आदर्श शिक्षिका रंजना कांदळकर यांचा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सत्कार

धनंजय साळवे

कवठे येमाई – पिंपळे खालसा येथील आदर्श उपशिक्षिका सौ. रंजना विलास कांदळकर यांचा पुणे जिल्हा परिषद तर्फे पंचवीस विध्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेतआल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शिष्यवृत्ती परीक्षेत उपशिक्षिका सौ. रंजना विलास कांदळकर यांच्या यशस्वी मार्गदर्शनामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत असे यश या शाळेस मिळाले.

या सत्कार समारंभा प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे सी. ई.ओ. आयुष प्रसाद,अध्यक्षा निर्मालाताई पानसरे,उपाध्यक्ष रणजित शिवतारे हे उपस्थित होते.हा कार्यक्रम पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात आला.

त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.सौ. रंजना विलास कांदळकर या कवठे येमाई येथील रहिवासी आहेत त्या मुळे कवठेकर मंडळी व टाकळी-कवठे जिल्हा परिषद गटातून विशेष अभिनंदन होत आहे.

Previous articleबापुसाहेब गावडे सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये जगदंबा सहकार परीवर्तन पॕनलने मारली बाजी
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या पुणे जिल्हा सरचिटणीसपदी डॉ सोनाली कदम यांची नियुक्ती :- आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र