी उद्योग व्यवसाय सुरू करणार असल्याचे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे यांनी सांगितले. ज्ञानेश्वर औटी यांनी सूत्रसंचालन केले.

कवठे वि. कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीची प्रचाराची सांगता

धनंजय साळवे

कवठे येमाई – कवठे वि. कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीच्या शेवटच्या प्रचाराच्या दिवशी शिवसेना पुरस्कृत जगदंबा सहकार पॕनलची जोरदार प्रचार सभेने सांगता झाली. यावेळी जोरदार शक्ति प्रदर्शन या पॅनल तर्फे करण्यात आले. यावेळी अनेक वक्त्यांची भाषणे झाली.

यामध्ये मुख्यता श्री. मोहनशेठ पडवळ,श्री.रोहिदास हिलाळ श्री. नामदेव शिंदे,श्री.डॉ. शितोळे, श्री.डॉ.हेमंत पवार, श्री.आबाशेठ वागदरे,श्री.रितेश शहा यांची भाषणे झाली. श्री.दिनकर घोडे यांनी सूत्रसंचालन केले.सभेचे अध्यक्ष सरपंच श्री.रामदासशेठ सांडभोर हे होते. ह्या पॅनलचे एक प्रमुख पं.समिति सदस्य श्री.डॉ. पोकळे यांनी ही निवडणूक बिनविरोध करता आली असती परंतु विरोधकांनी प्रतिसाद दिला नाही असा आरोप केला .

जर आम्हाला निवडून दिले तर आम्ही सभासदांंना चांगली सेवा देण्याचा नक्की प्रयत्न करू असे आपल्या भाषणात सांगितले. सोसायटीचे एक प्रमुख उमेदवार मा. सरपंच श्री. बबनराव पोकळे यांनी आपल्या भाषणात चांगलीच फटकेबाजी केली.ही निवडणूक बिनविरोध झाली असती तर लाखों रुपयांची बचत झाली असती. जर सर्वांचे बिनविरोध करायचे ठरले असते तर मी माघार घ्यायला तयार होतो. पण विरोधकांना ही निवडणूक बिनविरोध करायची नव्हती त्यामुळे मी उभा आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती असा सर्वांचाच सुर होता.मुंजाळवाडी सोसायटीच्या पराभवास ज्या चुका झाल्या त्या टाळावयास हव्या, मतदारांना योग्य मार्गदर्शन करुन मते बाद होणार नाही ह्या कडे लक्ष्य दिले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॕनल जगदंबा सहकार परीवर्तन पॕनलने मात्र आज सभेपेक्षा मतदारांच्या गाठी भेटी घेण्यावर भर दिला. पॕनलच्या उमेदवार व नेत्यांनी पक्षाने केलेल्या विकासकामांवर आम्हाला मतदार निवडून देतील असे सांगितले.

शेतकर्याच्या अडचणी कशा दुर होतील या कडे लक्ष्य दिले जाईल.या पॅनलची धुरा श्री. बबन पोकळे (मोठा मामा)युवा नेते श्री.बाळासाहेब डांगे मा. पं,सदस्य सुदामभाऊ इचके,मा. सरपंच श्री.दीपक भाऊ रत्नपारखी,श्री.बाजीरावनाना उघडे,श्री.दत्ताशेठ सांडभोर,श्री.रोहिलेसर,श्री.समाधान वागदरे यांच्यावर राहील. ही निवडणूक येत्या शनिवारी दिनांक ०५/०३/२०२२ रोजी होत आहे व त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. कवठे सोसायटीची बऱ्याच वर्षांनी निवडणूक होत असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराची राळ उठविण्यात आली. अनेक आरोप – प्रत्यारोप झाले. शुक्रवारी प्रचार नसल्यामुळे छुपा प्रचारवरच भर असेल. या निवडणुकीत नातेगोते व पक्ष हाच मुख्य मुद्दा राहील असे वाटते.