किरण बोराडे यांची जिल्हा प्रतिनिधी पदी बिनविरोध निवड

पवनानगर-सहाय्यक कृषी अधिकारी संघटना मावळ ची त्रैवार्षिक निवडणूक रविवार दि. २७ रोजी वडगाव मावळ येथे पार पडली.यावेळी सर्व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

सदर निवडणुक मध्ये खालीलप्रमाणे नवनिर्वाचीत कार्यकारणी निवडण्यात आली.

जिल्हा प्रतिनिधी पदी किरण पंढरीनाथ बो-हाडे , तालुका अध्यक्ष पदी घनश्याम रामदास दरेकर, तालुका कार्याध्यक्ष पदी प्रियंका शरद पाटील, महिला संघटक पदी श्रद्धा अमित कुलकर्णी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी सर्व सभासदांनी पेढे भरुन आंनदत्सव साजरा केला.

सदर निवडणुकीसाठी निवडणुक अधिकारी सी.एस.राजपुत व एस.एम.विरणक यांनी काम पाहिले आहे.

Previous articleवाघु कोकरे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड
Next articleमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून महिला दिनानिमित्त रणरागिणींच्या सन्मानार्थ आकर्षक सवलती