राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या पुणे जिल्हा सरचिटणीसपदी डॉ सोनाली कदम यांची नियुक्ती :- आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

उरुळी कांचन

राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या पुणे जिल्हा सरचिटणीसपदी डॉ सोनाली कदम यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्र खासदार संसदरत्न डॉ अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी सभापती सुजाता पवार , राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ.शिवदीप उंद्रे आदी उपस्थिती होते.

यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष विजय तुपे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर कांचन, मा उपसरपंच भाऊसाहेब कंचन, माजी अध्यक्ष अर्जुन कांचन, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शिरीष घुले, डॉ. सुंदरम कदम हे उपस्थित होते.

सर्व सामान्य नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या माध्यमातून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत डॉ सोनाली कदम यांनी सांगितले.

Previous articleआदर्श शिक्षिका रंजना कांदळकर यांचा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सत्कार
Next articleवाघु कोकरे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड